ladki bahin arj लाडकी बहीण योजनेत 15 ऑक्टोबर पर्यन्त नवीन अर्ज करता येणार.

ladki bahin arj लाडकी बहीण योजनेत 15 ऑक्टोबर पर्यन्त नवीन अर्ज करता येणार. महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेल्या माहिती नुसार राज्यातील महिला ह्या येत्या 15 ऑक्टोबर पर्यन्त आपले अर्ज नवीन अर्ज सादर करू शकतील. ज्या पात्र महिलांनी अजून पर्यन्त आपले अर्ज सादर केले नाहीत अश्या महिलांनी आपले नवीन अर्ज 15 ऑक्टोबर च्या आत सादर करावे अशी देखील माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्या नंतर नवीन अर्ज करणे बंद होईल कारण राज्यात निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुका दरम्यान आचार संहिता लागेल त्या वेळी असे कोणतेही निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही. त्या मुळे ज्या पात्र महिला अर्ज करणे बाकी आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.

ladki bahin arj अर्ज कोठे करता येईल

लाडकी बहीण योजना नवीन अर्ज करण्यासाठी सरकार कडून ऑनलाइन पोर्टल निर्माण करण्यात आले होते. या पोर्टल वर या आधी स्वतः नोंदणी करण्यासाठी पर्याय उपलब्ध होता. परत्नू यात काही गैर प्रकार घडत आसल्यामुळे सरकार कडून स्वतः नोंदणी पर्याय बंद करून नवीन नोंदणी साठी फक्त अंगणवाडी सेविका यांच्याच माध्यमातून नवीन नोंदणी सुरू राहतील अशी देखील माहिती देण्यात आली आहे.

हे वाचा : माझी लाडकी बहीण योजना आपले स्टेटस काय सांगते पहा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Wheat Sowing गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

ladki bahin arj ज्या पात्र महिलांचे अर्ज करणे बाकी आहे त्यांनी आपल्या जवळील अंगणवाडी सेविका यांच्याकडे आपले कागदपत्रे सादर करावीत अंगडणवाडी सेविका आपला अर्ज ऑनलाइन करतील. अंगणवाडी सेविका यांनी ऑनलाइन केलेल्या अर्जाची तपासणी होईल व पात्र ठरलेल्या महिलांना प्रती महिना 1500 रुपये रक्कम मिळण्यास सुरू होईल.

लाडकी बहीण योजना अधिकृत संकेतस्थळ : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

Leave a comment