insurance profit: पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांपेक्षा कंपनीलाच फायदा..!

insurance profit केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी देशांमध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली. योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमध्ये अनेक नियम निकष लावत कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचे काम केलं आहे. पिक विमा कंपन्या प्रत्येक वेळी नियमावर बोट ठेवत शेतकऱ्यांना पिक विमा लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात. यातच आता शेतकऱ्यांपेक्षा पिक विमा कंपनीलाच पिक विमा योजनेचा जास्त फायदा झाला असल्याचे समोर आले आहे.

20250407 230359

मागच्या पाच वर्षांमध्ये पिक विमा कंपन्यांना 50 हजार कोटींचा नफा झालेला आहे. मागच्या तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई रक्कम कमी होत गेली आणि याचा फायदा पिक विमा कंपन्यांना होत राहिला. मागच्या पाच वर्षांमध्ये पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्याकडून राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून एकूण एक लाख 54 हजार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. या प्राप्त झालेल्या निधी पैकी पाच वर्षांमध्ये पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना एक लाख चार हजार कोटी रुपयांची भरपाई दिलेली आहे. या प्रकारची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

insurance profit पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपनीसाठी

केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो पिक विमा योजना चा ढोल वाजवल्याशिवाय राहत नाही. मग यामध्ये मिळणाऱ्या लाभाकडे देखील शासनाचं लक्ष असणं आवश्यक आहे. खरच पात्र असणारे शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ होतोय का याची तपासणी देखील शासनाने करणं आवश्यक आहे. पिक विमा योजना ही नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली योजना आहे. मागील पाच वर्षाचा विचार केला तर देशातील शेतकऱ्यांना पीक विम्यातून मिळणारी जी रक्कम आहे ती हळूहळू कमी होत गेलेली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक एप्रिल 2025 रोजी संसदेमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिलेली आहे. या माहितीमधून असे स्पष्ट होत आहे की 2019 20 ते 2023 24 या कालावधीमध्ये पिक विमा कंपन्यांना अधिक नफा झाला आहे.

त्यापैकी मागील तीन वर्षांमध्ये पिक विमा कंपन्यांना अधिक नफा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच पिक विम्यातून बाहेर पडलेला अनेक कंपन्या पुन्हा पीक विमा योजना राबवण्यासाठी उपलब्ध होत आहेत. कंपनीला शेतकऱ्याकडून राज्य शासनाकडून आणि केंद्र सरकारकडून मिळालेले रक्कम आणि कंपनीने वाटप केलेली रक्कम यामध्ये जवळपास 50 हजार कोटी रुपयांची तफावत दिसून येत आहे. हि तफावत पिक विमा कंपन्या चा नफाच असल्याचे उघड झाले आहे.

सर्वात कमी वाटप यायची कडून

सरकारने सादर केलेल्या उत्तरी अहवालामध्ये पिक विमा योजनेत एकूण 18 कंपन्या काम करत आहेत. यामधील सर्वाधिक वाटा हा एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया या कंपनीचा आहे. यायची कंपनीकडून 20023-24 या हंगामात शेतकऱ्यांना 5565 कोटी रुपयांची पिक विमा भरपाई वाटप केली गेली. मात्र त्याच वर्षी यायची कंपनीला पिक विमा हप्त्यातून 9490 कोटी रुपये मिळाले आहेत.

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला 2023 24 मध्ये एकूण पिक विमा हप्त्याच्या माध्यमातून 3784 कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने केवळ 12 69 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना वाटप केली आहे.

कप अँड कॅप मॉडेल

केंद्र सरकारने खरीप हंगाम 2023 पासून रचना कप अँड कॅप मॉडेल नुसार पिक विमा योजना राबविण्याची परवानगी दिली. यानुसार महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी ८०:११० मॉडेल नुसार पिक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या मॉडेल नुसार विमा कंपन्यांनी एकूण विमा हप्त्याचे 80% पेक्षा कमी भरपाई वाटली असेल तर कंपन्यांना केवळ 20% प्रशासकीय खर्च रक्कम ठेवून उर्वरित रक्कम राज्याला परत करावी लागेल. जर कंपन्याने 110% पेक्षा जास्त भरपाई शेतकऱ्यांना वाटप केली असेल. तर ही रक्कम राज्य शासनाने कंपनीला द्यावी असे ठरलेले आहे.

केंद्र शासनाच्या या कप अँड कॅप मॉडेल नुसार पिक विमा कंपन्यांना अधिक फायदा मिळत राहिला. जर पिक विमा कंपनी तोट्यात जात असेल तर राज्य शासन पीक विमा कंपनीला अधिक निधी वितरित करते. परंतु जर पिक विमा कंपनी अधिक नफ्यामध्ये राहत असेल तर पिक विमा कंपनी आलेल्या एकूण निधी पैकी 20% रक्कम आपल्याकडे ठेवून उर्वरित रक्कम राज्य शासनाला परत देते. या नियमामुळे पिक विमा कंपन्या अधिक फायद्यात दिसून येत आहेत.

पिक विमा कंपन्या जरी अधिक फायद्यामध्ये असल्या तरी देखील शेतकऱ्यांना मात्र पिक विमा पासून बऱ्याच वेळा वंचित ठेवले जाते. बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करून पीक नुकसानीची तक्रार कंपनीकडे करून देखील पिक विमा चा लाभ मिळत नाही. अशावेळी शेतकऱ्यांच्या मनात पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे की पिक विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे असा प्रश्न निर्माण होतो.

Leave a comment

Close Visit Batmya360