ladki bahin yojana new update : महाराष्ट्र राज्य शासनाने 2024 मध्ये राज्यातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये वितरित केले जातात. याच योजनेबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींना आता उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी चाळीस हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. या कर्जाचे हप्ते लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यातून बँकेला वितरित केले जाणार आहेत.

राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य शासन महत्वपूर्ण निर्णय घेणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेकडून चाळीस हजार रुपयांचे कर्ज वितरित केले जाणार आहे. याबाबत सरकार प्रयत्नशील असून त्यावर शासन स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेतून महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जात आहेत. या लाडक्या बहिणींना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्यांच्याकडे भांडवल नाही अशा महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लघु उद्योगासाठी चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज देण्याची सुविधा शासन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. मिळालेल्या कर्जावरील हप्ते हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेमधून बँकेला वर्ग केले जातील.
कोणाला मिळणार कर्ज ladki bahin yojana new update
लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी भांडवली स्वरूपात हे कर्ज दिले जाणार आहे. ज्या महिलांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्यांना भांडवल उपलब्ध नाही अशा महिलांना हे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे चाळीस हजार रुपये कर्ज ज्या महिला लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र आहे त्याच महिलांना वितरित केले जाणार आहे. या कर्जावरील व्याज आणि हप्ते हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेतून भरले जाणार आहेत.
काय म्हणाले अजित पवार
रविवार दिनांक 11/05/2025 रोजी बोलताना अजित पवार म्हणाले की, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जात आहेत. योजनेवर राज्य शासनाचे 45 हजार कोटी रुपये खर्च होतात. एखाद्या महिन्याचा हप्ता वाटपास विलंब झाल्यास विरोध योजनेबाबत अनेक अफवा पसरवत आहेत. परंतु राज्यातील लाडक्या बहिणींनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना बंद होणार नाही. यापुढे आम्ही एक नवीन प्रस्ताव आणत आहोत.
या प्रस्तावासाठी राज्यातील काही बँका देखील पुढे आलेले आहेत. राज्य शासन यापुढे महिलांना उद्योग व्यवसायासाठी 40 हजार रुपयांचे भांडवल कर्ज स्वरूपात बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे. या भांडवल स्वरूपात घेतलेला कर्जाचे हप्ते हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या रकमेतून बँकेला दिले जातील. ज्यामधून महिलांनी घेतलेले कर्ज आणि त्यावरील व्याज बँकेला वितरित केले जाईल.
महिलांना नविन व्यवसायाची संधी
राज्य शासनाने मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्यांमधील अनेक महिलांना नवीन व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे. महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक लागणारे भांडवल लाडकी बहीण योजनेच्या गॅरंटीवर महिलांना कर्ज स्वरूपात दिले जाणार आहे. या भांडवलाच्या माध्यमातून अनेक महिला आपल्या कर्तृत्वावर व स्वबळावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करतील.
लवकरच राज्य शासन या प्रस्तावाला मान्यता देऊन राज्यातील लाखो महिलांना व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देईल. लाडक्या बहिणीचे पैसे ज्या बँकेमध्ये येत आहेत त्याच बँकेच्या माध्यमातून महिलांना हे व्यवसाय कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. सरकारने मांडलेला हा प्रस्ताव लवकरच मंजूर करून महिलांना व्यवसायासाठी 40 हजार रुपयापर्यंत कर्ज वाटप केले जाऊ शकते.
महिलांना चाळीस हजार रुपये खर्च देण्याबाबतची माहिती राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे दाखल करण्यात आलेला आहे. परंतु याबाबत अजून शासनाकडून कोणतीही मंजुरी मिळालेली नाही. लवकरच शासन या प्रस्तावाला मंजुरी देईल आणि राज्यातील महिलांना उद्योग व व्यवसायासाठी 40 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा महिलांच्या मनात निर्माण झाली आहे.