Kapus Soyabean Anudan Labh 2024 राज्यांमधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये मदत देण्याची घोषणा सरकारने केली होती यानुसार आजपासून जास्तीत जास्त 10 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

शिंदे सरकारने राज्यांमधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती यानुसार आज जास्तीत जास्त 10 हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Kapus Soyabean Anudan Labh 2024 शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा :
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीचे शुभारंभ करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे आता राज्यांमधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे वाचा : कापूस सोयाबीन अनुदान का मिळाले अनुदान कमी
4892 रुपये प्रति क्विंटल हमीभाव निर्धारित :
Kapus Soyabean Anudan Labh 2024 केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सोयाबीनचा हमीभाव 489 रुपये प्रति क्विंटल इतका निर्धारित केला आहे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे याबद्दल वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे. यासोबतच या मागणीला समर्थन देणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचादेखील मंत्रिमंडळ यांनी यावेळी आभार व्यक्त केले आहे.
किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ ?
2023 च्या खरीप हंगामात एकूण 96 लाख 787 खातेदार शेतकरी हे सोयाबीन आणि कापूस उत्पादक होते त्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने एकूण 4194 कोटी इतका निधी डीबीटी प्रणाली द्वारे उपलब्ध करून दिला आहे त्यापैकी 1548 कोटी 34 लक्ष रुपये कापूस तर सोयाबीनसाठी 2646 कोटी 34 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पोर्टल वरील माहितीनुसार जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम वर वितरित करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.दरम्यान शेतकऱ्यांना या योजनांमधून प्रति हेक्टरी 5000 रुपये आणि दोन हेक्टर मर्यादित 10,000 रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
Kapus Soyabean Anudan Labh 2024 ई केवायसी करणे बंधनकारक :
Kapus Soyabean Anudan Labh 2024 राज्य सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचावे यासाठी ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.