निधी मंजूर असून देखील का होतोय कापूस सोयाबीन अनुदान वाटपास विलंब. kapus soyabean anudan

kapus soyabean anudan : राज्य शासनाने राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5000 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. या अनुदाना दरम्यान 96 लाख शेतकऱ्यांना पात्र ठरविण्यात आले. त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ देखील देण्यात आला; परंतु राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी का विलंब होतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी 96 लाख शेतकरी या अनुदानासाठी पात्र झाले आहेत. यासाठी राज्य शासनाने निधी मंजूर करून कृषी विभागाच्या खात्यावर जमा देखील केला आहे. परंतु उर्वरित शेतकऱ्यांना हे अनुदान अद्याप पर्यंत मिळाले नाही. याचे कारण काय तसेच उर्वरित अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल असे विविध प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उद्भवत आहे.

राज्य शासनाने खरीप 2023 हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर पासून अनुदान वाटपास सुरुवात केली होती. पहिल्या टप्प्यात जवळपास 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2398 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. पण त्यानंतर अनुदान वाटपास विलंब होत आहे. शासनाने रक्कम जमा केलेली असताना देखील कृषि विभाग का विलंब करत आहे याबद्दलची शंका शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

किती निधी वाटप करण्यात आला.

अनुदान वाटप सुरू झाल्यापासून म्हणजेच 30 सप्टेंबर पासून 10 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील 67 लाख 60 हजार खातेदारांच्या बँक खात्यावर 2564 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. पण त्यानंतर म्हणजे 10 ऑक्टोंबर पासून 20 ऑक्टोबर पर्यंत केवळ 25 कोटी रुपयांचा निधी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. या अनुदानापोटी शासनाने 4194 कोटी रुपये कृषी विभागाकडे आधीच जमा केलेले असताना देखील त्यातील फक्त 2589 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत.

kapus soyabean anudan किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ.

kapus soyabean anudan कापूस सोयाबीन अनुदान अंतर्गत आता पर्यंत म्हणजेच 20 ऑक्टोबर पर्यंत 67 लाख खातेदारांना हे अनुदान वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2589 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. त्या माध्यमातून या जास्तीती जास्त शेतकऱ्यांना दोन हेक्टर कापूस व दोन हेक्टर सोयाबीन या मर्यादेच्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे.

हे वाचा: सीबील स्कोअरचे महत्व आणि कसा तयार होतो.

अनुदान वाटपास काय आहेत अडचणी.

kapus soyabean anudan कापूस सोयाबीन अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या कृषी सहायक यांच्याकडे आपले सहमती पत्र भरून देणे आवश्यक होतं. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी हे सहमती पत्र भरून न दिल्यामुळे या शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन अनुदानाचा निधी वितरित करण्यात आलेला नाही. यामध्ये 96 लख शेतकरी पात्र आहेत. त्यापैकी वैयक्तिक खातेदारांनी 64 लाख शेतकऱ्यांनी आपले आधार सहमती पत्र जमा केले आहे. परंतु 16 लाख संयुक्त खातेदार आणि 17 लाख वैयक्तिक खातेदारांनी अजून पर्यंत कृषी विभागाकडे आपले सहमति पत्र जमा केले नाही. त्यामुळे हे अनुदान वितरित करण्यास कृषी विभागाला विविध अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून ही अनुदान वितरित करण्यासाठी विलंब होत आहे.

कधी मिळेल उर्वरीत अनुदान

राहिलेले शेतकरी जसे सहमती पत्र जमा करतील त्या प्रमाणात त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाते. पहिल्या टप्प्यात संहमती पत्र जमा केलेल्या सर्वांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम डीबीटीच्या अंतर्गत जमा करण्यात आली आहे. पुढे ज्या प्रमाणात कृषी विभागाला सहमती प्रमाणपत्र प्राप्त होतील त्या सहमती पत्र सादर केलेले शेतकऱ्यांना हळूहळू निधी वितरित केला जाईल.

कापूस सोयाबीन अनुदान स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

1 thought on “निधी मंजूर असून देखील का होतोय कापूस सोयाबीन अनुदान वाटपास विलंब. kapus soyabean anudan”

Leave a comment