Fal Pik vima फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीक विमा मंजूर, किती मदत मिळणार? पहा सविस्तर

Fal Pik vima : राज्य शासनाकडून फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे फळ पीक विमा योजनेसाठी रखडलेला निधी अखेर राज्य सरकारकडून वितरित केला जाणार आहे. राज्य सरकारने मृगबहार आणि आंबिया बहार 2023-24 आणि 2025 या चारही हंगामांसाठी प्रलंबित तसेच आगाऊ देय असलेला विमा हप्ता विमा कंपन्यांना देण्यास मंजुरी दिली आहे.यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षेत असलेली विमा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Fal Pik vima

रखडलेला विमा मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा

फळ पीक विमा (Fal Pik vima) योजनेसाठी राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले होता, पन मात्र निधीअभावी विमा कंपन्यांनी हप्ता वाटप थांबवले होते. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

2023-24 या हंगामात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले होते. मृगबहार हंगामात दुष्काळामुळे शेती प्रभावित झाली, तर आंबिया बहार हंगामात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पीक उध्वस्त झाले.अशा परिस्थितीत रखडलेल्या विमा निधीच्या वितरणामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

हे वाचा : बजेट सादर; ना लाडक्या बहिणींना .ना शेतकरी कर्ज माफी.

Fal Pik vima मंजूर निधीचा तपशील

राज्य शासनाने मंजूर केलेला विमा (Fal Pik vima) निधी खालीप्रमाणे आहे –

  • आंबिया बहार 2024-25: 159 कोटी रुपये (आगाऊ रक्कम)
  • मृगबहार 2024-25: 26 कोटी रुपये
  • आंबिया बहार 2023-24: 10 कोटी रुपये
  • मृगबहार 2023-24: सुमारे 6-7 लाख रुपये

या निधीच्या वितरणामुळे लांबणीवर पडलेला विमा मिळण्यास गती मिळेल आणि शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत पोहोचेल.

विमा कंपन्यांना लगेच निधी वाटपाचे आदेश

राज्य शासनाने अधिकृत आदेश निर्गमित करत विमा कंपन्यांना हा निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला होता, परंतु निधीअभावी त्यांना लाभ मिळू शकला नाही , त्या शेतकऱ्याला आता ही रक्कम दिली जाणार आहे. या आगोदर वारंवार निधी वितरणाच्या प्रक्रियेत अडथळे येत होते, मात्र आता हा प्रश्न सुटणार आहे.

शेतकऱ्यांना मोठा आधार

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित विमा रक्कम वेळेत मिळेल आणि शेतीसाठी आवश्यक आर्थिक आधार मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना नवी ऊर्जा मिळून शेतीसाठीची त्यांची तयारी सुलभ होईल.

फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरणार असून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी मदत होणार आहे. Fal Pik vima




Leave a comment

Close VISIT MN CORNERS