cotton rate : यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा होती. बरेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून हंगामाच्या सुरुवातीला कापसाला दहा हजार रुपये पर्यंत भाव मिळेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात होती. परंतु हंगामाच्या शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात कापसाचा दर चांगला पडलाच नाही. अलीकडच्या काही काळात कापसाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या राज्यात कापसाला 7000 ते 8000 रुपयांपर्यंत दर मिळत आहे

सरकारकडून कापसाला 7521 रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला होता. या हमीभावाने काही दिवस शेतकऱ्याकडून कापसाची खरेदी देखील करण्यात आली. शेतकऱ्यांवर उत्पादन खर्च वाढवण्याची वेळ आलेली आहे. यातच शेत मालाला मिळणारा भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न देखील घटलेले आहे. या सर्व परिस्थितीशी सामना करत असणारे शेतकरी कापसाच्या दराबाबत अपेक्षा ठेवून होता. परंतु परिस्थिती शेतकऱ्याच्या बाजूने चाललीच नाही. शेतकऱ्यांनी आपल्या कापूस मालाची विक्री केल्यानंतर बाजारात कापसाचे दर वाढताना पाहायला मिळत आहेत. cotton rate
हे वाचा : सोने बाजार होणार मोठी उलथापालथ ; चीनची नवी घोषणा
सरकीच्या दाराचा बाजारावर परिणाम
हंगामाच्या शेवटी कापसाला चांगला (cotton rate) दर मिळत असल्याचे पाहायला मिळाले. शेवटी शेवटी कापसाला सात हजार ते आठ हजार रुपयापर्यंत दर मिळत आहे. जवळपास सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळील कापूस विकलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आहे अशा शेतकऱ्यांना आता पश्चातप करण्याची वेळ आलेली आहे. कारण शेतकऱ्यांच्या वेळी कापूस (cotton rate) विकला त्यावेळेस कापसाला सहा हजार रुपये भाव होता. आता त्याच कापसाला सात हजार ते आठ हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे.
या भाव वाढीमागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सरकीच्या दरामध्ये झालेली वाढ. याआधी सरकीला 3200 ते 3300 प्रतिक्विटल या प्रमाणात भाव मिळत होता. आता सरकीच्या भावात वाढ होऊन सरकीला 3700 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळत आहे. सरकीच्या या भाववढीमुळे कापसाच्या दरात देखील एक ते दोन हजार रुपयांनी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले.
शेवटी शेतकऱ्यांनी आपला कापूस विकल्यानंतरच कापसाला भाव मिळाला. अशी मानसिकता सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मनात निर्माण होत आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांकडे कापूस उपलब्ध होता त्यावेळी या प्रमाणात शेतकऱ्यांना काच दर मिळाला नाही. हा जो दर मिळत आहे तो फक्त व्यापाऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापासालाच मिळत असल्याची माहिती देखील शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे. कारण सध्या शेतकऱ्याकडे फक्त दहा ते पाच टक्केच शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. जवळपास सर्व शेतकऱ्यांनी आपला कापूस विकलेला आहे. मग या भाव वाढीचा फायदा शेतकऱ्यांना होत नसून फक्त व्यापाऱ्यांनाच होत असल्याची भावना देखील शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. cotton rate