Bandhkam kamgar pension: बांधकाम कामगारांना दिले जाणार पेन्शन; कोणत्या कामगारांना मिळणार लाभ!

Bandhkam kamgar pension : राज्यातील बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने राज्यांमध्ये महाराष्ट्र व इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ सुरू केले. नोंदणी करत असणाऱ्या बांधकाम कामगारांना आता सरकारकडून खास गिफ्ट देण्यात आलेले आहे. सरकारने केलेल्या गोष्टीनुसार आता राज्यातील इमारत व बांधकाम कामगारांना पेन्शन दिली जाणार आहे. असा महतपूर्ण निर्णय याची घोषणा राज्याचे श्रम व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधिमंडळात केली आहे. या निर्णयाचे हजारो बांधकाम कामगारांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.

राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन (Bandhkam kamgar pension) दिले जाणार आहे. आता हे पेन्शन कोणत्या बांधकाम कामगारांना दिले जाणार. तसेच कशा पद्धतीने देण्यात येणारं. यामध्ये वयाची अट काय असणार? कोणते बांधकाम कामगार यामध्ये पात्र राहणार ?याची देखील माहिती घेणे महत्त्वाचे राहील. Bandhkam kamgar pension

Bandhkam kamgar pension

का मिळणार पेन्शन

बांधकाम कामगाराच्या आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून निवृत्तीनंतरही बांधकाम कामगारांना शासनाकडून पेन्शन (Bandhkam kamgar pension) दिली जाणार आहे. या पेन्शनच्या माध्यमातून त्यांचे निवृत्ती नंतरचे भविष्य सुरक्षित करण्याचा राज्य शासनाचा हा हेतू आहे. बांधकाम कामगारांचे तसेच त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुधारण्यासाठी ही पेन्शन योजना राज्य शासन अमलात आणत आहे. अनेक बांधकाम कामगारांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. ज्यामुळे निवृत्तीनंतर बांधकाम कामगारावर आर्थिक तणाव निर्माण होणार नाही यासाठी पेन्शन योजना सुरू करण्यात येत आहे. Bandhkam kamgar pension

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Kanda Anudan  Kanda Anudan :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा! 28 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर, तुम्हाला मिळणार का? लगेच पहा

हे वाचा : घरकुलाच्या अनुदानात झाली वाढ! आता लाभार्थ्यांना किती मिळणार अनुदान.

कोणाला मिळणार पेन्शन

राज्याचे श्रम व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार. बांधकाम कामगारांना 18 ते 60 या वयोगटांमध्ये अनेक लाभ दिले जातात. परंतु बांधकाम कामगारांना साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा लाभ दिला जात नाही. त्यामुळेच बांधकाम कामगारांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याबाबत निर्णय घेतला आहे. बांधकाम कामगाराचे वय वर्ष साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कामगारांना मंडळातून मिळणाऱ्या सर्व लाभ बंद केले जात होते. यापुढे बांधकाम कामगारांना साठ वर्षानंतर देखील पेन्शन दिली जाणार आहे. Bandhkam kamgar pension

किती मिळणार पेन्शन

बांधकाम कामगारांना वय वर्ष साठ पूर्ण झाल्यानंतर त्यांना पेन्शन (Bandhkam kamgar pension) देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनासमोर ठेवण्यात आलेला आहे. या प्रस्तावामध्ये बांधकाम कामगारांना वर्षाला बारा हजार रुपये एवढे पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्यामध्ये बांधकाम कामगारांना प्रत्येक महिन्याला 1000 रुपये या प्रमाणात पेन्शन वितरित केले जाईल. निवृत्तीनंतर म्हणजेच बांधकाम कामगारांचे वय वर्ष साठ पूर्ण झाल्यानंतर बांधकामकारांना महिन्याला 1000 रुपये पेन्शन सरकारकडून दिले जाणार आहे.

हे पण वाचा:
Protsahan Anudan शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 50 हजार प्रोत्साहन योजना सुरू, पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ.Protsahan Anudan

कशी असेल प्रक्रिया

राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय बांधकाम कामगारांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्य शासन बांधकाम कामगारांना लाभ देण्यासाठी सरकारच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचा आणि कायद्यातील तरतुदींचा विचार करून याबाबत सविस्तर प्रक्रिया तयार करणार आहे. शासनाने तयार केलेल्या प्रक्रियेच्या माध्यमातून लाभ कसा मिळेल याबाबत सर्व अटी नियम शर्ती समोर येथील. सध्या याबाबत राज्य शासनाने फक्त प्रस्ताव मांडला आहे हा प्रस्ताव मंजूर करून या प्रस्तावात अनेक तरतुदी नियमाची अट टाकून लाभ कसा द्यायचा याबाबत स्पष्टता जाहीर केली जाईल. अशी माहिती मंत्री फुंडकर यांनी दिलेली आहे. Bandhkam kamgar pension

हे पण वाचा:
Crop Insurance Nuksan Bharpai List शेतकऱ्यांना दिलासा! 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, पहा जिल्ह्यांची यादी.Crop Insurance Nuksan Bharpai List

Leave a comment