farmer ration update: या शेतकऱ्यांना मिळणार रेशन ऐवजी पैसे : शासनाचा नवीन शासन निर्णय.

farmer ration update महाराष्ट्र राज्य शासनाने 28 फेब्रुवारी 2023 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला होता. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे. नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केशरी रेशन कार्ड धारकांना ; अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम देण्याचा निर्णय या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला होता.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

farmer ration update या शासन निर्णय द्वारे प्रति लाभार्थी 150 रुपये याप्रमाणे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी च्या साह्याने ही रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर वर्ग करण्यास परवानगी देण्यात आली होती. ज्या शेतकऱ्यांनी धान्य ऐवजी पैसे या घटकांसाठी अर्ज केला होता त्या लाभार्थी यांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे.

नवीन शासन निर्णयाद्वारे सुधारणा

जुन्या शासन निर्णयाद्वारे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व पात्र असणारे, तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 150 रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे लाभ हस्तांतरित करण्यास परवानगी देण्यात आली. यामध्ये नवीन सुधारणा करून शासनाने 20 जून 2024 रोजी एक परिपत्रक जारी केले या परिपत्रकाच्या आधारे पात्र असणाऱ्या एपीएल रेशन धारकांना 150 रुपये ऐवजी 170 रुपये वाटप करणे अशी सुधारणा करण्यात आली. सुधारणा करून ही रक्कम डीबीटी च्या साह्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास परवानगी देण्यात आली.

farmer ration update

रेशन धारकांनो आजच करा हे काम अन्यथा लाभ होईल बंद!

अर्थसहाय्य वाटपासाठी मान्यता farmer ration update

शासनाने 20 जून 2024 रोजी एक परिपत्रक जारी करून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेत वाढ केली. 150 रुपये वरून 170 रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असल्याची घोषणा केली. तरी अद्याप पर्यंत मागील आठ ते नऊ महिने ही रक्कम वितरित करण्यात आलेली नव्हती. शासनाने नवीन शासन निर्णयाद्वारे ही रक्कम वितरित करण्याच्या प्रक्रियेला मान्यता दिलेली आहे. शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणाला मिळणार रक्कम

रेशन धान्य ऐवजी रोख रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याबाबत बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. राज्यातील छत्रपती संभाजी नगर विभागातील सर्व जिल्हे तसेच अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा या जिल्ह्यातील अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना. (रेशन ऐवजी पैसे) ज्या शेतकऱ्यांनी रेशन धान्य ऐवजी थेट रकमेसाठी आपला अर्ज भरून दिलेला आहे अशा शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित केली जाणार आहे.

रक्कम मिळणार डीबिटी च्या साह्याने

farmer ration update शासनाने शासन निर्णय निर्गमित करून मागील थकीत असलेली रक्कम लाभार्थ्यांच्या बॅक खात्यावर वर्ग करण्यास परवानगी दिली आहे. ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी च्या साह्याने जमा केली जाणार आहे. लाभार्थी यांच्या आधार लिंक बँक खात्यावर ही रक्कम थेट लाभ हस्तांतरित म्हणजेच आधार संलग्न बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.

1 thought on “farmer ration update: या शेतकऱ्यांना मिळणार रेशन ऐवजी पैसे : शासनाचा नवीन शासन निर्णय.”

Leave a comment