दहीहंडी उत्सव दरम्यान दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण

दहीहंडी उत्सव दरम्यान दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण

      आपण आज  दहीहंडी उत्सव विमा संरक्षण  याविषयी माहिती पाहणार आहोत. गेल्या वर्षी प्रमाणे राज्य सरकारने याही वर्षी गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   राज्यातील अनेक भागांमध्ये हा दहीहंडी उत्सव साजरी केला जातो दहीहंडी उत्सव हा आपण गणेश उत्सव  जसा साजरी केला जातो तसाच महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कृष्ण जन्माष्टमीचाही उत्सव साजरी केला जातो. हा दहीहंडी उत्सव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होत चाललेला आहे . दरवर्षीप्रमाणे यंदाही  प्रो स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहेत . या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंद पथकाच्या सुरक्षेचीही काळजी घेतलेली असून गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दहीहंडी उत्सव दरम्यान गोविंदाच्या मानवी मनोरे उभारण्याच्या खेळ प्रकारास क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याच्या तसेच या क्रीडा प्रकाराबाबत राज्यघटनेमार्फत  विस्तृत नियमावली तयार करण्यास संबंधित निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य शासनाने दहीहंडी उत्सव दरम्यान  अपघातग्रस्त होणाऱ्या गोविंदांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे

   यावर्षी म्हणजे 2024 मध्ये दहीहंडी उत्सव दरम्यान मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील 75000 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.

दहीहंडी उत्सव विमा संरक्षण

योजनेचे नाव

दहीहंडी उत्सव दरम्यान दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण

राज्य

 महाराष्ट्र

लाभार्थी, मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदा

मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदा

लाभ, दहीहंडी उत्सव दरम्यान दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा

 दहीहंडी उत्सव दरम्यान दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा

दहीहंडी उत्सव विमा संरक्षण उद्देश

  •  मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदा ना दिलासा देणे.
  • मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळवून देणे
  • दहीहंडी उत्सव दरम्यान दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना शासकीय रुग्णालयामध्ये मोफत खर्च

दहीहंडी उत्सव दरम्यान दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना लाभ

  • अपघाती मृत्यू

       10 लाख रुपये

  •  दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास

        10 लाख रुपये

  •  एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमवल्यास

        5 लाख रुपये

  •  कायमस्वरूपी पूर्ण अपंग तत्व

        10 लाख रुपये

  •  कायम अपूर्ण/पक्षपाती अपंगत्व

        विमा पॉलिसी मध्ये नमूद केलेल्या टक्केवारीनुसार

  •  अपघातामुळे रुग्णालयीन खर्च

       प्रत्यक्षात झालेला खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये.

वरील दिलेली लाभाची रक्कम ही राज्य शासनाने दहीहंडी उत्सव दरम्यान दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

दहीहंडी उत्सव विमा संरक्षण पात्रता

  • महाराष्ट्र राज्यातील प्रो स्पर्धा मध्ये सहभागी होणारे गोविंद पात्रता असतील 

दहीहंडी उत्सव विमा संरक्षण अटी व शर्ती

  •  महाराष्ट्र राज्यातील आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सव प्रो-गोविंदा लीगमध्ये मानवी मनोरे रचण्यासाठी प्रत्यक्ष सहभागी असलेल्या अपघातग्रस्त गोविंदांना सदर विमा सुरक्षा अनुज्ञेय राहील.
  •  दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या आयोजक संस्थेने सदर योजना करिता स्थानिक प्रशासनाच्या तसेच अन्य विविध प्राधिकारी यांचा आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक राहील
  •  दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्याची आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या साह्याने आवश्यक ती कारवाई करावी.
  •  दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक राहील.
  • दहीहंडी उत्सव दरम्यान मानवी मनोरे रचण्यासाठी सहभागी झालेल्या गोविंदांना अपघात होऊन, मृत्यू दुखापत झाल्यास त्यांना विमा संरक्षण अनुज्ञेय राहील. मानवी मनोरे तयार करण्या व्यतिरिक्त अन्य कारणामुळे अपघात दुर्घटना झाल्यास सदर विमा संरक्षण अनुज्ञेय असणार नाही.

     दहीहंडी उत्सव व-प्रो गोविंदा लीग दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त  झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा दहीहंडी उत्सव विमा संरक्षण जीआर

Leave a comment