ई पीक पाहणी 2024 -अशी करा आपल्या मोबाइल वरुन

ई पीक पाहणी E Pik Pahani

ई पीक पाहणी महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलेल्या सूचनेनुसार सर्व शेतकऱ्यांना  ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे शासनाच्या माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीकपेरा  या अभियानांतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारेवर करणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना ई  पीक पाहणी कशी करावी याबद्दल पुरेशी माहिती नाही या लेखातून आज आपण स्वतः … Read more

Wireless Alert : वायरलेस अलर्ट 2024

Wireless Alert : वायरलेस अलर्ट 2023

Wireless Alert : वायरलेस अलर्ट 2023            आज दि 20/07/2023 रोजी जवळपास आपण सर्वांच्या मोबाईलवर Wireless Alert : वायरलेस अलर्ट 2023  अलर्ट पहायला मिळाला आहे त्या बद्दल कसलीही भीती मनात वाटण्याचे काही कारण नाही.  तो आलेला अलर्ट कशाबद्दल आला आहे तसेच त्या बद्दलयाची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.    प्राथमिक … Read more

कुसुम सोलार पंप – पीडीएफ अपडेट 2023 Alert

कुसुम सोलार पंप पीडीएफ अपडेट 2023 Alert

कुसुम सोलार पंप –  पीडीएफ अपडेट 2023          नमस्कार शेतकरी बांधवांनो आपणास सध्या  कुसुम सोलार पंप पीडीएफ अपडेट 2023 , व्हॉट्सॲप ग्रुप एक एक्सेल फाईल आलेली आहे ज्या मध्ये प्रत्येक जिल्ह्याची एक यादी आपणास पाहण्यास मिळत आहे. ती नेमकी कशा पद्धतीची यादी आहे यादिलीत लाभार्थी शेतकरी यांना पुढील काय प्रक्रिया करावी लागणार … Read more

crop insurance – csc vle- यांना येणार्‍या अडचणी 2024

crop insurance CSC VLE

crop insurance 2023 csc vle          नमस्कार बांधवांनो आज आपण CSC VLE केंद्र चालक यांना  crop insurance पीक विमा अर्ज करताना येणार्‍या अडचणी बद्दल माहिती पाहणार आहोत. आपण दर वर्षी पीक विमा अर्ज करत आहोत. परंतु प्रत्येक वर्षी शासन / विमा कंपनी  काही तरी नवीन नियम आणत असते. जसे या वर्षी सर्व … Read more

Pik Vima 2024 – असा भरा ऑनलाइन पीक विमा

Pik Vima 2023

Pik Vima 2024  असा भरा ऑनलाइन पीक विमा.            नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण कोठे ही न जाता स्वता च्या मोबाईल वरुण आपला पीक विमा अर्ज कसा भरावा या बद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकर्‍यासाठी  1 रु मध्ये पीक विमा ही योजना राबवली आहे. आपल्या धावपळीमुळे आपणास बँक/CSC  सेंटर … Read more

Milking Machine Price – दुध काढणी यंत्र

milking machine

दुध काढणी यंत्र. Milking Machine Price

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज दुग्ध व्यवसायासाठी महत्त्वाचे असणारे मशीन म्हणजे दूध काढणी यंत्र याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. खरंच  बघितलं तर भारत देश हा जगात दूध उत्पादनासाठी प्रथम स्थानावर आहे परंतु बाहेरील देशातील जेवढे तंत्रज्ञानचा वापर केला जातो तेवढा तंत्रज्ञानाचा  भारततात दुग्ध व्यवसायासाठी वापरले जात नाही.दुग्ध व्यवसाय हा आधी शेतीस पूरक व्यवसाय म्हणून संबोधला जायचा परंतु आज मागणी वाढल्याने आजच्या  काळात दुग्ध व्यवसाय एक प्रमुख व्यवसाय बनला आहे.या व्यवसायातून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली आर्थिक प्रगती केली आहे.या व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपल्या उत्पादनात दहा ते वीस टक्के पर्यंत वाढ नक्कीच होईल.

