kanda chal anudan: कांदा उत्पादकांना कांदा चाळीसाठी मिळणारा अनुदान..!

kanda chal anudan : कांद्याच्या दरामध्ये नेहमीच चढ-उतार होताना आपण पाहतो. या दरामध्ये होणाऱ्या चढउतारामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देखील सहन करावा लागतो. शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठवता ही येत नाही. शेतकऱ्यांनी काही दिवस कांदा साठवणूक केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर देखील मिळू शकतो. ज्यावेळी कांद्याचे दर कमी असतील अशावेळी शेतकरी आपल्याकडील कांदा साठवणूक करून. ज्यावेळी चांगले दर मिळतील त्यावेळी बाजारात विकू शकतील.

कांदा साठवणूक करायचे म्हटलं की निवारा आणि खेळती हवा असणारी कांदा चाळ (kanda chal anudan) असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना कांदा चाळ निर्मितीसाठी सरकारकडून अनुदान देखील दिले जात. शेतकऱ्यांना कांदा चाळ साठी मिळणारे अनुदान याचा लाभ कसा मिळवायचा. अर्ज कसा करायचा कोणती कागदपत्रे लागतात किती अनुदान मिळतं याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. kanda chal anudan

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
kanda chal anudan

कांदाचाळ अनुदान किती

कांदा चाळ (kanda chal anudan) ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक फायदा करून देणारी सुविधा आहे. या कांदा चाळीसाठी सरकारकडून अनुदान देखील वितरित केले जाते. आधुनिक पद्धतीने कांद्याची साठवणूक करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना कांदा चाळ निर्मितीसाठी अनुदान वितरित करते. शेतकऱ्यांना कांदा चाळ निर्मितीसाठी प्रति टन 3500 याप्रमाणे शासनाकडून अनुदान दिले जाते. शेतकरी जास्तीत जास्त २५ टन क्षमतेची कांदा चाळ या योजनेतून घेऊ शकतात. कांदा चाळ निर्मितीसाठी शेतकऱ्यांना 87 हजार 500 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. kanda chal anudan

हे वाचा : शेतात बोरवेल खोदण्यासाठी सरकार देते अनुदान… असा मिळवा लाभ.

kanda chal anudan अर्ज कसा करावा

कांदा चाळ निर्मितीसाठी अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकरी महाडीबीटी या पोर्टलवर कांदा चाळ या घटकासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला सातबारा आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता लागते. या सर्व कागदपत्राच्या आधारे आपण महाडीबीटी पोर्टलवर कांदा चाळ अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. kanda chal anudan

kanda chal anudan लाभ कसा मिळतो

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना कांदा चाळ अनुदान लाभ कसा मिळतो. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांचा अर्ज लॉटरी पद्धतीने निवडला जातो. ज्या शेतकऱ्यांशी लॉटरी पद्धतीने निवड होते अशा शेतकऱ्यांना पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकरी आपल्या कांदा चाळीचे काम सुरू करू शकतात. कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून व कृषी अधिकारी यांच्या तपासणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कांदा चाळीअंतर्गत मिळणारे अनुदान आपल्या बँक खात्यावर जमा केले जाते. कांदा चाळ निर्मिती अनुदान हे शेतकऱ्याच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत वितरित केले जाते.

कांदा चाळ योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 87 हजार पाचशे रुपये पर्यंत अनुदान वितरित केले जाते. कांदा चाळ निर्मिती अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावा लागेल. शेतकरी 25 टन क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचे देखील कांदा चाळ घेऊ शकतात. ज्या क्षमतेची आपण कांदा चाळ घेतली आहे त्या क्षमतेचे अनुदान आपल्याला शासनाकडून दिले जाते. शासनाचे नियमानुसार शेतकऱ्यांना प्रति टन क्षमता 3500 या प्रमाणात कांदा चाळीसाठी अनुदान दिले जाते.

कांदा चाळीचा शेतकऱ्यांना फायदा

कांदा चाळ असणारे शेतकऱ्यांच्या कांद्याचे नुकसान कमी प्रमाणात होते. ज्यावेळी कांद्याला दर कमी असतील अशावेळी शेतकरी आपला कांदा अत्याधुनिक पद्धतीने बनवलेल्या या कांदा चाळीमध्ये साठवू शकतात. साठवलेला कांदा ज्यावेळी दर चांगला मिळेल त्यावेळी विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करू शकतात. ज्यामुळे शेतकऱ्यांचा अधिक आर्थिक फायदा होतो. कांदा चाळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कांद्याचे नुकसान देखील कमी होते. साठवणूक केलेला कांद्याला बाजाराचा अभ्यास करून बाजारात उपलब्ध केल्यास या पिकापासून शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो. kanda chal anudan

Leave a comment

Close Visit Batmya360