jesht nagrik 3000 राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारावे याकरिता राज्य शासनाने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजनेची घोषणा केली राज्यातील 65 वर्षे व 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे या आर्थिक लाभासाठी कोण पात्र असणार अर्ज कसा करायचा त्यासोबतच कागदपत्रे कोणती लागणार याची सविस्तर माहिती आज पाहणार आहोत.
राज्यामधील 65 वर्षे आणि 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनमानात सुधारणा यावे व त्यांना सहकार्य मिळावे यासाठी योजना अमृत आणि ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी व त्यांना आवश्यक लागणारे साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी विविध आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असणारी आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून एक रकमी 3000 रुपये एवढी रक्कम ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
jesht nagrik 3000 कोणत्या वस्तू खरेदी करता येतील.
या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक लागणारे वस्तू खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य दिले जाते यामध्ये प्रामुख्याने चष्मा श्रवण यंत्र ट्रायपॉड स्टिक फिल्चर होल्डिंग वॉकर कमोड खुर्ची प्रेस नंबर बेल्ट सर्व एकल कॉलर या वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त देखील काही घटकांचा समावेश आवश्यकतेनुसार करण्यात आलेला आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना आपले आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, स्वय घोषणापत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
योजनेची पात्रता काय
- 31 डिसेंबर 2023 अखेर वयाची 65 वर्षे पूर्ण केली असावी.
- आधार कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्ड पावती देखील चालू शकते.
- आधार कार्ड उपलब्ध नसल्यास किंवा आधार कार्ड काढलेले नसल्यास इतर ओळखपत्राच्या आधारे देखील ओळख करून देण्यासाठी ग्राह्य धरले जाऊ शकतील.
- वयो वृद्ध व्यक्तीला वृद्धपकाळात आवश्यक असणारी घटकाचे प्रमाणपत्र संबंधित आरोग्य विभागाकडून घेतलेले असावे.
- लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत असावी उत्पन्न प्रमाणपत्र देखील सादर करावे लागेल.
अर्ज कसा करावा
या योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी अर्जदारांना आपल्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये देखील अर्ज सादर करता येणार आहे. त्यासोबतच महिला व सामाजिक विभाग अंतर्गत देखील अर्ज सादर करून घेतले जाते. ज्या लाभार्थ्यांना या घटकाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्ज व अर्ज सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडून संबंधित कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी आपण सरकारच्या या संकेतस्थळावर देखील पाहू शकता. संकेतस्थळांची लिंक येथे क्लिक करा.