Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता या दिवशी मिळणार;आतापर्यंत ठरल्या अपात्र 5.50 लाडक्या बहिणी

Ladki Bahin Yojana : राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना आर्थिक मदत मिळते. या योजनेअंतर्गत दोन कोटी 59 लाख महिला लाभार्थी आहेत. या महिलांना दर महिन्याला 3 हजार 885 कोटी रुपये वितरणासाठी लागतात. पण आता सध्या संजय गांधी निराधार योजना आणि नमो शेतकरी योजना व स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाभार्थी महिलांची संख्या पाच लाख 50 हजार पर्यंत पोहोचली आहे .अजूनही अनेक महिलांच्या अर्जांची तपासणी सुरू आहे, त्यामुळे ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana अपात्र ठरण्याची कारणे

मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana)योजनेतून अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या 5.50 लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामागील प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • संजय गांधी निराधार योजना लाभार्थी: योजनेतून आधीच लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरविण्यात आले.
  • मग नमो शेतकरी योजना लाभार्थी: इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आले.
  • स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या महिला: काही महिलांनी स्वतःच अर्ज मागे घेतले.
  • चारचाकी वाहन धारक: ज्या महिलांच्या नावे चारचाकी वाहने नोंदलेली आहेत, त्यांची पडताळणी सध्या सुरू आहे.

हे वाचा : ठिबक व तुषार सिंचन अनुदान, लवकरच मिळणार निधी; जीआर आला

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

अंगणवाडी सेविका पडताळणी प्रक्रिया घरोघरी जाऊन

विधानसभा निवडणुकी अगोदर सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अडीच महिन्यातच अडीच कोटी महिलांनी अर्ज केले होते. तालुका व जिल्हास्तरीय समित्या कडून त्या अर्जाची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही. पण निवडणुकीच्या निकालानंतर या योजने संदर्भात काही तक्रारी यायला सुरुवात झाली त्यानंतर आता योजनेच्या प्रत्येक निकषानुसार योजनेत अपात्र लाडक्या (Ladki Bahin Yojana) बहिणी नेमक्या किती, याचा शोध घ्यायला सुरू आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात महिला लाभार्थीच्या नावावरील चार चाकी वाहनाची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यस्तरावरून आलेल्या याद्या अंगणवाडी सेविकांना दिल्या आहेत आता त्यांच्याकडून घरोघरी जाऊन पडताळणी सुरू झाली आहे. आठ दिवसांत त्यांचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.

Ladki Bahin Yojana फेब्रुवारी चा हप्ता होणारे विलंब

अंगणवाडी सेविका मार्फत पडताळणी सुरू आहे आणि त्याचा अहवाल आठ दिवसात शासनाला सादर केला जाणार आहे. त्यानुसार अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणी संदर्भातील निर्णय राज्यस्तरावरून होणार आहे. आणि मग पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता वितरित केला जाईल, अशी सध्या स्थिती आहे . सध्या मार्च महिना उजाडेपर्यंत हा प्रक्रिया चालू राहण्याची शक्यता आहे,असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे. या पडताळणीमुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ थांबव ण्यात आलेला आहे.

Ladki Bahin Yojana आतापर्यंत या योजनेचे 82.50 कोटी रुपये झाले कमी

या योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे साडेपाच लाख महिला आत्तापर्यंत योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि नमो शेतकरी योजनेसह स्वतःहून अर्ज माघारी घेणाऱ्या महिलांचा समावेश आहे. आता चार चाकी वाहन सह अन्य निकषानुसार काटेकोर पडताळणी सुरू आहे आणखीन काही लाख अपात्र लाडक्या (Ladki Bahin Yojana) बहिणीचा लाभ कमी होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

निष्कर्ष

महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ही योजना अधिकाधिक गरजूंना पोहोचावी, यासाठी सरकार काटेकोर पडताळणी करत आहे. या प्रक्रियेमुळे अपात्र लाभार्थी हटवले जात असून, योजनेच्या पारदर्शकतेस चालना मिळत आहे. Ladki Bahin Yojana

Leave a comment