महाराष्ट्र राज्य तसेच केंद्र शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहे जास्तीत जास्त योजना या महिलांसाठी असतात महिलाचा आर्थिक विकास व्हावा त्या स्वतःच्या पायावर उभे राहावे स्वतः चार पैसे कमवावे अशा हेतूने महाराष्ट्र राज्य केंद्र शासनामार्फत महिलांसाठी वेगवेगळे योजना राबविण्यात येत त्यातलीच एक योजना आहे ती आपण आज पाहणार आहोत ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेमध्ये महिलांना शंभर टक्के अनुदानावरती मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे.
मोफत पिठाची गिरणी ही योजना ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असते अशा महिलांना या गिरणी मार्फत एक चांगली रोजगार संधी मिळेल. आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या महिलांना या योजनेचा भरपूर फायदा होणार आहे. त्यानंतर ज्या महिला घरात घर काम करतात त्या महिलांकरिता एक नवीन उद्योग जोडधंदा म्हणून पिठाची गिरणी हा करता येऊ शकेल. हा व्यवसाय करताना घरचे घर काम पण होईल आणि चार पैसेही कमवू शकतोन. ही योजना विशेषता ग्रामीण भागातील महिलांकरिता आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांसोबत शहरी भागातील महिला सुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ ग्रामीण असो या शहरी असो या दोन्हीही भागातील महिलांना साठी खास करून ही योजना राबविण्यात येते . महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा शासनाकडून म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत योजना राबविण्यात येत आहे.
मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी
अर्जदार महिलांचे वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे तसेच ज्या महिलांचे एक लाख वीस हजार पेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांसाठी आहे या योजनेमध्ये आपण आज आवश्य लागणारे कागदपत्रे, या योजनेसाठी कोण पात्रता आहे, वैशिष्ट्ये, अर्ज करण्याची पद्धत या सर्वांची माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत हा लेख मी शेवटपर्यंत वाचावा.
मोफत पिठाची गिरणी या योजनेचे उद्दिष्ट
महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- ज्या महिलांना स्वतःचा घरी व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे त्या महिलांसाठी शंभर टक्के अनुदान या योजनेत सुरुवात करण्यात आलेली आहे.
- स्वतःच्या पायावर उभे राहून महिलांनी थोडे फारसे पैसे स्वतःच्या कुटुंबाला घर खर्च भागवण्यास त्या महिलेकडून मदत होईल या उद्देशाने योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मोफत पिठाची गिरणी या योजनेमुळे राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारणार आहे. होणार.
- योजनेमुळे ज्या महिलांच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आहे अशा महिलांसाठी खूप फायद्याचे आहे.
- मोफत पिठाची गिरणी या योजनेमुळे बेरोजगार महिलांच्या हाताला काम मिळणार आहे.
- महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढ झाल्याने त्यांचे मुळे जीवनमान सुधारणार आहे.
- मोफत पिठाची गिरणी या योजनेमुळे राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम होतील.
मोफत पिठाची गिरणी या योजनेची वैशिष्ट्ये
- * ही योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत पिठाची गिरणी योजना सुरू करण्यात आलेली आहे.
- * या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती खूप सोपी ठेवलेली आहे जेणेकरून या महिलांना अर्ज करताना कुठल्याही अडचणीचा सामना करावा. लागू नये मी.
- * मोफत पिठाची गिरणी ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी राबवण्यात येणारआहे
- * मोफत पिठाची गिरणी ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी शासनाने सुरू केलेली आहे.
मोफत पिठाची गिरणी या योजनेचे फायदे
- * महाराष्ट्र शासनातर्फे ही योजना दारिद्र्यरेषेखालील महिला व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिला साठी राबविण्यात येत आहे काय.
- * मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत महिलांना मोफत गिरणी मिळणार आहे.
- * या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःचा घरगुती उद्योग सुरू करतील व त्यांच्या हाताला काम मिळेल.
- * आर्थिक दृष्ट्या मागास ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उत्पन्नात या योजनेमुळे वाढ होईल.
- * मोफात पिठाची गिरणी या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल
- * ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास या योजनेमुळे होण्यास मदत होईल.
- * या योजनेअंतर्गत घरगुती उद्योग सुरू झाल्यामुळे कामासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही.
मोफत पिठाची गिरणी योजनेचे नियम व अटी
- * मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी अर्ज करणारी अर्जदार महिला ही महाराष्ट्राची मूळ रहिवासी असावी.
- * मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर असेल तर या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- * मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी ग्रामीण भागातील महिलांना लाभ दिला जाईल.
- * या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- * मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाख पेक्षा जास्त असू नये.
- * गरीब व बेरोजगार अशा महिला या योजनेसाठी जास्तीत जास्त पात्रता असते.
- * या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय 18 ते 60 वर्षे या वयोगटात दरम्यान असावे.
- * या योजनेअंतर्गत अर्ज करणारी अर्जदार महिला कोणत्याही शासकीय नोकरीत असू नये.
- * केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत पिठाच्या गिरणीचा अर्जदार महिलेला लाभ या अगोदर मिळालेला नसावा, त्यामुळे अशा परिस्थितीत त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- * एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना या योजनेचा लाभ मिळत असेल तर त्यापैकी एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल.
मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे
- जर महिला अनुसूचित जाती जमाती नसेल तर अर्ज रद्द केला जाईल.
- ज्या महिलेने अर्ज केलाय ती महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी नसेल तर त्या महिलेचा अर्ज रद्द केला जाईल.
- मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखापेक्षा जास्त असल्यास त्या महिलेचा अर्ज रद्द केला जाईल.
- या योजनेसाठी अर्जदार महिलेने अर्जामध्ये खोटी माहिती जर भरली असेल तर अर्ज रद्द केला जातो
- अर्जदार महिलेचे वय 18 पेक्षा कमी किंवा 60 पेक्षा जास्त असेल तर अर्ज रद्द केला जातो.
*मोफत पिठाची गिरणी योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- राशन कार्ड
- पीठ गिरणी कोटेशन
- बँक पासबुक
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- व्यवसायासाठी जागा असल्या नमुना 8/12 घराचा उतारा
मोफत पिठाची गिरणी पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- अनुसूचित /जाती जमाती या वर्गातील महिला या योजनेसाठी पात्र आहे
- या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिला मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी लाभ घेता येईल.
- लाभार्थ्याचे कुटुंबाचे उत्पन्न एक लाख किंवा दोन लाखापेक्षा कमी असावी अशा कुटुंबांना मोफत पिठाची गिरणी साठी पात्रता असते.
- या योजनेसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबातील महिला पात्र असतील.
- 18 ते 60 वयोगटातील मुली किंवा महिला मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी पात्र असते.
मोफत पिठाची गिरणी अर्ज करण्याची पद्धत
- आपल्याला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयातील महिला व बाल विकास विभागाचा मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- त्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित योग्य ती भरावी लागेल.
- तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
- त्यानंतर तो अर्ज कार्यालयात जमा करून अर्जाची पोच पावती घ्यावी.
आश प्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
विचारले जाणारे प्रश्न
- या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान?
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास पिठाच्या गिरणीच्या एकूण किमतीच्या शंभर टक्के अनुदान दिले जाते.
- मोफत पिठाची गिरणी या योजनेचा काय उद्देश आहे?
- मोफत पिठाची गिरणी या योजनेचा उद्देश महिलांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देणे.
- या योजनेचीअर्ज करण्याची पद्धत?
- या योजनेची अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे.
- मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी कोण पात्रता आहे.
- मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी महाराष्ट्रातील रहिवासी पात्रता असतील.