Ladki Bahin Yojana ग्रामसेवकावर नवीन जबाबदारी

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्यामहिलेचा मृत्यू झाल्यास त्या महिलेचा लाभ कसा बंद करायचा, हे राज्य शासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. यासाठी ग्रामीण भागातील ग्रामसेवकांना ही जबाबदारी देण्याचा शासन विचार करीत आहे.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana ग्रामसेवकांची नवी भूमिका

राज्य शासनाने या योजनेत ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची मानली असून, महिलांच्या मृत्यूनंतर (Ladki Bahin Yojana) त्वरित त्याची नोंद घेतली जावी आणि संबंधित लाभ बंद करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी ग्रामसेवकांची जबाबदारी वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे.

हे वाचा : या जिल्ह्यातील 1800 शेतकऱ्यांनी भरला बोगस पिक विमा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

विभागांची समन्वय भूमिका

त्यामुळे शासनाने प्रादेशिक परिवहन विभाग, प्राप्तिकर विभाग, महसूल विभाग, तसेच ग्रामविकास विभाग यांचा सहभाग या योजनेत घेण्याचा शासनाचा विचार आहे . त्यामुळे योजना अंमलबजावणीत अधिक पार्शकता येईल आणि लाभ चुकीच्या पद्धतीने सुरू राहणार नाहीत.

Ladki Bahin Yojana ग्रामसेवकांना जबाबदारी देण्याचा विचार

सरकारी नोकरीचे निवृत्तीवेतन घेणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो.
त्याचा आधारे संबंधित निवृत्तीवेतन धारकाचे निवृत्तीवेतन सुरू ठेवायचे किंवा बंद करायचे याचा निर्णय घेतला जातो. पण मात्र तशी तरतूद या योजनेसाठी केल्यावर त्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी अनावश्यक रित्या महिलांना धावपळ करावी लागेल. त्यामुळे सरकारने ही जबाबदारी ग्रामसेवकांना देण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असल्याचे समजते.

हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

Leave a comment