ration kyc deadline : मागील बऱ्याच दिवसापासून रेशन कार्ड ची केवायसी प्रक्रिया सुरू आहे. सरकारकडून यासाठी 31 मार्च ही अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु अनेक नागरिकांना यामध्ये विविध अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या अडचणीचा विचार करत सरकारने केवायसी करण्यासाठी आणखी kyc मुदतवाढ दिलेली आहे. सरकारकडून रेशन कार्डधारकांना आपली रेशनची केवायसी पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी वाढीव दिलेला आहे. म्हणजेच आता नागरिकांना 30 एप्रिल पर्यंत आपल्या रेशनची केवायसी करता येणार आहे. यामुळे अनेक नागरिकांना आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालावधी मिळाला आहे. ज्या नागरिकांनी आतापर्यंत आपली केवायसी पूर्ण केली नाही त्यांनी 30 एप्रिल 2025 च्या आत आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी. ration kyc deadline

ही मिळाली मुदतवाढ
सध्या पाच लाखापेक्षा अधिक रेशन कार्डधारकांची केवायसी पूर्ण झालेली नाही. ज्या नागरिकांची केवायसी केली जाणार नाही त्या नागरिकांना रेशन अंतर्गत मिळणारा पूर्ण लाभ बंद केला जाणार आहे. ज्या नागरिकांची केवायसी बाकी आहे त्यांना केवायसी करण्याची आणखी एक संधी सरकारने दिलेली आहे. या योजनेतून पात्र असणाऱ्या लाभार्थी वंचित राहू नये यासाठी सरकारकडून 30 एप्रिल 2025 पर्यंत नागरिकांना केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जे नागरिक 30 एप्रिल 2025 पर्यंत आपले केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा नागरिकांना 30 एप्रिल 2025 नंतर मिळणारे मोफत धान्य बंद केले जाणार आहे. रेशन धान्याचा लाभ बंद करण्यासोबतच या नागरिकांचे रेशन कार्ड मधून नाव देखील वगळले जाणार आहे.ration kyc deadline
हे वाचा : आपल्या रेशन कार्ड ची केवायसी झाली का असे तपासा?
सर्वच सदस्यांना केवायसी बंधनकारक
रेशन कार्ड मध्ये जेवढे सदस्यांची नावे आहेत त्या सर्व सदस्यांना आपली केवायसी करणं आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी रेशन कार्ड मधील फक्त कुटुंबप्रमुखांनीच आपली केवायसी केलेली आहे. इतर सदस्यांनी आतापर्यंत आपली केवायसी केलेली नाही. अशा नागरिकांनी आपली केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी. करण रेशन कार्ड अंतर्गत एवढे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांची केवायसी करणे शासनाने बंधनकारक केलेले आहे. ration kyc deadline
मोबाईलच्या माध्यमातून करता येते kyc
सरकारने आत नागरिकांना मोबाईलच्या माध्यमातून kyc करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या साठी नागरिकांनी मेरा ई-केवायसी ॲप च्या माध्यमातून ज्या नागरिकांनी अद्याप पर्यंत आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल, त्यांनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून kyc पूर्ण करून घ्यावी. केवायसी मोबाईलच्या माध्यमातून कशी करावी याकरिता खालील व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये kyc करण्याची पूर्ण प्रक्रिया दिलेली आहे.