Ladki bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना ही शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.
म्हणजेच पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ महिलांच्या खात्यात जमा होतो. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दहा हप्ते जमा करण्यात आले असून, ज्या महिला या योजनेच्या सुरुवातीपासून लाभ घेत आहेत अशा महिलांना आतापर्यंत 15 हजार रुपये देण्यात आले आहे. तर दुसरीकडे या योजनेचा 11 वा हप्ता कधीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो, याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. आज आपण या लेखामध्ये या संदर्भातील सविस्तर माहिती पाहणार आहोत.Ladki bahin Yojana

या योजनेचे 10 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा
माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 10 हप्ते जमा करण्यात आले आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 2025 असे दहा महिन्यांचे दहा हप्ते जमा करण्यात आले आहेत. या योजनेचा मागचा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे महिन्यामध्ये जमा करण्यात आला होता. 2 मे 2025 रोजी या योजनेचा दहावा हप्ता पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. Ladki bahin Yojana
हे वाचा : घरकुल हवंय ! ही आहे शेवटची संधी..! 2025
मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार?
मे महिना सुरू होऊन 12 ते 13 दिवस झाले आहेत आणि हा मे महिना संपण्यास फक्त आता 17 ते 18 दिवस बाकी आहेत. मे महिन्याचा पंधरवडा संपण्यास आता फक्त दोनच दिवस बाकी आहेत. अशा परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मे महिन्याचा हप्ता पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना कधी मिळणार असा प्रश्न महिलांच्या मनात पडत आहे.
लाडकी बहीण योजनेचा 10 वा (एप्रिल महिन्याचा) हप्ता 2 मे रोजी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. आता मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्यात येतो की काय असा प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनात निर्माण होत आहे. मात्र, मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्यात मिळणार नाही तर हा हप्ता मे महिन्यातच जमा केला जाईल अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट माध्यमातून समोर येत आहे.Ladki bahin Yojana
Ladki bahin Yojana
आता आज मे महिन्याची 13 तारीख आहे . म्हणजेच येत्या 15 दिवसांमध्ये मे महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो. या योजनेअंतर्गत दिला जाणारा अकरावा हप्ता एक ते पंधरा दिवसांमध्ये पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत दिले जाणारे हप्ते हे शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. म्हणजेच आता मे महिन्याचा हप्ता हा तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे सांगितले जात आहे.
यामुळे या योजनेचा 11 वा हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही . पण लवकरात लवकर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम या अधिकृत माहिती असा दावा केला जातोय.Ladki bahin Yojana