Bandhkam kamgar : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील इमारत व बांधकाम कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी व आर्थिक मदत देण्यासाठी राज्यामध्ये बांधकाम कामगार योजना सुरू केली. या योजनेमध्ये नोंदणी करत असणाऱ्या लाभार्थ्यांना बांधकाम कामगार योजनेतून अनेक लाभ वितरित केले जातात. बांधकाम कामगार नोंदणी करत असणाऱ्या कामगारांना राज्य शासनाकडून भांडे संच देखील वाटप केला जातो. कामगारांना मिळणारा भाडे संच हा लाभ कसा मिळतो कोणाला मिळतो व याचा लाभ कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. bandhkam kamgar

नोंदणी कृत कामगारांना भांडी संच
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणी करत असणाऱ्या बांधकाम कामगारांनाच भांडी संच वाटप केले जातो. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना आणि नोंदणी मंजूर झालेल्या कामगारांना भांडी संच वाटप केला जातो. भांडी संच मिळवण्यासाठी अर्जदाराचा अर्ज मंजूर असणे आवश्यक आहे. तालुका सेतू सुविधा केंद्राने अर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदाराला भांड्यासाठी अर्ज सादर करावा लागतो. हा अर्थ सादर केल्यानंतर बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप केला जातो.Bandhkam kamgar
हे वाचा : बांधकाम कामगार दुरूस्ती अर्ज पीडीएफ.
कधी मिळतो लाभ
नोंदणी केलेल्या बांधकाम (Bandhkam kamgar) कामगारांना भाड्याचा संच वाटप केला जातो. नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा संच दिला जातो. ज्या लाभार्थ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे आणि एक रुपयाचे चलन भरले आहे अशा बांधकाम कामगारांना भांडी संचसाठी अर्ज करता येतो. जर आपली नोंदणी मंजूर नसेल किंवा आपण एक रुपयाचे चलन भरले नसेल तर आपल्याला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या भांडी संचसाठी अर्ज सादर करता येणार नाही.
आपला आज अर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्याला भांडी संचसाठी अर्ज करता येतो. आपल्या जिल्ह्याला भाड्यांचा स्टॉक उपलब्ध असल्यास आपल्याला भांडी संच किट दिली जाते. प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळे टारगेट देण्यात आलेले आहेत. या टार्गेट नुसार शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी भांडी संच वितरित केले जातात. जिल्हा बांधकाम (Bandhkam kamgar) कामगार कार्यालयाकडून बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप केले जातात. जिल्हा बांधकाम कार्यालयामध्ये स्टॉक उपलब्ध असेपर्यंत भाड्याचा संच वाटप केला जातो. भाडी संच स्टॉक संपल्यानंतर नवीन स्टॉक उपलब्ध झाल्यावर बांधकाम कामगारांना भांडी संच वितरित केला जातो.Bandhkam kamgar
भांडे संच मध्ये कोणत्या वस्तू मिळतात
सरकारकडून इमारत व बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप केला जातो. या भांडी संच मध्ये संसार उपयोगी वस्तू दिलेले असतात. या संच मध्ये कोणत्या वस्तू असतात व किती असतात याची माहिती खालील प्रमाणे:-
- जेवणाच्या ताटाचे चार नग
- वाट्या आठ नग
- पाण्याचे क्लास चार नग
- पातेले झाकणासोबत दोन नग
- भात वाढण्याचा चमचा एक नग
- वरण वाढण्याचा चमचा एक नग
- पाण्याचा जग एक नग
- मसाला डबा एक नग
- साठवणूक डब्बा झाकणासोबत तीन नग
- परात एक नग
- प्रेशर कुकर एक नग
- कढई एक नग
- स्टीलची पाण्याची टाकी एक नग
या वरील लिस्ट प्रमाणे बांधकाम कामगारांना भांडी संच मध्ये वस्तू वितरित केल्या जातात. बांधकाम कामगारांना संसार उपयोगी वस्तू दिल्या जातात. या दिल्या जाणाऱ्या भांड्यांची गुणवत्ता चांगल्या प्रकारचे असून दैनंदिन वापरासाठी हे भांडे उपयुक्त आहेत. विशेष म्हणजे दिले जाणारे सर्व भांडेही स्टीलची आहेत ज्यामुळे अधिक काळ वापरता येतात.
राज्य शासनाने सुरू बांधकाम कामगार (Bandhkam kamgar) योजना. योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप केला जातो. हा एक राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या भांडी संस्थेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना संसार उपयोगी सर्व भांडे दिले जातात. बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी कामगारांना फक्त एक रुपया एवढाच खर्च येतो. जर आपण बांधकाम कामगार असाल आणि अद्याप पर्यंत आपण नोंदणी केली नसेल तर आपण बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. जेणेकरून आपल्याला या योजनेअंतर्गत मिळणारे सर्व लाभ प्राप्त होतील.Bandhkam kamgar