agrim pik vima राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाने पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा भरपाईसाठी पूर्व सूचना दिल्या.तर नांदेड ,हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यात जिल्हा अधिकाऱ्यांनी 25 टक्के अग्रिम भरपाईसाठी अधिसूचना काढल्या आहेत .
या पिक विमा योजनेमध्ये, झालेल्या पावसातील खंड आणि दुष्काळ या स्थितीत झालेल्या पिकाचे नुकसान , आणि ते नुसकसान त्या मंडळाच्या गेल्या सात वर्षातील सरासरी उत्पादनापेक्षा 50 टक्क्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता असेल तर जिल्हा अधिकारी पिक विम्याची 25 टक्के अग्रिम भरपाई देण्याची अधिसूचना काढण्याची शक्यता आहे .यानुसार परभणी,हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी 25 टक्के अग्रिमभरपाई देण्यासाठी अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत .
agrim pik vima काय असतो अग्रिम
जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रीमच्या अधिसूचना काढल्या आहेत. पण मात्र अजून विमा कंपन्यांनी याविषयी कोणतीही भूमिका घेतलेली नाही अशी माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ असा की, विमा कंपन्यांनी अग्रिम देण्याची तयारी दाखवली नाही आणि विरोधी केला नाही .विमा कंपन्या या विरोधात विभागीय आयुक्तालयाकडे अपिलात जाऊ शकतात .आणि या विभागीय आयुक्तालयाचा निर्णय मान्य नसल्यास राज्याच्या आयुक्तालयाकडे अपिल करू शकतात .
हे वाचा : 7 लाख शेतकऱ्यांना 2100 कोटीचा लाभ
agrim pik vima राज्याच्या आयुक्ताचा निर्णय मान्य असेल तर विमा कंपन्या केंद्रीय समितीकडे अपिल करू शकतात .म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ,राज्य पातळीवरचा प्रत्येक टप्प्यावरचा निर्णय हा विमा कंपन्यांना नाकारण्याचा अधिकार आहे . यामुळे विमा कंपन्या हा नेमका काय निर्णय घेतात? याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच जिल्हा अधिकाऱ्यांनी या जिल्ह्यामध्ये कापूस, सोयाबीन आणि तुरीसह इतर काही पिकांसाठी अग्रिमची अधिसूचना काढण्यात आली .पण विमा कंपन्यांनी काही पिकांना अग्रिम देण्यासाठी सध्या तरी नाकार देण्यात आलेला आहे अशी माहिती आहे.
दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांअंतर्गत शेतकऱ्यांनी पूर्व सूचना दिले आहेत. बहुतांश मंडळांनी नुकसान हे सर्वत्र म्हणजेच वाईड स्प्रेडमध्ये गेले . वाईड स्प्रेडमध्ये त्या मंडळात रॅडम सर्व्हे होतात .झालेल्या नुकसानुसार भरपाई काढण्यात आली आहे .आलेल्या भरपाईतून फक्त 25% आता दिली जाईल आणि उरलेली भरपाई पीक कापणीनंतर मंजूर झाली तरच दिली जाईल .
agrim pik vima उर्वरित रक्कम मात्र 25 टक्के आग्रिम भरपाई आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून वाईड स्प्रेमधून 25 टक्के भरपाई यामुळे शेतकऱ्यांचा मनामध्ये खूप गोंधळ निर्माण होत आहे .परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये 25 टक्के अग्रिमच्या अधिसूचना काढण्याची चर्चा यामुळे सुरू झाली .पण आतापर्यंत फक्त 3 जिल्ह्यांमध्ये अग्रिमच्या अधिसूचना निघालेल्या आहेत .