दुध काढणी यंत्र

मागील काही वर्षापासून नवीन तंत्रज्ञाचा  वापर करून दुग्ध व्यवसायिकांनी कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न मिळवले आहे.भारतात गेल्या काही वर्षापासून वेगवेगळ्या समूहाकडून दूध काढणी यंत्राची निर्मिती केली जाते. याच्या किमतीहि  शेतकऱ्यांना परवडण्या सारख्या  आहेत.

दुध काढणी यंत्राचे फायदे. 

आपण जर पाहिले तर हाताने धार काढण्यास शेतकऱ्यांचा जास्त वेळ जातो. जर अपणाकडे जास्त प्रमाणात जनावरे असतील तर आपणास मजुरांवर अवलंबून राहावे लागते. जर आपल्या जवळ Milking Machine दूध काढणी यंत्र असेल तर आपणास जास्त वेळ लागणार नाही आणि घरातील कोणतीही व्यक्ती या मशीन च्या साह्याने धार काढू शकतो.

मजुरांवरील खर्च कमी होऊन आपल्या व्यवसायात नफ्याचे प्रमाण देखील वाढते.

जनावराच्या कासेला इजा होत नाही. वेळ कमी लागल्यामुळे जनावरे पान्हा मारत नाहीत. एकच वेळी चार ही सडा मधुन दूध निघते दुधाचे दर्जा चांगला मिळतो. मशीन चा वापर केल्यास कासेला लागलेली घान दुधात मिसळत नाही व आपल्या दुधाची गुणवत्ता उच्च प्रतीची मिळते.मशीन चा वापर केल्यास आपणास 10ते 20% उत्पन्न सुद्धा  जास्त मिळते.

दुध काढणी यंत्राचा वापर 

दूध काढणी यंत्र हाताळणे अगदी सोप्या पद्धतीचे आहे. नवीन नवीन आपणास हे मशीन वापण्यास अडचनी येऊ शकतात.परंतु योग्य प्रशिक्षण घेऊन आपण सहजरित्या या मशीनचा वापर करू शकतो. तसेच आपण ज्या कंपनीची मशीन घेतो त्यांच्या कडून सुद्धा  आपणास प्रशिक्षण दिले जाते.

दुध काढणी यंत्राच्या किमती 

दूध काढणी यंत्रामध्ये यंत्रामध्ये

१)  सिंगल बकेट दूध काढणी यंत्र

२) डबल बकेट दूध काढणी यंत्र

३) फोर बकेट दूध काढणी यंत्र

४)सिक्स बकेट दूध काढणी यंत्र

असे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांच्या प्रकारानुसार त्यांच्या किमती ठरवलेल्या असतात.

 

 

SINGLE BUCKET

Read more

Damini App-वीज पडण्याआधीच मिळणार माहिती

Damini App

Damini App              नमस्कार बांधवांनो आपण नेहमीच आपल्या आजूबाजूला वीज पडून घडलेल्या घटना पाहिल्या आहेत कधी मनुष्यहानी तर कधी पाळीव प्राणी अशा बातम्या आपण नेहमीच ऐकतो खरंच जर अशी हानी होण्याआधीच आपल्याला समजले तर किती छान होईल. अशीच माहिती मी आपणास या लेखातून देण्यात प्रयत्न करत आहे.       … Read more

Goverment subsidy – अशी मिळणार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 2024

Goverment subsidy

  Goverment subsidy – अशी मिळणार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 2023: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आज शासनाने नव्याने सुरू केलेली   अनुदानाची पद्धत या विषयी माहिती पाहणार आहोत. जुन्या  पद्धतीनुसार शासकीय अनुदान मिळण्यास खूप विलंब होत होता. हा विलंब कमी करण्यासाठी व शेतकऱ्याला त्वरित अनुदानाचा लाभ मिळावा  याकरिता शासनाने नव्याने DBT (Direct Benefit Transfer) अनुदान प्रक्रिया सुरू … Read more

Crop Insurance – शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपया मध्ये पिक विमा

Crop Insurance - शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपया मध्ये पिक विमा

