ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना

ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना

आपण आज या योजनेमध्ये ड्रॅगन फ्रुट अनुदान या विषयी माहिती पाहणार आहोत. ड्रॅगन फ्रुट हे एक निवडुंग जातीचे कोण आहे. या फळाच्या झाडाला काटे असतात म्हणजे ते झाड काटेरी असते . या फळास सुपर फ्रुट्स म्हणून देखील ओळखले जाते यातील पोषक तत्वे व अँटि ऑक्साइड असतात. हे फळ विविध औषधी गुण तसेच फॉस्फरस व कॅल्शियम यासारखी  मिनरल्स या फळांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. या फळाची झाडे कमी पाण्यात अथवा पाण्याची टंचाई असल्यानंतर पण टिकून राहतात. या पिकाला खूप कमी प्रमाणात खर्च येतो आणि तसेच या पिकावर रोगप्रतिकारक शक्ती ही अत्यंत कमी प्रमाणात आहे त्यामुळे या पिकाला कमी खर्च येतो. ड्रॅगन फ्रुट या पिकाची लागवड करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात महाडीबीटी पोर्टलवर अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे.  महाडीबीटी पोर्टलवर या योजनेचा अर्ज करावा लागेल. या योजनेसाठी अनुदान किती आहे, अर्ज कसा करायचा, अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे या सर्वांची माहिती आपण या लेखाद्वारे घेणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा. 

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ड्रॅगन फ्रुट योजनेचे अनुदान कोणत्या बाबींसाठी मिळते

  •  त्या झाडांना सपोर्ट देण्याकरिता खंबा उभारणे.
  •  तो खंबा उभारण्यासाठी खड्डे खोदणे.
  •  ड्रॅगनफ्रुट रोपांची लागवड करणे.
  •  झाडांना पाणी देण्याकरिता ठिबक सिंचन.
  •  खत व्यवस्थापन व पीक संरक्षण
ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगनफ्रुट योजनेसाठी एका लाभार्थ्यास किती क्षेत्रापर्यंत अर्ज करता येतो?

ड्रॅगन फ्रुट योजनेसाठी एका लाभाथी कमीत कमी   0.20 हेक्टर आणि जास्तीत जास्त 4 हेक्टर पर्यंत या पिकाची लागवड करू शकतो आणि अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.

ड्रॅगनफ्रुट साठी किती अनुदान मिळणार?

ड्रॅगन फ्रुट योजनेच्या लागवडीसाठी सरकारकडून 4 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. याचा लाभार्थ्याला लाभ राज्य सरकारकडून एक हेक्टर  क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी 4 लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आलेला आहे. त्यापैकी सरकार हे आपल्याला 40% रक्कम म्हणजे 1 लाख 60 हजाररुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टलवर करू शकतात.  

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगनफ्रुट योजनेसाठी अनुदान किती व कधी मिळते:

  •  प्रकल्प खर्चाच्या कमीत कमी 40 टक्के 1 लाख 60 हजार रुपये अनुदान प्रति हेक्टर मिळते.
  •  हे अनुदान लाभार्थ्याला तीन टप्प्यात दिले जाते आणि हे अनुदान मंडळ कृषी अधिकारी यांनी मोका तपासणी केल्या नंतर मिळते
  •  हे अनुदान तीन वर्ष दिले जाते पहिल्या वर्षी 60%, दुसऱ्या वर्षी 20% आणि तिसऱ्या वर्षी 20% असे दिले जाते .
  •  परंतु यासाठी झाड जिवंत ठेवणे आवश्यक आहे पहिल्या दुसऱ्या वर्षी कमीत कमी 75 टक्के आणि तिसऱ्या वर्षी पर्यंत 90 टक्के झाडे जिवंत ठेवावे.

ड्रॅगन फ्रुट लागवडीचे फायदे

  •  ड्रॅगनफ्रुट हे ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत रोपवाटप.
  •  सामाजिक वनीकरण किंवा अन्य शासकीय विभागाच्या रोपवाटिका

वरील दिलेल्या ठिकाणी उपलब्ध नसल्यास नोंदणी कृत मान्यता प्राप्त खाजगी रोपवाटप यांच्याकडून घ्यावीत.

ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना आवश्यक लागणारे कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  • 7/12 उतारा
  •  बँक पासबुक
  •  जातीचे प्रमाणपत्र
  •  विहित नमुन्यातील हमीपत्र
  • ड्रॅगनफ्रुट अनुदान योजना अर्ज करण्याची पद्धत

महाडीबीटी पोर्टल वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

ड्रगन फ्रुट योजना अर्ज करणायची पद्धत

  •  सर्वप्रथम या योजनेचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर जा
  •  त्यानंतर लॉगिन बटनावर क्लिक करा.
  •  क्लिक केल्यानंतर आपला युजर आयडी व पासवर्ड टाका किंवा जर आपला यूजर आयडी पासवर्ड नसेल तर नवीन तयार करून घ्या.
  •  त्यानंतर नवीन अर्ज वर क्लिक करा.
  •   फलोत्पादन अभियान वर क्लिक करा.
  •  नंतर ड्रॅगनफ्रुट लागवड या पर्यायावर क्लिक करा.
  •  आणि त्यात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा आणि अर्ज सबमिट करा.

        अशाप्रकारे तुम्ही ड्रॅगनफ्रुट या योजनेचा अर्ज करू शकतात.

निष्कर्ष

ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला कुणाला किंवा तुमच्या नातेवाईकांमधील कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना या योजनेबद्दल माहिती सांगा किंवा हा लेख शेअर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील. आम्ही दिलेली माहिती आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा.

विचारले जाणारे प्रश्न

 1. ड्रॅगन फ्रुट साठी किती अनुदान दिले जाते ?

  •  ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी चार लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आलेला आहे त्यापैकी सरकार आपल्याला 40% रक्कम म्हणजे 1 लाख 60 हजार रुपये अनुदान देत आहे .

2. हे अनुदान कसे दिले जाते?


  •  हे अनुदान तीन टप्प्यांमध्ये दिले जाते. पहिल्या वर्षी 60%, दुसऱ्या वर्षी 20% आणि तिसऱ्या वर्षी 20% असे दिले जाते पण या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी झाडे जिवंत असणे गरजेचे आहे दुसऱ्या वर्षी 75 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 90% झाडे जिवंत असायला पाहिजे.

3. या योजनेचा अर्ज कसा करता येईल?


  •  या योजनेचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन अर्ज करावा लागेल. महाडीबीटी पोर्टल वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.