kanda market update : कांद्याचा दरात घसरण होण्याची पहा काय आहेत कारणे.

kanda market update : मागील काही दिवस सोन्याचे दिवस पाहिलेला कांदा किमतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू आहे . किमती कमी झाली त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढत आहे. कांद्याची किंमत का घसरत आहे तसेच कांद्याची घसरण कधी थांबेल? याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहेत. यातच कांदा निर्यात शुल्क 20% आकारला जातो हा कधी कमी केला जाईल? किंवा याची अट रद्द कधी केली जाईल. तसेच विविध शेतकरी संघटना तसेच शेतकरी यांच्याकडून कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी देखील वारंवार करण्यात येत आहे.

kanda market update

एक महिन्यात कांद्याचे दर किती पडले

kanda market update पणन मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार मागील एक आठवडा मध्ये कांद्याचे भाव 10 ते 11 टक्क्यांनी घसरले आहेत. 08 डिसेंबर 2024 ते 08 जानेवारी 2025 ह्या एक महिन्याच्या काळामध्ये कांद्याच्या किमतीमध्ये 44 ते 45 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा: रब्बी ई पीक पाहणी करण्यासाठी 15 जानेवारी अंतिम तारीख

भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंता निर्माण होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघण्याची चिंता देखील आता वाढत आहे. यातच जर केंद्र शासनाने निर्यात शुल्क 20 टक्के पेक्षा कमी केला नाही किंवा रद्द केला नाही तर कांद्याच्या किमती मध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळू शकते.

कांदा किंमत कमी होण्याचे कारण

kanda market update मागील पाच ते सहा महिन्यात कांद्याला चांगला दर मिळत होता. परंतु आता एका महिन्यातच कांद्याचे भाव जमिनीला टेकले आहेत. हे कांद्याचे भाव नेमके का पडत आहेत याबद्दलची माहिती घेऊया. मुळात कांदा भाव पडण्या मागचे किंवा कमी होण्यामागचे कारण म्हणजे बाजारात कांदा पिकाची आवक वाढणे. लेट खरीप हंगामातील जो कांदा बाजारात आला आहे त्या कांद्यामुळे बाजारातील भाव कमी होत आहेत.

लेट खरीपातील हा कांदा नैसर्गिक आपत्तीमुळे साठवणुकीसाठी योग्य नसल्यामुळे हा कांदा काढणीस आला तसा बाजारात उपलब्ध केला जात आहे. त्यामुळे कांद्याची आवक वाढली आहे आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात देखील मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळत आहे. बाजारात कांद्याची मुबलक आवक निर्माण झाल्यामुळे कांदा पिकाचे दर कमी होत आहेत.

kanda market update निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी

कांदा बाजारात आवक वाढली असून राज्यातील खरीप हंगामातील कांदा देखील बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे. आवक वाढल्यामुळे कांद्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. याशिवाय कांदा किमती मध्ये घसरणी मध्ये कांदा निर्यातीवर लावला जाणारा 20% शुल्क हे कारण देखील आहे. या शुल्कामुळे निर्यातीवर खूप मोठा परिणाम उद्भवतो ज्यामुळे कांद्याच्या किमतीमध्ये घसरण सुरूच आहे.

राज्यातील शेतकरी तसेच विविध शेतकरी संघटना लोकप्रतिनिधी यांनी वारंवार कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याबाबत आवाज उठवला. सरकार ला निवेदन दिली तरीपण कांद्यावरील निर्यात शुल्क हटवला जात नाही. जोपर्यंत कांद्यावरील निर्यात शुल्क हटवला जात नाही; तोपर्यंत कांद्याला योग्य भाव मिळणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

1 thought on “kanda market update : कांद्याचा दरात घसरण होण्याची पहा काय आहेत कारणे.”

Leave a comment