Annasaheb Patil BinVyaji Karj Yojana 2024 महाराष्ट्र शासन द्वारे राबवल्या जाणाऱ्या अण्णासाहेब पाटील कर्ज योजना विषयी आज आपण आपल्या या लेखामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत यासोबतच अर्जदार व्यक्तीला किती रुपये पर्यंत कसे कर्ज मिळणार याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
राज्यांमधील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेद्वारे एकूण 50 लाख पर्यंत कर्ज दिले जाणार आहे यामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे व्याज स्वरूपात एक रुपया देखील घेतला जाणार नाही झिरो टक्के व्याजदरावर बिनव्याजी कर्ज शासन उपलब्ध करून देणार आहे.
Annasaheb Patil BinVyaji Karj Yojana 2024 पात्रता काय आहे ?
- अर्जदार उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा
- पुरुष उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 50 वर्ष असावे
- महिला उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 55 वर्षे असावे
- पुरुष महिला उमेदवार अर्जदार हे मराठा समाजातील असावेत
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे फायदे :
- Annasaheb Patil BinVyaji Karj Yojana 2024 तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा अगोदरचा व्यवसाय असेल तर तो वाढवण्यासाठी त्याचा विस्तार करण्यासाठी 10 लाख ते 50 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते
- अर्जदाराला मिळणारे कर्ज हे मंडळाद्वारे बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे आणि कर्जावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे परतफेड केले जाणार आहेत
- जर उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड केली किंवा मुदतीमध्ये हप्ते भरले तर व्यक्तीला कर्जावरील व्याजाची 12 टक्के रक्कम मिळणार आहे यासोबतच ही रक्कम लाभार्थी अर्जदाराच्या बँक खात्यावर प्रति महिन्याला जमा देखील केली जाणार आहे
Annasaheb Patil BinVyaji Karj Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- अर्जदाराचा फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- व्यवसाय अहवाल
- फोटो
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- सर्वप्रथम अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल
- साईटवर गेल्यानंतर तेथे तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी करून घ्यायची आहे यासाठी ची माहिती विचारली जाईल ती तिथे भरावी लागेल आणि साईटवर लॉगिन करावे लागेल
- त्यानंतर होम पेज वरील अर्ज करण्यासाठी या पर्यायावर क्लिक करा तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल ते तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे सोबतची आवश्यक माहिती विचारली जाईल ती देखील भरायचे आहे
- फॉर्म मध्ये व्यवसायाची संपूर्ण माहिती टाकणे आवश्यक आहे सोबतच जी कागदपत्रे विचारले आहेत ते सर्व स्कॅन करून अपलोड करावी लागतील
- अशा पद्धतीने तुम्ही अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता