या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर हेक्टरी 70000 रुपये होणार जमा. crop insurance status.

crop insurance status : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळावे म्हणून पिक विमा योजना सुरू केली. या पिक विमा योजनेतून ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे त्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीकडून त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते. यातच आता शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 70 हजार रुपयापर्यंत पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. हा पिक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला मिळणार व यात कोण पात्र असणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

राज्यात विविध हंगामात विविध पिकांचा पिक विमा भरला जातो ज्यामध्ये खरीप हंगाम मधील पिके व फळबाग त्यानंतर रब्बी हंगामातील पिके व अंबीया बहार या प्रमाणात राज्यात पीक विमा अर्ज शेतकऱ्याकडून भरले जातात. हवामान आधारित पीक विमा म्हणजेच फळबाग पीक विमा असतो.

कोणता पीक विमा वाटप होणार.

अंबीया बहार 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. आणि त्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीच्या तक्रारी सादर केल्या होत्या. व कंपनीकडून या शेतकऱ्यांची पंचनामे झाले होते ते पंचनामे कंपनीने मान्य करून. या शेतकऱ्यांना पिक विमा वाटपास मान्यता दिलेली आहे. यानुसार या शेतकऱ्यांना अंबीया बहार 2023 मधील फळबाग पिक विमा शेतकऱ्यांना वाटप होणार आहेत. अंबीया बहार मधील सर्वच पिकांचा पीक विमा वाटप सुरू करण्यात आले आहे.

हे वाचा: अनाथ मुलांना मिळणार 2250 रुपये आर्थिक लाभ

अंबीया बहार 2023 मधील नुकसानग्रस्त पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 70 हजार रुपये या प्रमाणात पीक विमा वितरित केला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात हा पिक विमा जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे.

crop insurance status किती नीधी मंजूर

राज्य शासनाने अंबीया बहार 2023 मधील फळबाग पिक विमा वाटप करण्यासाठी 817 कोटी एवढी रक्कम मंजूर केली होती. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी जमा होईल याची शेतकऱ्यांना चिंता लागली होती. आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

कोणत्या जिल्ह्यात वाटप सूरु

अंबीया बहार 2023 मध्ये राज्य शासनाकडून पिक विमा वाटपासाठी 817 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली. यामध्ये जळगाव जिल्ह्यासाठी 327 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. तर सध्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सरासरी 70 हजार रुपये हेक्टर या प्रमाणात(पिकानुसार कमी जास्त रक्कम) अंबीया बहार 2023 चा पिक विमा शेतकऱ्यांना वर्ग केला जात आहे. प्रक्रिया सुरू असून ज्या शेतकऱ्यांना आणखी मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना येत्या एक ते दोन दिवसात पिक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी मिळणार लाभ.

crop insurance status शासनाने निधी मंजूर करून कंपनीला वितरित देखील केलेला आहे. परंतु पीक विमा कंपनीच्या प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होत असल्यामुळे बाकीच्या जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू झालेले नाही. परंतु दिवाळी पूर्वीच सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा मंजूर पीक विमा त्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल असे कृषि विभाकडून सांगण्यात येत आहे. यावरून आता 30 ऑक्टोबर पर्यन्त राज्यातील सर्व जिल्ह्यात अंबीया बहार 2023 मधील मंजूर पीक विमा वाटप होणार आहे.

आपल्याला पीक विमा किती मिळणार येथे तपसा.

पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळणार हे तपासण्यासाठी (crop insurance status) आपण प्ले स्टोअर वरुण crop insurance हे अॅप डाउनलोड करा. या अॅप मध्ये आपला पॉलिसी क्रमांक भरून आपण आपल्याला किती पीक विमा मंजूर झाला हे पाहू शकता.

crop insurance status

Leave a comment