Farmer buisness idea : शेतीसोबत अधिक नफा देणारे महत्त्वाचे व्यवसाय.! तेही अगदी कमी खर्चात..!!

Farmer buisness idea : महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक तरुण वर्ग हा किती व्यवसायात गुंतलेला आहे. बऱ्याच तरुणांचे शेतीसोबतच शेती जोड व्यवसाय करणे हे देखील स्वप्न असते. विविध अडचणी समस्या या कारणामुळे किंवा कधीकधी व्यवसाय कोणता करावा. याची आयडिया नसल्यामुळे अनेक तरुणांना शेती व्यवसाय किंवा शेतीसोबत जोड व्यवसाय करणे कठीण जाते. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना शेती विषयक व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारी आर्थिक स्थिती देखील उपलब्ध नसते. या व अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी अडचण निर्माण होतात.

आज आपण असेच शेती सोबत करता येणारे काही व्यवसाय पाहणार आहोत. ज्यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी खर्च देखील अत्यंत कमी असणार आहे. कमी भांडवला मध्ये देखील हे व्यवसाय तुम्हाला सुरू करता येतील. या व्यवसायाला मागणी देखील अधिक आहे आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल देखील कमी असले तरी व्यवसाय सुरू करता येतील असे व्यवसाय आपण पाहणार आहोत. Farmer buisness idea

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Farmer buisness idea

दुग्ध व्यवसाय

पारंपरिक पद्धती पासून शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड आपण पाहत आलेलो आहोत. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसाय मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवलेला आहे. जोड व्यवसाय म्हणून सुरू केला अनेक शेतकऱ्यांचा हा व्यवसाय आज मुख्य व्यवसाय बनलेला आहे. या व्यवसायाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील काळानुसार वाढताना पाहायला मिळत आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील जास्त भांडवलाची आवश्यकता लागत नाही. योग्य मार्गदर्शन नियोजन आणि कष्ट या सर्वांच्या सहाय्यने आपण या व्यवसायात यशस्वी बनू शकता. Farmer buisness idea

हे वाचा : 20 गुंठे पेरू लागवड करून शेतकरी झाला लखपती…

मशरूम लागवड

मागील काही दिवसापासून मशरूम ला अत्यंत मागणी वाढलेली आहे. कोणत्याही क्षेत्रात आपण नेहमीच पाहतो मागणी वाढली की दर चांगला मिळतोच. अशाच प्रकारचा एक मशरूम लागवडीचा व्यवसाय देखील शेतकरी तरुण वर्ग करू शकतात. या व्यवसायासाठी कमी जागा आणि कमी वेळेमध्ये देखील आपण जास्त नफा मिळवू शकतो. हॉटेल रेस्टॉरंट आणि प्रत्येक घरी देखील या मशरूमची मागणी वाढतच आहे. शेतीसोबतच आपण या व्यवसायाची देखील निवड करू शकता.

सेंद्रिय खत निर्मिती

शेतकऱ्यांच्या रासायनिक खतांचा वापर घातक असल्याचे लक्षात येत असल्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय खत वापराकडे आपला कल देत आहेत. सेंद्रिय खताच्या वापरामुळे पिकाची गुणवत्ता जमनीची गुणवत्ता व्यवस्थित टिकून राहते. त्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय खताला मागणी करतात. हा व्यवसाय देखील अनेक तरुणांना शेतीसोबत कर्णयोग्य मानला जातो. अनेक तरुणांनी या व्यवसायामध्ये आपल्या करिअर देखील सुरू केली आहे. शेतीसोबत या व्यवसायाचे देखील जोड व्यवसाय म्हणून आपण निवड करू शकतात. Farmer buisness idea

हायड्रोपोनिक रिटेल स्टोअर

जसा काळ बदलतो तशी उत्पादनाची श्रेणी देखील बदलते. याचप्रमाणे आता सध्या माती शिवाय पिके घेण्याची पद्धत अधिक लोकप्रिय होत चालली आहे. हायड्रोपोनिक रिटेल स्टोअर च्या माध्यमातून आपण अनेक जातींची झाडे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ शकता. हे झाडे मातीशिवाय जगतात आणि त्यातून फुले फळे उपलब्ध करून देतात.

बटाटा चिप्स व्यवसाय

शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही ही मन खूप जुनी आहे. याचप्रमाणे अनेक शेतकरी आपण पिकवलेल्या मालाला विक्री करण्याची पद्धत चुकीची वापरतात. अनेक तरुण शेतकऱ्यांनी आपल्या कच्च्या मालापासून पक्का माल करून बाजारात उपलब्ध करून दिलेला आहे. याच पद्धतीचा हा व्यवसाय ग्रामीण भागातून देखील मोठ्या प्रमाणावर चालू शकतो. कच्चामाल जागेवरच उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील खूप कमी होतो. निर्मिती खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न देखील चांगले मिळते. Farmer buisness idea

Leave a comment