Farmer success story: 1 लिटर दुधाने केली सुरुवात… आज आहे 50 लाखांचा व्यवसाय..

Farmer success story : जिद्द आणि कष्ट या दोन गोष्टी माणसाने सांभाळल्या की माणूस कोणत्याही परिस्थितीत आपली परिस्थिती मध्ये सुधारणा केल्याशिवाय राहत नाही. जीवनात अनेक अपयश जरी मिळाले तरी आपण आपल्या कामाबाबत खचून न जाता अधिक जोमाने काम सुरू ठेवले तर एक दिवस आपण नक्कीच यशस्वी होतो. अशीच एक स्टोरी (Farmer success story) जालना जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याची. ज्या शेतकऱ्याने एक लिटर वर आपला दूध व्यवसाय सुरू केला होता. तू व्यवसायात शेतकऱ्याने हळूहळू आजच्या घडीला 50 लाख रुपयांच्या मोठ्या घडामोडी वर नेऊन पोहोचवला आहे. Farmer success story

ग्रामीण भागात शिक्षण घेऊन तरुणाने आपले स्वप्न साध्य करण्यासाठी कष्ट सोडले नाही. अशाच एका तरुणाची यशस्वी कहानी आज आपण जाणून घेणार आहोत. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यामधील एका छोट्याशा गावातून आलेल्या गणेश अंधारे या तरुणांनी स्वतःच्या जिद्दीवर आणि स्वतःच्या कष्टावर आपलं एक वेगळच अस्तित्व निर्माण केला आहे. या तरुणाकडे पाहून आसपासच्या शेजारील गावातील शेतकरी देखील याचे अनुकरण करत आहेत. गणेश अंधारे यांनी सिद्ध करून दाखवले आहे की यशस्वी होण्यासाठी शिक्षणच आवश्यक नाही. त्याने घेतलेल्य धाडसी निर्णयाला त्याला यश देखिल प्राप्त झालं आहे.Farmer success story

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Farmer success story

व्यवसायाची सुरुवात

गणेश अंधारे या तरुणाचे प्राथमिक शिक्षण देऊळगाव राजा या ठिकाणी पूर्ण झाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डेरी टेक्नॉलॉजी या विशिष्ट कोर्समध्ये उच्च शिक्षण घेण्याचे ठरवले. त्याने डेरी कोर्समध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने अमुल कंपनीमध्ये काही दिवस कामाचा देखील अनुभव घेतला. या अनुभवाच्या जोरावर आणि स्वतःच्या जिद्दीवर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला. विविध अर्थाने चा सामना करत त्याने आपल्या गावातच स्वतःचा डेअरी प्रोडक्शन प्लॅट उभा केला. Farmer success story

गावातच त्याने डेरी प्रोडक्शन प्लांट उभा केल्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली. आजच्या घडीला याच्या प्लॅन्टवर दररोज दहा हजार लिटर दूध जमा केलं जातं. हे दूध फक्त विकण्यापुरतं न वापरता त्या दुधावर प्रक्रिया करून दुधापासून बनणारे विविध दुग्धजन्य पदार्थ बनवून तो बाजारात विकत आहे. त्याच्या प्लांट मधून दूध दही तूप बासुंदी पेढा यासारखे विविध दुग्धजन्य पदार्थ बनवले जातात. त्यांनी बनवलेल्या पदार्थांना दिवसेंदिवस मागणी वाढत गेल्यामुळे त्यांनी आपल्या उत्पादनाचं ब्रँड मध् रूपांतर केलं. त्याने त्याच्या ब्रँडला गोपेश्वर या नावाची ओळख देखील निर्माण केली.

हे वाच : अभ्यासातून ड्रॅगन फ्रुट पिकात शोधली संधी

गावातून सुरू केलेला हा व्यवसाय गणेश ने हळूहळू वाढवायला सुरुवात केली. मालाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे त्याच्या मनाला जास्त प्रमाणात मागणी वाढू लागली. त्यांनीही वाढत्या मागणीची पूर्तता करण्याचे पूर्ण धोरण स्थापित केले. या त्याच्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर त्याने त्याच्या प्लांटची वार्षिक लढ 50 ते 60 लाख रुपयापर्यंत पोहोचवली आहे. एवढेच नाही तर त्याच्या या फ्लॅटमुळे स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार देखील उपलब्ध झाला आहे.Farmer success story

गणेश यशस्वी कसा झाला

गणेश अंधाराची ही कहाणी तर आपण पाहिली परंतु गणेश यशस्वी का झाला हे पाहणे देखील महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याच वेळा आपण देखील काही करण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्याला त्यामध्ये फारसा यश मिळत नाही. यश न मिळणे मागं प्रत्येक वेळी बाजाराची चूक नसते तर काही वेळी आपले देखील चूक असू शकते. त्यामुळे गणेश यशस्वी होण्यामागील कारणे समजून घेतल्यास आपल्यालाही भविष्यात या गोष्टीचा कोठे ना कुठे नक्कीच फायदा होईल.

  • गणेश या क्षेत्रात यशस्वी होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे गणेशने त्याच क्षेत्रामध्ये आपली डिग्री पूर्ण केली होती. त्या क्षेत्रात डिग्री केल्यामुळे गणेशला त्या व्यवसायाबाबत संपूर्ण माहिती त्याच्या अभ्यासक्रमातूनच प्राप्त झालेली होती.
  • गणेशने काही दिवस कंपनीमध्ये काम केले या कंपनीमध्ये काम करताना त्याला कंपनीमध्ये काम कसं चालतं कोणत्या गोष्टी कोठे सांभाळायचे असतात मॅनेजमेंट कसं करायचं असतं या सर्व गोष्टींचा अनुभव त्याला स्वतः पाहायला मिळाला.
  • सुरुवात करताना कोणासाठी सुरुवात सोपी नसते गणेश साठी देखील तीच परिस्थिती होती. परंतु गणेश या परिस्थितीला खचून न जाता परिस्थितीचा सामना करत आपला व्यवसाय वाढवत गेला.
  • बाजारात मागणी कशाची आहे हे पाहून त्या मागणीचे पूर्तता गणेशने केली. त्याने निर्माण केलेल्या पदार्थांची गुणवत्ता चांगली असल्यामुळे स्थानिक बाजारात देखील त्याच्या उत्पादनाला किंमत आणि मागणी मिळायला सुरू झाली.

एकेकाळी इतरांसाठी काम करणारा हा तरुण आज अनेक तरुणांना स्वतः रोजगार देत आहे. कष्टाच्या शिक्षणाच्या आणि कौशल्याच्या जोरावर त्याने आपला व्यवसाय वार्षिक 60 लाख रुपये पर्यंत पोहोचवला आहे. मिळालेली नोकरी सोडून स्वतः व्यवसाय करण्याचे स्वप्न पाहणार तरुण त्याच्या स्वप्नांना यशस्वीपणे साकार करू शकला आहे. गणेशने आपले शिक्षण जिद्द कष्ट आणि अनुभव या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाला मोठे करत आपले नाव लौकिक केले आहे. याच तरुणाचा आदर्श तेथील आसपास असणाऱ्या गावातील तरुण देखील घेत आहेत.Farmer success story

Leave a comment

Close Visit Batmya360