farmer subsidy 7 लाख शेतकऱ्यांना 2100 कोटीचा लाभ

farmer subsidy : 7 लाख शेतकऱ्यांना 2100 कोटीचा लाभजिल्ह्यात कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या विविध योजनेच्या माध्यमातून तीन वर्षात सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 2 हजार 115 कोटी रुपयांचा अनुदानाचा लाभ मिळालेला आहे. कांदा, सोयाबीन अनुदानासह शेती विकासासाठी असलेल्या योजनांचा यात समावेश असूनपिक विम्यातून सर्वात जास्त 1100 कोटीपेक्षा अधिक अनुदान मिळालेले आहे


शेती आणि शेतकरी विकासासाठी कृषी विभागामार्फत वेगवेगळे योजना राबवल्या जात आहे. तसेच या योजनेसाठी अनुदान ही दिले जात आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात कांदा अनुदान योजना 2022 – 23 अंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्यात आले. जिल्ह्यात 55 हजार 368 लाभार्थी असून प्राप्त झालेल्या अनुदानाची रक्कम 115 कोटी 96 लाख 64 हजार रुपयांच्या अनुदान देण्यात आले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
ई-पीक पाहणी 2025 ई-पीक पाहणी 2025: खरीप हंगामासाठी नवीन ॲपद्वारे पीक नोंदणी सुरू

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या 1लाख 500 शेतकऱ्यांना बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये 50 हजार या कमाल मर्यादित रुपये 362 कोटी 23 लाख एवढा प्रोत्साहन पर लाभ मिळाला आहे. मागील तीन वर्षात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 732 शेतकऱ्यांना 14 कोटी 7 लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आलेली आहे.


farmer subsidy 308 शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सहानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 6 कोटी 6 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. मागील तीन वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजनांवर 26 कोटी 54 लाख 44 हजार रुपये खर्च करण्यात आले. मागील तीन वर्षात कृषी यांत्रिकीकरण अभियान अंतर्गत जिल्ह्यातील 18 हजार 633 शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी 108 कोटी 53 लक्ष 50 हजार रुपयांच्या अनुदानित.

पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उद्योग अन्नयन योजनेअंतर्गत मागील तीन वर्षात 987 प्रकल्पांना 38 कुठे 89 लाख 24 हजार रुपयांच्या अनुदान वितरित. मागील तीन वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 36 हजार 54 लाभार्थ्यांना 87 कोटी 2 लाख 91 हजार 57 रुपयांचा निधी वितरित. गेल्या तीन वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 40 हजार 940 लाभार्थ्यांना 49 कोटी 93 लाख 56 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

हे पण वाचा:
Land Possession update Land Possession update: आता अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवर ताबा असणाऱ्यांना मिळणार मालकी हक्क? जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि अटी

farmer subsidy अटल भूजल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 1 हजार 783 लाभार्थ्यांना 2 कोटी 48 लाख 45 हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. फळपिके, फुल पिके, भाजीपाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पतीची लागवड, प्रक्रिया व निर्यात क्षेत्रातील वावा लक्षात घेऊन राबविण्यात येणारे एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाद्वारे 3 हजार 707 लाभार्थ्यांना 34 कोटी 61 लाख 78 हजाराचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर, राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत तीन वर्षात 5 हजार 156 शेतकऱ्यांना 47 कोटी 93 लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ झाला.

farmer subsidy सर्वाधिक रक्कम विमा योजनेतून

पंतप्रधान पिक विमा योजनेमध्ये खरीप व रब्बी मागील तीन वर्षात अहिल्यानगर जिल्ह्यात 5 लाख 13 हजार 37 शेतकऱ्यांना 1165 कोटी 47 लाख 92 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत पुनरचित्त हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत मागील तीन वर्षात जिल्ह्यातील 37 हजार 71 शेतकऱ्यांना 62 कोटी 45 लाख 21 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे farmer subsidy असे सांगण्यात आले.

हे पण वाचा:
e pik pahani Update e pik pahani Update: खरीप हंगामाची ई-पीक पाहणी झाली सुरू, ई-पीक पाहणी या संदर्भात मोठे अपडेट..! जाणून घ्या सविस्तर

Leave a comment