बालिका समृद्धी योजना देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित व्हावे. त्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार खूप साऱ्या योजना आखतात. मुलीच्या भविष्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या खूप सार्या योजना आहेत. मागील काही दिवसांमध्ये नवजात मुलीची जाणीवपूर्वक हत्या केली जायची स्त्रियांच्या जन्मास विरोध केला जात होता. त्या काळापासून मुलीचे प्रमाण खूप कमी झाले. त्यामुळे भारतात कायद्याने लिंग निदान बंदी आनली. तरी पण अजूनही स्त्रीभ्रूणहत्या पूर्णपणे थांबलेली नाही. यासाठी सरकारकडून मुलींसाठी विविध योजना राबवल्या जातात गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबातील मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या लग्नासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. तसेच आपण आज बालिका समृद्धी योजना लाभ या योजनेच्या माध्यमातून स्त्रीभ्रूणहत्या पूर्णपणे बंद करण्याचा सरकारचा हेतू आहे. मुलींना वाचविण्यासाठी त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी बालिका समृद्धी योजना लाभ ,अर्ज प्रक्रिया, पात्रता ,आवश्यक, कागदपत्रे ,या सर्वांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
योजनेचे नाव | बालिका समृद्धी योजना |
योजनेचे लाभार्थी | देशातील मुली |
उद्देश | मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यता प्रदान करणे. |
योजनेचा लाभ | शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करणे |
कोणी सुरू केली | भारत सरकार |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन / ऑफलाइन |
बालिका समृद्धी योजना माहिती
बालिका समृद्धी योजना 1997 मध्ये सुरू करण्यात आली 15 ऑगस्ट 1997 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या सर्व मुलींना आर्थिक मदत मिळेल. ही मदत ग्रामीण भागातील व शहरी भागातील दुर्बळ कुटुंबामध्ये जन्मलेल्या सर्व मुलींना दिली जाते भारत सरकारने देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी आणि भल्यासाठी खूप वर्षापासून अनेक योजना सुरू केले आहेत. देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या व गरीब कुटुंबातील मुलींना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे.
बालिका समृद्धी योजना (BSY) केंद्र सरकारने 1997 मध्ये सुरू करण्यात आले ही मुलींचे शिक्षण आणि जन्मासाठी हा एक मोठा उपक्रम म्हणून ओळखला जातो. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर रुपये 500 ची मदत केली जाते. त्यानंतर मुलगी दहावीपर्यंत पोहोचेपर्यंत तिला दरवर्षी ठराविक रक्कम मिळते ही सरकारची मदत त्या मुलीच्या शिक्षणाला देण्यासाठी आहे मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाले की ती बँकेतून ही रक्कम काढू शकतो 15 ऑगस्ट 1997 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली बालिका समृद्धी योजना 2023 चा लाभ घेण्यास पात्र आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला त्यानुसार अर्ज करणे आवश्यक आहे.
बालिका समृद्धी योजना ची उद्दिष्ट
- मुलीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करणे.
- गरीब व दारिद्र रेषेखालील मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेच्या आधारे मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचण नीला सामोरे जावे लागणार नाही याची खात्री करतो.
- मुलींना शिष्यवृत्ती देऊन आर्थिक मदत करणे व मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहित करणे हा या बालिका समृद्धी योजनेचा उद्देश आहे.
- कायदेशीर वयापर्यंत मुलीचे लग्न वाढवून त्यांना प्रोत्साहित करणे मुलीचा अल्पवाहिन विवाह थांबवणे
- मुलीच्या जीवनामध्ये शिक्षणासाठी आर्थिक संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- मुलींना उत्पन्न मिळवून देणारा उपक्रम मध्ये सहभागी होण्यासाठी सक्षम करणे तसेच मुलींना स्ववलंबी आणि आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी सक्षम करणे.
बालिका समृद्धी योजना शिष्यवृत्तीची रक्कम
मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी पीएम बालिका समृद्धी योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक पात्रतेनुसार महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या बालिका समृद्धी योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी पर्यंतच्या मुलींना शिष्यवृत्ती दिली जाईल जी खालील प्रमाणे आहे.
