ladaki bahin news: आता लाडक्या बहिणीचे उत्पन्नाची होणार तपासणी…. या महिलांचा लाभ होणार बंद..

ladaki bahin news : या आधी महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना चार चाकी वाहनाच्या निकषातून वगळण्यात आलेले आहे. ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याची प्रक्रिया शासनाने पूर्ण केली आहे. आता राज्य शासन लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची (ladaki bahin news) तपासणी देखील करणार आहे. उत्पन्नाच्या तपासणी दरम्यान जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहे. अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना योजनेतून बाद ठरवण्यात येणार आहे. अशा महिलांना या पुढील हप्ते सरकारकडून वितरित केले जाणार नाहीत.

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण योजना आणली. राज्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. योजनेचे अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये लाभ देण्याचे मंजूर करण्यात आले. निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेमध्ये अनेक महिलांनी आपल्या ऑनलाईन अर्ज सादर केले. यामध्ये शासनाकडून वेळेअभावी संपूर्ण तपासणी करणे शक्य झाले नाही. ज्यामुळे सर्वच महिलांना लाभ वितरित करण्यात आला. निवडणूक पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून या लाडक्या बहिणीच्या अर्जाची तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली.ladaki bahin news

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ladaki bahin news

या लाडक्या बहिणी होणार अपात्र

सरकारने याआधी तपासणी दरम्यान चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांना योजनेतून वगळले आहे. आता राज्य सरकार अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांची तपासणी करत आहे. तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला या योजने मधून अपात्र ठरविण्यात येणार आहे. ज्या महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेतून कायमस्वरूपी वगळण्यात येणार आहे.

हे वाचा : रेशन कार्डधारकांना शेवटची संधी… अन्यथा लाभ होणार बंद!

या आधी 12 लाख महीला वगळल्या

शासन आता उत्पन्नाच्या आधारावर महिलांच्या अर्जाची तपासणी करणार आहे. परंतु शासनाने याआधीच चार चाकी वाहनाच्या आणि इतर शासकीय योजनेच्या तपासणी दरम्यान 12 लाख महिलांना या योजनेमधून वगळले आहे. यानंतर होणाऱ्या उत्पन्नाच्या तपासणीमध्ये आणखी बऱ्याच महिला या योजनेमधून बाद ठरवण्यात येतील. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल अशा महिलांचे अर्ज या योजनेतून रद्द करण्यात येतील. ladaki bahin news

आयकर विभागाकडून घेतली महिती

सरकारने याआधी परिवहन विभागाच्या मदतीने चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेतून वगळण्याचे काम पूर्ण केले आहे. आता राज्य सरकार व महिला व बाल विकास विभाग यांच्या तपासणी प्रक्रियेमध्ये आयकर विभागाचा देखील समावेश असणार आहे. आयकर विभागाकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबांची उत्पन्न तपासणी केली जाणार आहे. या तपासणी दरम्यान ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल अशा महिलांचे अर्ज रद्द केले जातील.ladaki bahin news

कशी होणार पडताळनी

लाडक्या बहिणींची उत्पन्न तपासणी ही राज्य स्तरावरून पार पाडली जाणार आहे. ही तपासणी प्रक्रिया स्थानिक स्तरावरून होऊ शकत नाही किंवा पार पाडली जाऊ शकत नाही. यामुळे राज्य सरकार आणि आयकर विभाग यांच्या मदतीने ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. जशी पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल तशा अपात्र झालेल्या महिलांची संख्या उपलब्ध होईल. ladaki bahin news

Leave a comment

Close VISIT MN CORNERS