अंबिया बहार पीक विमा अर्ज सुरू ; ‘ही’ आहे अंतिम तारीख : Ambiya Bahar Fal Pik Vima Yojana Arj 2024

Ambiya Bahar Fal Pik Vima Yojana Arj 2024 उत्पादन वाढीच्या दरामध्ये कृषी क्षेत्रात पिकांचा प्रामुख्याने समावेश होतो फळपिकांना बाजार मूल्य अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते परंतु फळपिकांचे पाहिजे तसे उत्पन्न न मिळाल्यास येणारा तोटाही जास्त असतो या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक प्राधान्य चांगली ठेवण्याच्या दृष्टीने मदत होईल त्या दृष्टीने फळपीक विमा योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ambiya Bahar Fal Pik Vima Yojana Arj 2024

विविध हवामान बदल आणि धोक्यामुळे फळ पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन खूप मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये घट निर्माण होते ना इलाजाने पाहिजे तसे उत्पादन न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो या सर्व गोष्टींचा शेतकऱ्यांना सामना करता यावा आणि त्यांचे नुकसान भरपाई व्हावी यासाठी राज्य सरकारने फळ पीक विमा योजना राबवली आहे.

हे वाचा : शेतीचे होणार डिजीटायझेशन

Ambiya Bahar Fal Pik Vima Yojana Arj 2024 कोणत्या पिकांचा समावेश ?

अंबिया बहारा मध्ये डाळिंब आंबा केळी संत्रा मोसंबी काजू द्राक्ष स्ट्रॉबेरी पपई अशा नऊ फळपिकांसाठी महसूल मंडळ घटक धरून हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवली जाते पिक विमा कंपन्या आणि अर्ज करण्याची तारीख आहे या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेली आहे फळा नुसार या विमा संरक्षित रक्कम आणि त्यामध्ये सहभागी होण्याची अंतिम मदतही निश्चित करून देण्यात आली आहे ती खालील प्रमाणे.

1) डाळिंब :- 14 जानेवारी 2025

2) द्राक्ष :- 30 ऑक्टोंबर 2024

3) मोसंबी :- 31 ऑक्टोंबर 2024

4) पपई :- 31 ऑक्टोंबर 2024

5) आंबा ( कोकण ) :- 30 नोव्हेंबर 2024

6) आंबा इतर :- 31 डिसेंबर 2024

7) केळी :- 31 ऑक्टोंबर 2024

8) काजू :- 30 नोव्हेंबर 2024

9) संत्रा :- 30 नोव्हेंबर 2024

फळपीक विमा राबवणाऱ्या जिल्ह्यानुसार विमा कंपन्या :

  • रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी : अमरावती धुळे पालघर अहमदनगर सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक वाशिम यवतमाळ नागपूर नंदुरबार
  • एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स : अकोला सांगली बीड वर्धा ठाणे औरंगाबाद हिंगोली सातारा परभणी लातूर जालना कोल्हापूर
  • भारतीय कृषी विमा कंपनी : रायगड पुणे बुलढाणा जळगाव नांदेड उस्मानाबाद

फळ पिक विमा साठी उत्पादनक्षम वय किती आहे ?

Ambiya Bahar Fal Pik Vima Yojana Arj 2024 आंबा पाच वर्षे, काजू पाच वर्षे, संत्रा तीन वर्ष, मोसंबी तीन वर्षे, सीताफळ तीन वर्ष, चिक्कू पाच वर्ष, लिंबू चार वर्षे, द्राक्ष दोन वर्ष, डाळिंब दोन वर्ष, आणि पेरू तीन वर्षे संकेत असे फळ पिक विमा योजनेसाठी उत्पादनक्षम वय निश्चित करण्यात आले आहे.

या योजनेबद्दल अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा :

https://krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/restructured%20weather%20based%20fruit%20crop%20insurence%20scheme%20GR.pdf

1 thought on “अंबिया बहार पीक विमा अर्ज सुरू ; ‘ही’ आहे अंतिम तारीख : Ambiya Bahar Fal Pik Vima Yojana Arj 2024”

Leave a comment