वर्ग | आर्थिक सहाय्यता रक्कम |
वर्ग पहिली ते वर्ग तिसरी. | तीनशे रुपये पर्यंत वर्ग / मानकांसाठी वार्षिक |
वर्ग चौथी. | पाचशे रुपये प्रति वर्ष |
वर्ग पाचवी | सहाशे रुपये प्रति वर्ष |
वर्ग सहावी आणि वर्ग सातवी | सातशे रुपये प्रति वर्ग/ मानकांसाठी वार्षिक |
वर्ग आठवी. | आठशे रुपये प्रति वर्ष |
वर्ग नववी आणि वर्ग दहावी | एक हजार रुपये प्रति वर्ग /मानकांसाठी वार्षिक. |
बालिका समृद्धी योजनेचा अटी व शर्ती
- नियमानुसार जास्तीत जास्त वयोमर्यादा अठरा वर्षे आहे.
- ग्रामीण भागातील व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुली
- झोपडपट्टी ,कचरा गोळा करणाऱ्या च्या मुली.
- ज्या व्यक्तीला दोन मुली आहेत त्यांना आपल्या दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
- भारतातील कोणतेही पोस्ट ऑफिस बचत बँकेचे काम करीत आहेत.
- कोणत्याही पोस्ट ऑफिस नियमानुसार एस एस वाय खाते उघडण्यास अधिकृत आहेत.
- (SSY) खाते उघडण्यासाठी रिझर्व बँकेने अधिकृत केलेली कोणतीही बँक .
- पालक अशी एक व्यक्ती आहे जी मुलीची अठरा वर्षापर्यंत होईपर्यंत मुलींची काळजी घेण्यासाठी कायद्यानुसार पात्र असलेली व्यक्ती असेल.
- लाभार्थ्या मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर खात्यातील रक्कम काढून शकेल .
- मुलगी अविवाहित असेल आणि त्याबाबतीत प्रमाणपत्र ग्रामपंचायत तीने किंवा महानगर पालिकेने जारी केलेले असले तरच असे पैसे काढण्याची परवानगी तिला आहे.
- लाभार्थ्या मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत ती चा मृत्यू झाला तर खात्यातिल जमा रक्कम काढता येईल.
- मुलीच्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी लाभार्थी मुलीचे शिक्षण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल.
- शिष्यवृत्तीची अनुदानाची रक्कम ही मुलीच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.
- लाभार्थीच्या खात्यात बालिका समृद्धी योजना अंतर्गत डायरेक्ट dbt द्वारे ही रक्कम मुलीच्या खात्यात हस्तांतरित केली जाते.
बालिका समृद्धी योजनेचा लाभ
या योजने अंतर्गत मुलीचा जन्म झाल्यावर आणि तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल.मुलगी जन्माला आली की तिचा विरोध केला जायचा पण या योजनेद्वारे नकारात्मक दृष्टिकोन सुधारेल.
ही योजना गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबातील मुलीच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी चालवली आहे.बालिका समृद्धी योजनेद्वारे मुलीच्या शिक्षण देण्यासाठी मुलीच्या पालकास खूप मोठा दिलासा मिळाला आहे. शिष्यवृत्तीची जमा केलेली जी रक्कम आहे ती लाभार्थी च्या नावाने उघडल्या जाणार व्याजाधारी बँक खात्यात जमा केले जाईल.
बालिका समृद्धी योजनेचे फायदे
- मुलगी जन्मल्यानंतर सरकार पाचशे रुपये मदत करेल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म 15 ऑगस्ट 1997 किंवा त्यानंतर झालेल्या असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी मुलगी दहावीत गेली की दरवर्षी एक ठराविक रक्कम दिली जाईल.
- ही सरकारची मदत मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दिली जात आहे.
- बालिका समृद्धी योजनेचा लाभ हा फक्त गरीब व दारिद्र्यरेषेखालील मुलींच घेऊ शकतात.
- लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला तर जमा झालेली रक्कम (BSY)अंतर्गत इतर पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी अंमलबजावणी एजन्सी द्वारे काढली जाईल.
लाभार्थ्या मुलीचे अठरा वर्षे पूर्ण होण्याआधी व तिचा विवाह झाला तर वार्षिक शिष्यवृत्तीची रक्कम आणि त्यावर जमा होणारे व्याज याचा लाभ सोडून देण्यात येईल आणि फक्त रुपये 500 च्या जन्मोत्तर अनुदान रकमेसाठी पात्र असेल . शिष्यवृत्तीची रक्कमेवर जमा झालेले व्याज अंमलबजावणी करणारी एजन्सी व्याज काढून घेण्यासाठी पात्र असेल
बालिका समृद्धी योजना पात्रता
- या योजनेअंतर्गत लाभार्थी हा अर्ज करण्यासाठी भारताचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत गरीब व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील जन्मलेल्या मुली बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे.
- या योजनेचा लाभ फक्त मुलीच घेऊ शकतात.
- 15 ऑगस्ट 1997 रोजी मुलीचा जन्म किंवा त्यानंतर झालेल्या असावा.
- या योजनेचा लाभ कुटुंबातील दोन मुलींना घेता येईल.
बालिका समृद्धी योजना कागदपत्रे
- लाभार्थ्याचे आधार कार्ड.
- लाभार्थ्याचे राशन कार्ड.
- लाभार्थी मुलीचा जन्म दाखला.
- लाभार्थी पालकाचे ओळखपत्र.
- लाभार्थीचा रहिवाशी दाखला.
- लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
- लाभार्थ्याचे बँक पासबुक.
- लाभार्थ्याची पासपोर्ट साईज फोटो.
- लाभार्थ्याचा मोबाईल नंबर.
वरील प्रमाणे दाखवलेली सर्व कागदपत्रे आवश्यक आहे.
बालिका समृद्धी योजना अर्ज करण्याची प्रक्रिया
तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य केंद्रातील कार्यकर्त्याकडे जाऊन अर्ज घ्यावा लागेल.
BSY च्या आधीकृत वेबसाईटवरून https://megsocialwelfare.gov.in/icds_balika.html ऑनलाईन अर्ज देखील डाऊनलोड करू शकतात.
यानंतर तुम्हाला अर्जात विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
तुमची सर्व माहितीची कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील. आणि भरलेला अर्ज आरोग्य कर्मचारी किंवा अंगणवाडी कर्मचाऱ्याकडे सबमिट करावा लागेल
बालिका समृद्धी योजना विचारले जाणारे प्रश्न
1 बालिका समृद्धी योजना एका कुटुंबातील किती मुली पात्र आहेत?
- बालिका समृद्धी योजना एका कुटुंबातील दोन मुली पात्रता आहेत
2 बालिका समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना किती शिष्यवृत्ती दिली जाते?
- बालिका समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना वर्ग पहिली ते वर्ग तिसरी तीनशे रुपये वार्षिक. वर्ग चौथी पाचशे रुपये प्रति वर्ष वर्ग पाचवी सहाशे रुपये प्रति वर्ष वर्ग सहावी आणि वर्ग सातवी सातशे रुपये प्रति वार्षिक वर्ग आठवी आठशे रुपये प्रति वर्ष वर्ग नववी आणि वर्ग दहावी, हजार रुपये प्रत्येकी वर्ग/ मानकांसाठी वार्षिक आशा प्रकारे शिष्यवृत्ती दिली जाते.
3 बालिका समृद्धी योजना कधीपासून सुरू करण्यात आली?
- बालिका समृद्धी योजना 15 ऑगस्ट 1997 रोजी पासून च्या मुली या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात.
4 बालिका समृद्धी योजना चा उद्देश काय आहे?
- बालिका समृद्धी योजनेचा उद्देश गरीब व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यता प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
3 thoughts on “बालिका समृद्धि योजना”