ladki bahin yojana 7 hafta लाडक्या बहिणीसाठी डिसेंबर हप्त्याचे वितरण , लाभार्थी महिलांसाठी खुशखबर.

राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक गुड न्यूज आहे . भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसांत लाभार्थींना वितरित केला जाईल. सोशल मीडियावर या योजनेबाबतच्या चर्चांदरम्यान ही माहिती महिलांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे.

मुनगंटीवार यांचे आश्वासन

सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, “लाडक्या बहिणींचा 2024 या वर्षाचा शेवट गोड होईल. याबाबत अजित पवारांशी माझी चर्चा झाली असून, त्यांनी डिसेंबरचा हप्ता लवकर वितरित करण्याचे आश्वासन दिले आहे.” या घोषणेमुळे लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

आपण पाहत आहोत की , सध्या सोशल मीडियावर या योजनेबाबत अनेक प्रकारच्या अफवा पसरत आहेत. त्यात मुख्यतः म्हणजे योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याचे दावे करण्यात येत होते. मात्र, महिला व बालकल्याण विभागाने यावर स्पष्टीकरण देत अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असे स्पष्ट केले आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानामुळे या अफवांवर पडदा टाकला गेला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची प्रतीक्षा संपली

राज्यातील लाखो लाडक्या बहिणींनी डिसेंबर हप्त्यासाठी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा केली होती. आता मुनगंटीवार यांच्या घोषणेमुळे त्यांची प्रतीक्षा संपली आहे. शासनाचा हा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणीसाठी एक गुड न्यूज आहे .

शासनाचे आवाहन

महिला व बालकल्याण विभागाने राज्यातील महिलाना आवाहन केले आहे की, योजनेबाबत अधिकृत माहितीची वाट पाहावी आणि सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. शासनाकडून अंगणवाडी सेविकांना देखील निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी लाभार्थींना योजनेची सद्यस्थिती समजावून सांगावी.

निष्कर्ष

लाडकी बहीण योजना लाभार्थीं महिलासाठी एक मोठी दिलासा देणारी योजना ठरली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे महिलांना आर्थिक आधार मिळण्याबरोबरच नव्या वर्षाची सकारात्मक सुरुवात होणार आहे.

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

Leave a comment