Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात आल्यापासून ते आत्तापर्यंत या योजनेची चर्चा सगळीकडे सुरू आहे. या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत सात हप्ते वितरित करण्यात आले असून आता फेब्रुवारीचा 8 हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले होते. तर आपण या योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 8 वा हप्ता कधी दिला जाणार याबद्दल सविस्तर माहिती पाहूया .

Ladki Bahin Yojana फेब्रुवारी चा 8 वा हप्ता महिलांना कधी मिळणार ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी 3500 कोटीच्या चेकवर सही केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारी रोजी दिली होती .त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार हे म्हणाले होते की पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण (Ladki Bahin Yojana) योजनेची पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील असे त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी सांगितली होते त्यावेळी सांगितले होते .
हे वाचा : राज्यातील प्रयोगशील शेतीसाठी स्वातंत्र्य योजना ;शेतकऱ्यासाठी मोठी घोषणा!
Ladki Bahin Yojana विरोधकांकडून टीका करण्यात आली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारीला 3500 कोटी रुपये जमा करण्यात आले असून महिलांच्या बँक खात्यात आठवड्यात लाडकी बहीण योजने चा हप्ता वितरित करण्यात येईल असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते परंतु एक आठवडा उलटून गेल्यानंतर देखील महिलांना पैसे मिळाले नाही . त्यावरून विरोधकाकडून टीका सुरू करण्यात आली. अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कालपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अशी माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana मागील महिन्याचा निधी
या (Ladki Bahin Yojana) योजनेच्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये 25 जानेवारीपासून मिळण्यास सुरुवात झालेली आहे. आणि राहिलेल्या महिलांना येत्या दोन ते तीन दिवसात पैसे जमा होतील . जानेवारी महिन्यात 2 कोठी 41 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते. परंतु फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा फक्त पात्र महिलांनाच दिला जाणार आहे त्यामुळे अपात्र महिलांना फेब्रुवारी चा आत्ता मिळणार नाही.
Ladki Bahin Yojana 9 लाख महिला अपात्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर सर्वसाधारणपणे 9 लाख महिलांची संख्या कमी झालेली माहिती होती. त्यामुळे यावेळेस जानेवारी महिन्यापेक्षा कमी महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळतील.
दरम्यान, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसात राहिलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याच्या हप्ताचे वितरण केले जाईल अशी माहिती महिला व बाल विकास विभाग विभागाने दिली आहे.
फेब्रुवारी च्या हप्त्याला उशीर होण्याचे कारण काय?
अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी दिली जाणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग झाले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे देण्यास उशीर झाल्याची खात्याची माहिती, देखील विभागाकडून देण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana
1 thought on “Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी चा हप्ता जमा होण्यास सुरुवात…”