ladaki bahin free mobile. केंद्र सरकार व राज्य सरकारकडून महिला शक्ती करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक तसेच आर्थिक स्वातंत्र्य देण्याचे शासनाचा उद्देश आहे. यातच महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे अशी आणलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये एवढा लाभ दिला जातो.
महिलांसाठी सरकार कडून अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना त्यासोबतच अन्नपूर्णा योजना अशा विविध योजना महाराष्ट्र राज्य शासनाकडून राबवण्यात येत आहेत या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना विविध घटकांचा लाभ दिला जातो यामध्ये महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना प्रतिमाही पंधराशे रुपये हा लाभ दिला जात आहे या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महिलांच्या बँक खात्यावर सात हजार पाचशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
लाडक्या बहिणींना दिला जाणार का मोबाईल काय आहे प्रकार.
ladaki bahin free mobile सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांसाठी आनंदाची बातमी आणि महिलांना मोफत मिळणार मोबाईल अशा पद्धतीचा संदेश किंवा व्हिडिओ आपण पाहत आहात; परंतु यामागे नेमकं कारण काय आहे हे माहीत करून घेणे गरजेचे आहे. कारण महिलांना शासनाकडून मोबाईल गिफ्ट केला जाणार आहे अशा स्वरूपाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तसेच विविध प्रसार माध्यमाच्या माध्यमातून प्रसारित होत आहे. यामागील नेमकं कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ladaki bahin free mobile. खरंच मोबाईल मिळणार आहे का?
प्रसारमाध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून (विशेषतः यूट्यूब ) लाडक्या बहिणींना मोबाईल मोफत देण्याबाबतची माहिती प्रसिद्ध होत आहे परंतु यामध्ये कसलेही प्रकारची सत्यता आढळून आलेली नाही किंवा शासनाकडून अशा कोणत्या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बातमी पूर्णतः खोटी आहे हे सिद्ध होत आहे यासोबतच महिलांनी सतर्कता बाळगणे देखील गरजेचे आहे. जेणेकरून आपली आर्थिक फसवणूक होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
लाडक्या बहिणींना मिळणार मोफत मोबाईल ही बातमी पूर्णतः खोटी असल्यामुळे कोणत्याही महिलेने कोणत्याही लिंक वर क्लिक करून आपले कागदपत्रे अपलोड करणे किंवा आपली वैयक्तिक माहिती या ठिकाणी भरणे टाळावे जेणेकरून आपले होणारे आर्थिक नुकसान आपण टाळू शकतात..
सरकार मोबाईल गिफ्ट करणार का ?
राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना सरकारकडून मोफत अँड्रॉइड फोन दिला जाणार असल्याची माहिती कुठे असतेच आपण खात्री केली परंतु बऱ्याचशा महिलांकडून याबाबत विचारणा होत आहे त्यामुळे त्या महिलांनी यापासून सतर्कता बाळगावी जेणेकरून महिलांचे होणाऱ्या आर्थिक नुकसान टळू शकते.
ladaki bahin free mobile शासनाकडून महिलांना मोबाईल देण्याबाबतची कसल्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाही किंवा कोणताही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही त्यामुळे अशा खोट्या बातम्या पासून सावध रहा व आपल्या फसवणुकीपासून सतर्क रहा जेणेकरून आपले आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.