ladki bahin yojana : आर्थिक संकटाच्या भोवऱ्यात.

ladki bahin yojana : आर्थिक संकटाच्या भोवऱ्यात.

     महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी  लाडकी बहीण योजना.  या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे. आता या योजनेचे बहुतांश महिलांनी अर्ज देखील सादर केले आहेत परंतु या योजनेबद्दल अर्थ विभागाने खंत व्यक्त करत आपले  म्हणने सादर केले आहे.

    या योजनेचे अंतर्गत देण्यात येणारा लाभ यावर राज्य शासनाला एकूण 46 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त फार उचलावा लागणार आहे.  या अतिरिक्त रकमेमुळे अर्थ विभागाने याबाबत संकोच व्यक्त केला आहे हा निधी कुठून उपलब्ध करायचा हा प्रश्न अर्थ विभागानेच सरकारला विचारला आहे. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ladki bahin yojana

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  ladki bahin yojana ही योजना आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे अर्थ विभागाचे म्हणणे आहे. 

     परंतु शासनाला येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी या योजनेची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे वाटते. मध्य प्रदेश मधील  निवडणुकीच्या निकालावरून  शासनाने  वैयक्तिक लाभ देण्या बाबतचा  पाऊल उचलला आहे. 

   तिजोरीची चिंता कशाला?

    जवळपास दोन ते अडीच कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ladki bahin yojana या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. जरी या महिलांना पंधराशे रुपये लाभ मिळाला तरी त्या महिला ऑनलाईन पद्धतीने खरेदी करणाऱ्या नसून त्या आपल्याच भागातील दुकान व मंडई मधून खरेदी करणाऱ्या महिला असून यामुळे आपल्याच अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, (वनमंत्री) यांनी सांगितले

मग योजना राबवायच्या नाहीत का?

     राज्यावर आधीच कर्जाचा भरपूर बोजा आहे म्हणून नवीन योजनाच राबवायच्या नाहीत का?  ही योजना कष्टकरी, गोरगरीब महिलांकरिता आहे.  जमा खर्च किती व कर्ज किती हे पाहणे वित्त विभागाचे काम आहे. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी घेतलेला हा निर्णय योग्यच असल्याचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के  यांचे म्हणणे आहे. 

Leave a comment