cmegp loan : सरकार नागरिकांना विविध सुविधा पुरवण्यासाठी आणि तरुणांच्या हाताला रोजगार निर्मिती मिळण्यासाठी विविध उपक्रम योजना राबवत असतो. अशीच राज्य शासनाचे एक महत्त्पूर्ण योजना ज्या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील बेरोजगार तरुण आणि तरुणींना व्यवसायासाठी प्रोत्साहन देत आहे. राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या अंतर्गत राज्यातील तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे आणि त्यांना स्वयंपूर्ण रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेची अंमलबजावणी संचालन उद्योग संचालनालय च्या मार्फत केली जाते. पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना उत्पादन व्यवसायासाठी 50 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. तर सेवा उद्योगासाठी पात्र असणाऱ्या तरुणांना वीस लाख रुपयापर्यंत बँकेकडून (cmegp loan) कर्ज वितरित करून दिले जाते. विशेष बाब म्हणजे या कर्जावर शासनाकडून अनुदान देखील दिले जाते. ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी वेगवेगळ्या वर्गवारीनुसार अनुदान वितरित केले जातात. cmegp loan
अनुदान मिळण्याची प्रक्रिया
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत ग्रामीण भाग आणि शहरी भाग यासाठी वेगवेगळ्या अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील आरक्षित नागरिकांना वेगळे अनुदान वितरित केले जाते. cmegp loan
ग्रामीण भाग.
- आरक्षित प्रवर्ग:- ग्रामीण भागातील महिला अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांना 35% अनुदान दिले जाते.
- सर्वसाधारण प्रवर्ग:- सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामीण भागात 25% अनुदान वितरित केले जाते.
शहरी भाग
- आरक्षित प्रवर्ग:- शहरी भागातील महिला आणि अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांना 25 टक्के अनुदान वितरित केले जाते.
- सर्वसाधारण प्रवर्ग:- शहरी भागातील सर्वसाधारण प्रवर्गातील नागरिकांना 15 टक्के अनुदान वितरित केले जाते.
हे वाचा : आता या विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज, काय आहे पीएम विद्या लक्ष्मी योजना?
अटी व पात्रता
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही अटी व नियम ठरवण्यात आले आहेत या अटींच्या अधिक राहूनच अर्जदार लाभ घेऊ शकतात.
- अर्जदाराचे वय हे 18 वर्षे ते 45 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांसाठी व महिलांसाठी पाच वर्षाची अधिकची सूट देण्यात आली आहे.
- अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही इतर शासकीय योजनेतून व्यवसायासाठी कर्ज घेतलेले किंवा लाभ घेतलेला नसावा
- अर्जदार हा कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- दहा लाख रुपयांची कर्ज मिळवण्यासाठी अर्जदार किमान सातवी पास असणे आवश्यक आहे.
- 25 लाख व त्यावरील कर्ज मिळवण्यासाठी अर्जदार हा किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.
कोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळेल.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत जवळपास सर्वच व्यवसायांना कर्ज दिले (cmegp loan) जाते. यामध्ये फक्त दारू आणि तंबाखूजन्य पदार्थातील अशा व्यवसायासाठी या माध्यमातून कर्ज वितरित केले जात नाही. बाकी इतर व्यवसायासाठी कर्ज आणि अनुदान वितरित केले जाते. कोणत्या व्यवसायासाठी प्रामुख्याने कर्ज मिळते त्याची यादी खालील प्रमाणे:-
- उत्पादन उद्योग
- बेकरी उत्पादने उद्योग
- चप्पल बूट कारखाना उद्योग
- पशुखाद्य निर्मिती उद्योग
- सेवा व्यवसाय उद्योग
- लेडीज ब्युटी पार्लर
- जेन्ट्स पार्लर
- शेती उत्पादनापासून तयार केले जाणारे प्रक्रिया उद्योग.
- ट्रान्सपोर्ट व्यवसाय
- मोबाईल शॉपी
- किराणा दुकान
- फोटोग्राफी व्यवसाय
- हॉटेल
या व अशा प्रकारच्या सर्व व्यवसायासाठी या योजनेचे अंतर्गत कर्जवित्रीत केली जाते. ग्रामीण भागात चालणाऱ्या व्यवसायाला देखील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत कर्ज वितरित केले जाते. वरील यादी व्यतिरिक्त अनेक असे व्यवसाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये प्रामुख्याने दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश असणारे व्यवसायांना सरकारकडून कर्ज वितरित केले जात नाही. बाकी सर्वच व्यवसायांना सरकारकडून कर्ज दिले जाते.cmegp loan
अवश्यक कागदपत्रे
अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे काही कागदपत्र असणे आवश्यक आहे या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे:-
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे पॅन कार्ड
- आवश्यक असल्यास जातीचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र
- व्यवसाय प्रकल्प अहवाल.
- व्यवसाय ग्रामीण भागात येत असल्यास ग्रामपंचायत चा ठराव.
- शहरी भागात येत असल्यास नगर परिषद ची परवानगी.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून कर्ज वितरीत केले जाते. एकादशीच्या माध्यमातून तरुण आपल्या नवीन उद्योगाला सुरुवात करू शकतात. या सरकारच्या प्रस्तावनाच्या माध्यमातून तरुण स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात. तरुणांना रोजगार प्राप्त होईल त्यासोबतच इतर तरुणांना देखील रोजगार उपलब्ध होईल या हेतूने शासन उपक्रम राबवत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार आपल्या जवळील जिल्हा उद्योग केंद्र येथे संपर्क साधून या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात. जिल्हा उद्योग केंद्र मध्ये जाऊन आपण याविषयी अधिक माहिती घेऊ शकता. cmegp loan