बेबी केअर किट योजना baby care kit government
baby care kit government
महाराष्ट्र राज्य सरकारने नवजात बालकांसाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बेबी केअर किट योजना राबवण्यात आलेली आहे. ही योजना 2019 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, या योजनेअंतर्गत कोणत्या वस्तू मिळतात, याचा अर्ज कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत .
बेबी केअर किट ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आहे. या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे 26 जानेवारी 2019 पासून सुरू करण्यात आली. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्व महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जवळच्या शासकीय रुग्णालयात पहिल्या प्रसुतीच्या वेळी जन्माला येणाऱ्या बालकला बालाच्या उपयोगातील बेबी केअर किट योजनेचा लाभ दिला जातो.
या योजनेचा लाभ हा महिलांना शासकीय रुग्णालयात गरोदरपणाची नोंदणी झाल्यानंतर व डिलिव्हरी झाल्यानंतर त्या महिलेने दोन महिन्याच्या आत मध्ये अर्ज सादर केल्यावर गरोदर महिलेच्या पहिल्या प्रस्तुतीच्या वेळी लहान बाळाला बेबी केअर किट चा लाभ दिला जातो. या बेबी केअर किट मध्ये काय काय वस्तू मिळतात ते आपण पाहूया.
बेबी केअर किट योजना मध्ये दिल्या जाणाऱ्या वस्तू
.आपण या योजनेमध्ये बेबी केअर किट मध्ये दिल्या जाणाऱ्या वस्तू खालील प्रमाणे पाहूया.
- हात मोजे
- पाय मोजे
- खेळणी
- नीलकटर
- लहान बाळासाठी कपडे
- छोटी गादी
- टॉवेल
- तेल शरीर मालिश
- मच्छरदाणी
- आईसाठी गरम कपडे
- बॉडी वॉश लिक्विड
- शाम्पू
- सॅनिटायझर
- थर्मामीटर
- थंडीपासून बचाव
बेबी केअर किट योजना सर्व वस्तू लहान बालकांसाठी बेबी केअर किट मध्ये दिल्या जातात.
बेबी केअर किती योजनेचे उद्दिष्टे
- या योजनेअंतर्गत नवजात बालकांना अति आवश्यक वस्तू पुरवल्या जातात.
- या योजनेचा असा उद्देश आहे की बाल मृत्यू दर कमी करणे.
- नवजात बालक व बाळंतीण महिलेला सुरक्षितीता पुरविने .
- या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये किमतीचे बेबी केअर किट दिली जाते.
बेबी केअर किट चा लाभ कसा घ्यायचा
baby care kit government
बेबी केअर किट योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम महिलांनी पहिला प्रस्तुतीच्या वेळी आपण आपले नाव नोंदणी शासकीय रुग्णालयात करणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रस्तुती नंतर दोन महिन्याच्या आत महिलांना बेबी केअर किट योजनेसाठी अर्ज करावा लागतो.
बेबी केअर किट योजना
बेबी केअर किट योजनेचा अर्ज कसा करायचा
- सर्वप्रथम महिलांन बेबी केअर किट योजनेसाठी एक अर्ज भरावा लागतो.
- तो अर्ज भरून आपण आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे फॉर्म जमा करावा लागतो.
- तो अर्ज अंगणवाडी सेविकास स्वीकारतील आणि योग्य कागदपत्रे घेऊन पुढील कार्यालयाकडे पाठवतील
- बेबी केअर किट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतो.
बेबी केअर किट मागणी अर्ज पीडीएफ बेबी केअर किट मागणी अर्ज
बेबी केअर किट योजना पात्रता
- या योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील महिलांना दिला जाईल
- या योजनेचा लाभ प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सरकारी रुग्णालयात जन्म होणाऱ्या सर्व नवजात बालकांना दिला जातो.
- महिलेच्या पहिल्या प्रस्तुतीच्या वेळेस बेबी केअर किट योजनेचा लाभ दिला जाईल.
विचारले जाणारे प्रश्न
- बेबी केअर किट ही योजना कधी सुरू करण्यात आली?
- बेबी केअर किट ही योजना महाराष्ट्र शासनाद्वारे 26 जानेवारी 2019 पासून सुरू करण्यात आली.
- बेबी केअर किट योजनेमध्ये कोणकोणत्या वस्तू दिल्या जातात?
- बेबी केअर किट मध्ये खेळणी, हात मोजे, नीलकटर, लहान मुलांचे कपडे , छोटी गादी , टॉवेल, तेल मालिश, मच्छरदाणी, शाम्पू, आई साठी गरम कपडे, बॉडी वॉश लिक्विड, सॅनिटायझर, थंडीपासून बचाव, थर्मामीटर या सर्व वस्तू बेबी केअर किट मध्ये दिल्या जातात.
- बेबी केअर किट योजनेचा लाभ कधी मिळतो?
- बेबी केअर किट योजनेचा लाभ प्रस्तुतीनंतर दोन महिन्याच्या आत मिळतो.
- बेबी केअर किट योजनेचा लाभ महिलांना कधी दिला जातो?
- बेबी केअर किट योजनेचा लाभ महिलांना पहिल्या प्रस्तुतीच्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा सरकारी रुग्णालयात जन्म होणाऱ्या नवजात बालकांना दिला जातो.