दुष्काळी भागात डाळिंब शेतीतून यशस्वी प्रयोगउच्चशिक्षित तरुणाने 2 एकरामध्ये 13 लाखाचे उत्पन्न.Farmer Success Story

Farmer Success Story : देशामध्ये आज बेरोजगार तरुणाची सख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोकऱ्यांची कमतरता असल्याने अनेक उच्चशिक्षित तरुण हे वेगवेगळ्या व्यवसायांचा पर्याय निवडत आहेत. या तरुणांमध्ये बरेच तरुण हे शेतीकडे वळले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे तरुण शेतीमध्ये नव्या पद्धतीने प्रयोग करत आहेत आणि आपल्या कामामध्ये यशस्वी होत आहेत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पांडुरंग सावंत यांची प्रेरणादायी कहाणी

Farmer Success Story सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील माडग्याळ गावात राहणारे पांडुरंग सावंत यांनी कला शाखेत पदवी घेतली. काही काळ त्यांनी खाजगी नोकरी केली, परंतु त्यांची शेतीत काम करण्याची इच्छा होती. शेवटी, नोकरी सोडून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. गावी परत गेलाय नंतर पारंपरिक पद्धतीने शेती करून बगितली पन त्यांना जास्त काही लाभ होत नसल्याने त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याच निर्णय घेतला आणि डाळिंब या पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

हे वाचा : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी! तर पहा कापूस, कांदा, मका आणि गहूचे दर काय आहे

डाळिंब लागवड आणि व्यवस्थापन

Farmer Success Story सावंत यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्या अगोदर कृषीतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी दोन एकर क्षेत्रावर डाळिंब लागवड केली. लागवड करण्यासाठी 70-80 हजार रुपयांची गुंतवणूक सावंत यांना करावा लागली . तसेच त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन केले , ज्यामुळे पाण्याची बचत होऊन चांगले उत्पादन मिळाले मिळाले . तसेच कीटकनाशके वापरून डाळिंबाची गुणवत्ता राखली. बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी डाळिंब विक्रीसाठी योग्य वेळ निवडली आणि त्यामुळे त्यांना डाळिंब या पिकाला चांगला दर मिळाला.

उत्पन्न आणि यश

प्रत्येक वर्षी सावंत यांना त्यांच्या डाळिंब बागेतून सुमारे 13 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. बाजारपेठेच्या अभ्यासाने उत्पादनाचे योग्य नियोजन केल्यामुळे त्यांना हे यश मिळाले आहे. सावंत यांची ही यशोगाथा इतर तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

निष्कर्ष

देशातील बेरोजगारीच्या समस्येवर शेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी आहे. पांडुरंग सावंत यांची कहाणी हे यशस्वी उदाहरण आहे, ज्यातून इतर तरुणांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरणा मिळते.Farmer Success Story

Farmer Success Story

Leave a comment