LIC Vima Sakhi Yojana :या योजनेतून महिलांना मिळणार 7 हजार रुपये महिना.

LIC Vima Sakhi Yojana : केंद्र सरकारने महिला सक्षमीकरण व आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी एलआयसी विमा सखी योजना हरियाणातील पानिपत येथे सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण व शहरी भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे. देशातील महिलांचा यापूर्वी विमा काढला जात नव्हता, आज देशामध्ये लाखो महिलांना विमा एजंट किंवा सखी बनवण्याची मोहीम सुरू आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या योजनेअंतर्गत दोन लाख महिलांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याचे लक्ष्य केंद्र सरकारची आहे. विमा सखी योजनेअंतर्गत इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या मुलींना प्रशिक्षण देऊन तीन वर्षासाठी आर्थिक मदत केली जाईल.

LIC Vima Sakhi Yojana योजनेची वैशिष्ट्ये

  1. महिलांसाठी विशेष योजना
    विमा सखी योजना 18 ते 70 वर्षे वयोगटातील दहावी उत्तीर्ण महिलांसाठी आहे. महिलांना तीन वर्षांचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल, ज्याद्वारे त्या एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतील.
  2. प्रशिक्षण व मानधन
    प्रशिक्षण कालावधीत महिलांना तीन वर्षांसाठी मानधन दिले जाईल:
    • पहिल्या वर्षी ₹7,000 प्रति महिना
    • दुसऱ्या वर्षी ₹6,000 प्रति महिना
    • तिसऱ्या वर्षी ₹5,000 प्रति महिना
  3. रोजगाराच्या संधी
    प्रशिक्षणानंतर महिलांना विमा एजंट म्हणून एलआयसीत सामील होण्याची संधी मिळेल. पदवीधर महिलांना पुढे विकास अधिकारी पदासाठी अर्ज करण्याचा मार्गही खुला आहे.

हे वाचा: प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना

LIC Vima Sakhi Yojana महत्वाचे फायदे

  • सामाजिक सुरक्षा
    विमा उतरवल्याने महिलांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक स्थैर्य व सामाजिक सुरक्षा मिळेल.
  • महिलांच्या नेतृत्वाला चालना
    योजनेद्वारे महिलांना विमा क्षेत्रातील नेतृत्व करण्याची संधी दिली जाईल.
  • कमी हप्त्यांमध्ये विमा संरक्षण
    प्रधानमंत्री जीवनज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनांद्वारे कमी हप्त्यांमध्ये ₹2 लाखांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे.

अर्ज करण्यासाठी पात्रता

  • अर्ज फक्त महिलांसाठी खुला आहे.
  • अर्जदाराने किमान दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले असावे.
  • वयोमर्यादा: 18 ते 70 वर्षे.
  • तीन वर्षानंतर च्या प्रशिक्षणानंतर या महिला विमा एजंटच्या स्वरूपात काम करू शकतील.

योजनेच्या अटी व शर्ती

  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना एलआयसी एजंट म्हणून नियुक्त केले जाईल, मात्र त्या नियमित कर्मचारी समजल्या जाणार नाहीत.
  • ज्या महिलांची सखी म्हणून निवड होईल. त्या महिलांनी प्रत्येक वर्षी आपला कामगिरी अहवाल सादर करावा लागेल.

विमा सखी योजनेचे उद्दिष्ट LIC Vima Sakhi Yojana

या योजनेचे उद्दिष्ट दोन लाख महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आहे. महिलांना आर्थिक शिक्षण व विमा जागरूकता देऊन, त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा सरकारचा उदेश आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2 thoughts on “LIC Vima Sakhi Yojana :या योजनेतून महिलांना मिळणार 7 हजार रुपये महिना.”

Leave a comment

Close Visit Batmya360