Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत खूप चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना जून ते जानेवारी महिन्यापर्यंत 1500 रुपये प्रति महिना देण्यात आला . पण मात्र आता महिलांना प्रतीक्षा होती ती फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची. तर यावर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थी महिलांच्या खात्यात वितरित होणार आहे असे सांगितले होते.

अडीच कोटी महिलांना मिळणार हप्ता
लाडक्या बहिणींना 7 मार्च रोजी तीन हजार रुपये मिळणार याबाबत स्वतः महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरेंनि घोषणा केली या योजनेतून सुमारे अडीच कोटी महिलांना 3000 रुपये दिले जाणार आहेत . लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेतून 9 लाख महिला अपात्र करण्यात आल्या आहेत , अर्जाची पडताळणी करत असताना या महिलांचे अर्ज बाद केले त्यामुळे त्या महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही .
हे वाचा :निवृत्तीपर्यंत करोडपती आणि पेन्शनचा लाभ;निवृत्त कर्मचाऱ्यांना किती फायदा होणार?पहा सविस्तर…
महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात1500 का 3000?
राज्यातील लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) बँक खात्यात 7 मार्च म्हणजेच आज सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिला दिनाचे मुहूर्त साधत राज्य सरकारने महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. तर महिला दिनाच्या अगोदरच पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे मॅडम म्हणाल्या होत्या की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 हजार रुपये महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येतील ,परंतु अनेक लाडक्या बहिणीच्या (Ladki Bahin Yojana) खात्यात 1500 रुपये आज पासून जमा झाले आहेत .
मार्च महिन्याचे 1500 कधी?
लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाईल अशी अपेक्षा होती परंतु, महिलांच्या खात्यावर आज सकाळपासून 1500 रुपये जमा करण्यात आले आहेत. तर मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी? असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये पडत आहे .येत्या दोन ते तीन दिवसात जमा होईल अशी अपेक्षा आहे.
2100 रुपयांचा हप्ता लांबणीवर
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले होते. परंतु आता या अर्थसंकल्पात 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे.कारण की ,
आदिती तटकरे मॅडम असे म्हणाल्या, आम्ही लाडक्या बहिणींना या अर्थसंकल्पात 2100 रुपये देऊ, अशी घोषणा कधीच आम्ही केली नाही.Ladki Bahin Yojana