Crop Insurance – शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपया मध्ये पिक विमा शेतकरी बांधवांनो crop insurance – राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपयांमध्ये पिक विमा. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा crop insurance  मिळणार याची घोषणा केली.राज्यातील शेतकऱ्यांना आता एक रुपयांमध्ये पिक विमा मिळणार आहे बाकीचा हिस्सा  राज्य शासन स्वतः भरणार … Read more

Mahaurja कुसुम सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र – आपण पात्र की अपात्र

Mahaurja कुसुम सौर कृषी पंप योजना 2

            Mahaurja कुसुम सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र – आपण पात्र की अपात्र नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज पाहणार आहोत की ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप योजनेत अर्ज केला आहे ते शेतकरी पात्र आहेत की अपात्र आहे या लेखातून आपण स्वतः या योजनेकरिता पात्र आहोत की अपात्र आहोत हे समजून घेऊया.दिनांक 17 मे 2023 पासून mahaurja  कुसुम सौर पंप कंपाउंड बी साठी नवीन नोंदणी चालू झालेली आहे सुरुवातीच्या काळात संकेतस्थळावर भरपूर प्रमाणात लोड येत असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यास खूप मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या कोठा उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना अर्ज सादर करणे शक्य होत नव्हते परंतु नंतर संकेतस्थळाला व्यवस्थित करून नवीन नोंदणी करणे सोयीस्कर  करण्यात आले आहे व बऱ्याच शेतकऱ्यांनी कुसुम सौर पंप कंपाउंड बी साठी अर्ज सादर केलेले आहे. आपण अर्ज तर सादर केलाय परंतु आपला अर्जाची पुढील प्रक्रिया काय असते पात्र शेतकरी व अपात्र शेतकरी कश्या पद्धतीने ठरवले जातात. त्याचे कोणते निकष असे आहेत ज्यातून आपला अर्ज अपात्र ठरू शकतो या या सर्व आपल्या मनात येणाऱ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आज या लेखामध्ये मिळणार आहेत.सोबतच एक कुसुम सौर पंप बसवण्यासाठी  आपणास किती खर्च येतो.अशा सर्व प्रश्नाची उत्तरे आपणास मिळणार आहेत.

Mahaurja कुसुम सौर कृषी पंप योजना 2

 

 

Mahaurja कुसुम सोलर सौर पंप योजना काय आहे ? 

महाउर्जा कुसुम सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अमलात आणलेली आहे. याचा उद्देश असा आहे कि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे व शेतकर्यांना दिवसा सिंचनासाठी विद्युत पुरवठा करता यावा ह्या हेतूने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त आयोजनातून Mahaurja  कुसुम सौर पंप योजना राबवण्यास सुरवात झाली आहे.

Mahaurja अर्ज कोण करू शकतो ?

        mahaurja कुसुम सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र साठी वैयक्तिक  शेतकरी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक संघटना या पैकी कोणीही कुसुम  सोलर पंप साठी अर्ज करू शकतात .

अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत

कुसुम सोलर पंप साठी आपणास जर अर्ज करायचा असला तर आपणास १) आधार कार्ड २) सातबारा (ज्या वर सिंचनासाठी पाणी वापरत असलेल्या विहीर, बोअरवेल ( कुपनलिका ) शेततळे ,कालवा या पैकी एक नोंद सातबारेवर असणे आवश्यक आहे ),३)राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ४) एक पासपोर्ट साइज फोटो हे कागदपत्र आपणास नोंदणी साठी आवश्यक आहेत.

कुसुम सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र नोंदणी कशी करावी 

https: // kusum. mahaurja .com/ solar / beneficiary/ register/ Kusum- Yojana- Component- B  

