Atal Bandhkam Kamgar Yojana 2024 बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत स्वतःची जागा नसल्यामुळे कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.
यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य एक लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार आशिष जयस्वाल निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी विविध विषयांचा आढावा घेतला आहे.
Atal Bandhkam Kamgar Yojana 2024 बैठकीसाठी उपस्थित मान्यवर :
कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दूरदर्शन संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठकीमध्ये सहभाग घेतला होता बैठकीसाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे आमदार आशिष जयस्वाल अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव आभास शुक्ला, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, नगररचनाकार प्रतिभा भदाणे आधी उपस्थित होते.
जागा खरेदीसाठी एक लाख रुपये अर्थ सहाय्य :
Atal Bandhkam Kamgar Yojana 2024 जिल्हा नियोजनाच्या निधीमधून अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या माध्यमातून सौरभ विद्युत संच देण्याच्या सूचना देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जिल्हा योजनांमधील अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी राखीव निधी मधून रस्ते नाले प्रकाशव्यवस्था ही कामे करण्यात येणार आहेत परंतु या कामाची आता पुनरावृत्ती होत आहे.
याऐवजी पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सौर योजनेच्या माध्यमातून सौर विद्युत संच दिल्यास वीज देयकातून याला भारतीयांची कायमची सुटका होणार आहे तसेच अनुसूचित जाती योजनांसाठी असलेल्या जिल्हा नियोजन निधीमधून जिल्हा परिषद आणि राज्यस्तरीय यंत्रणांना काम करण्याची परवानगी दिली जावी आदिवासी क्षेत्रांमधील शेतकऱ्यांना सौर पंप सहज विंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे :
- सक्षम प्राधिकरणाने नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळख पत्राची प्रत
- आधार कार्ड
- 7/12 उतारा/ मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र/ ग्रामपंचायत मधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा
- लाभ धारकाचे स्वतःच्या नावे कार्यरत असलेल्या बचत खात्याच्या पासबुक झेरॉक्स
- प्रधानमंत्री आवास योजने मध्ये पात्र असल्याबाबतचे सक्षम अधिकाराचे पत्र Atal Bandhkam Kamgar Yojana 2024
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म