Gold news china : सोनी हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. भारतातील अनेक नागरिक सोन्यावर अत्यंत प्रेम करतात. त्यात प्रामुख्याने भारतीय महिला यांना सोन्यावर जास्तच प्रेम असतं. मग या सोन्याबाबत सर्व घडामोडी देखील पाहणं महत्त्वाचं ठरतं. कारण मागील वर्षभरात या सोन्याच्या भावामध्ये 3000 ते 4000 रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळाली. गेल्या मार्चमध्ये 6400 वर असणार असून आज 9100 वर पोहोचले आहे. एक वर्षामध्य या सोन्याच्या भावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आता याच सोन्याच्या बाजाराबाबत चीनकडून एक खळबळ जनक खुलासा करण्यात आला आहे. या नवीन खुलासाने बाजारावर काय परिणाम होऊ शकतो किंवा बाजार खरं ढासळू शकतो का याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूया.

चीन चा दावा काय
चीनने केलेल्या दाव्यानुसार चीनला टन सोन्याचा साठा सापडला आहे. हा सोन्याचा (Gold news china) खजिना सापडलेली चीनसाठी अत्यंत महत्त्वाची वेळ आहे. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी युद्ध सुरू असताना चीनकडे हजार टन सोन्याचा साठा उपलब्ध झाल्याची माहिती दिली आहे.
चीनकडून सादर केलेला माहितीनुसार चीनच्या होणार प्रांतातील या भागात चीनला सोन्याची खान सापडली आहे. या भागामध्ये खोदकाम करणे देखील अत्यंत सोपे असल्याचे सांगितले जात आहे.
हूनान भूवैज्ञानिक ब्युरोच्या अहवालानुसार प्रत्येक ड्रिलिंग होलमध्ये सोन्याचा भाग आढळला आहे. यानुसार असे स्पष्ट होते की या ठिकाणी सोन्याचा खूप मोठ्या प्रमाणावर साठा आहे. चीनने 2024 मध्ये नवीन खनिज संशोधन धोरण अवलंब केले होते. याच प्रगत शोध तंत्रज्ञानामुळे चीनला हा मोठा शोध लावता आल्याचे देखील सांगण्यात येत आहे. Gold news china
हे वाचा : 1 एप्रिल पासून बदलणार नवीन नियम; नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम.
चीन सोन्यात वाढवतो गुंतवणुक
मागील काही दिवसापासून चीनकडून सोन्यामधील गुंतवणूक वाढवली जात आहे. जागतिक आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर चीन सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. जगातील सर्वाधिक सोन्याच्या आयात दरामध्ये चीन भारत आणि स्वित्झर्लंड हे तीन देश 2024 मध्ये सर्वाधिक आघाडीवर होते. अमेरिका आणि चीन मधील व्यापार युद्ध आणि अमेरिकेतील नवीन सरकार ट्रम्प यांच्या धोरणामुळे चीन स्वतः सोने आत्मनिर्भवतीकडे वळण्याचा प्रयत्न करत आहे. Gold news china
सोन्याच्या बाजारावर परिणाम होणार
चीनकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार जर चीनला (Gold news china) दहा हजार टन सोन्याची खान सापडली असेल तर याचा परिणाम थेट जागतिक बाजारावर देखील पाहायला मिळेल. याचा सोन्याच्या किमतीवर देखील मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडताना दिसून येईल. कारण 2024 मध्ये सर्वाधिक सोने आयात करणारा देश चीन याच देशाला आपल्याच देशात एवढे मोठे सोन्याची खान सापडली तर त्या देशाला सोन्याची आयात करण्याची आवश्यकता पडणार नाही. सर्वाधिक आयात करणारा देश ज्यावेळी खरेदी बंद करेल त्यावेळेस आपोआपच सोन्याचे किमतीमध्ये देखील उतार पाहायला मिळू शकतो.
जर चीन चा दावा करा ठरला तर जागतिक सोने बाजारावर याचा परिणाम दिसून सोन्याचे किमतीमध्ये काही प्रमाणात का होईना घसरण झाल्याचे पाहायला मिळू शकते. हा दावा अद्याप पर्यंत सुनिश्चित झाला नसून काही तज्ञांच्या मते या ठिकाणी शोध मोहीम करण्यासाठी आणखी काही तपासणी मोहीम आणि ड्रिलिंग करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. Gold news china