या संकेतस्थळा वर जा तिथे आपणास आधार नंबर, आपला राज्य, आपला जिल्हा, आपला तालुका, आपले गाव (ज्या ठिकाणी आपली  जमीन आहे)  आपला मोबाईल नंबर, आणि आपला प्रवर्ग, निवडा व नंतर पेमेंट फॉर ऑनलाइन एप्लीकेशन यावरती क्लिक करा पेमेंट करून घ्या. पेमेंट केल्यानंतर आपण नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो  ओटीपी समोर आलेल्या कॉलम मध्ये भरून सबमिट करा त्यानंतर आपल्या मोबाईलवर एम के आयडी आणि पासवर्ड मिळेल तो एमके आयडी पासवर्ड घेऊन https://kusum.mahaurja.com/beneficiary/ बेनेफेसरी  लॉगिन यावर टाकून लॉगिन करावे व आपली संपूर्ण माहिती पूर्ण भरून घ्यावी  व आपले कागदपत्रे अपलोड करा सर्वात शेवटी सबमिट ऑप्शन ला क्लिक करा अशा प्रकारे आपला अर्ज दाखल होईल.

आपण अर्ज केल्या नंतर पुढील प्रक्रिया 

आपण केलेल्या अर्जाची महाऊर्जामार्फत छाननी केली जाते ज्यामध्ये आपण भरलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित आहे का आपण अपलोड केलेले सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत का स्पष्ट दिसतात का सातबारावर(विहीर, बोअरवेल ( कुपनलिका ) शेततळे ,कालवा ) जलस्त्रोत नोंदणी केली आहे का.आपण याआधी दुसऱ्या  कोणत्या(उदा. मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना,कुसुम सौर पंप योजना घटक अ ,अटल कृषी सौर पंप योजना )  योजनेतून सौर पंप लाभ घेतलेला आहे का अशा सर्व बाबी महाऊर्जामार्फत तपासल्या जातात.

 कुसुम सौर कृषी पंप योजना आपला अर्ज  पात्र की अपात्र असे करा चेक 

आपल्या अर्जाची छाननी झाल्यानंतर आपणास मेडाच्या ॲपमध्ये सेल्फ सर्विस साठी ऑप्शन दिसेल जर ऑप्शन दिसत असेल तर आपला अर्ज पात्र ठरलेला आहे.(बऱ्याच वेळा सेल्फ सर्वे ऑप्शन येऊ नये अर्ज अपात्र ठरवला जातो) त्यासाठी आपण आणखी एक प्रकारे सुद्धा चेक करू शकतो. शेतकरी मित्रांनो आपला अर्ज पात्र आहे किंवा अपात्र आहे हे पाहण्यासाठी आपण  Mahaurja कुसुम महाऊर्जा या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा चेक करू शकतो त्यासाठी आपणास महाऊर्जाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. लिंक ला क्लीक केल्यानंतर आपणासमोर अशी

बब

प्रतिमा दिसेल त्यात आपणास मिळालेला एम के आयडी व पासवर्ड टाकून लोगिन करावे. लॉगिन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता ऑप्शन आले आहे का आपलं पेमेंट झालेल  आहे का पेमेंट केलं असेल तर कंपनी निवडली  आहे का या सर्व गोष्टी आपणास दिसतात. जर आपणास लॉगिन करताना  Your Application is not shortlisted login will be resume soon. असा  मेसेज आला तर तुमचा अर्ज अजून छाननी झालेला नाही. तुम्हाला अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

FAQ

Que 01)   मी माझी कुसुम योजना सौर पंप स्थिती कशी तपासू शकतो ?

Ans:          हो आपण महाउर्जा च्या बेनेफिसरी लॉगीन वर जाऊन आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकतो.

Que 02)  पंतप्रधान कुसुम योजना महाराष्ट्रात उपलब्ध आहे का?

Ans:  महाराष्ट्रात कुसुम सोलर पंप २०२१ पासून उपलब्ध करण्यात आलेली आहे

Que 03)  पीएम कुसुम योजनेची एकूण किंमत किती आहे?

Ans:    महाराष्ट्रात कुसुम सोलर पंप बसवण्यासाठी 13.5 टक्के जीएसटी सहित किंमत खालील प्रमाणे

सौर पंप क्षमताएकूण किंमतसर्वसाधरण शेतकरी हिस्साअनु जाती/जमाती शेतकरी हिस्सा
         3 HP193803193809690
         5 HP2697462697513488
          7.5 HP3744023744018720

टीप: शासन व कंपनी यांच्या धोरणात बदल झाल्यास किंमत कमी जास्त होऊ शकते.