Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार; या योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी 105 कोटी रुपये मंजूर….!

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana : महाराष्ट्र राज्यात खूप सारे धरणे, जलसाठे आहेत. या धरणामध्ये दरवर्षी गाळ साठत असतो. ज्यामुळे धरणाच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने या धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून तो शेतात पसरविल्यास धरणाची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होते आणि त्याबरोबरच कृषी उत्पन्न देखील वाढ होते. या गोष्टीचा विचार करून राज्य शासनाने राज्यातील धरणामधील गाळ काढणे आणि तो गाळ शेतामध्ये वापरणे यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार (Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana) योजना सुरू करण्यात आली आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

तर आता राज्यातील जलसाठ्यामधील गाळ काढण्याच्या आणि गाळयुक्त माती शेतकऱ्यांच्या शेतात पसरवण्याच्या कामासाठी निधी वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. जलसाठ्यामधील साचलेला गाळ काढण्यासाठी आणि ती माती शेतात पसरवण्याच्या कामासाठी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार (Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana) या योजनेअंतर्गत एकूण 105.41 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana

हा निधी वितरणाचे नियम व अटी काय आहेत?

हा निधी आयुक्त, मृदा व जलसाधारण विभाग, औरंगाबाद यांच्या मार्फत जिल्हा जलसाधारण अधिकाऱ्यांना वितरित करण्यात येत आहे. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी निधी संबंधित अशासकीय संस्थांना तातडीने निधी वितरित करावा. आणि याबाबत शासनाला अहवाल सादर करावा. Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana

हे वाचा : शेतकऱ्यांसाठी भोगवटदार वर्ग 2 जमिनीवर तारण कर्ज मिळणार, महसूल विभागाचा मोठा निर्णय…

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान वितरण

शेतकऱ्यांनी जर गाळ काढलेला असेल तर त्या कामाची तपासणी करून, पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या निधीपेक्षा अधिक रक्कम देण्यात येणार नाही.

शासनाने दिलेल्या निधीचा योग्य तो वापर करावा

  • शेतकऱ्यांना जर हा निधी काही कारणामुळे खर्च न झाल्यास, तो निधी दुसऱ्या कामासाठी वापरता येणार नाही .
  • हा निधी वापर न झाल्यास शासनाकडे परत जमा करणे बंधनकारक असेल.

शासनाकडून दिलेल्या निधी खर्चाची जबाबदारी

  • शेतकऱ्यांनी हा निधी फक्त गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेच्या कामासाठीच वापरण्यात यावा.
  • जर वितरण प्रक्रियेत काही अनियमितता आढळून आल्यास, तर संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचे उद्दिष्टे आणि फायदे काय?

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार (Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana) योजनेचा मुख्य उद्दिष्टे म्हणजे धरणांमधील गाळ काढून धरणाची साठवण क्षमता वाढविणे आणि हा गाळ शेतात वापरून जमिनीची सुपीकता वाढविणे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आणि शेतातील फायदे होऊ शकतात.

  • धरणामध्ये साठवलेला गाळ काढल्यामुळे त्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढेल. दुष्काळ भागाला मदत मिळेल.
  • धरणातील गाळ शेतकऱ्यांनी शेतात नेऊन पसरविल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते.
  • गाळ युक्त शिवार योजनेमुळे खडकाळ आणि पडीक जमीन सुपीक होतात ज्यामुळे आपल्याला त्या जमिनीमध्ये उत्पन्न चांगले मिळते.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे गुणवत्ता होते, अमोल शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो. Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana

Leave a comment

Close Visit Batmya360