गाळ अनुदान योजना magel tyala gal yojana

गाळ अनुदान योजना magel tyala gal yojana

गाळ अनुदान योजना magel tyala gal yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या योजनेमध्ये गाळ अनुदान योजना या विषयी माहिती पाहणार आहोत. आपण पाहतच आहोत की राज्यातील बहुतांश शेतकऱ्याच्या जमिनी भुरगळ, खडकाळ आणि नापिकी आहेत. याचा परिणाम असा होतो की त्या शेतकऱ्यांना उत्पन्न कमी होते, त्यामुळे शेतकऱ्यांना ती शेती करण्यास परवडत नाही.

जर अशा शेतामध्ये काळी माती किंवा तळ्यातील गाळ टाकल्यास जमीन सुपीक बनू शकते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना त्या शेतातून जास्त उत्पन्न घेणे शक्य होईल आणि ती शेती करायला परवडेल पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेतामध्ये गाळ टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना हा खर्च परवडण्याजोगा नसतो. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी गाळ अनुदान योजना खूप फायदेशीर ठरणार आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन नापीक, भुरगळ, खडकाळ आहे अशा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ नक्कीच घ्यावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

ट्रॅक्टर अनुदान वाटप सुरू

गाळ अनुदान योजना magel tyala gal yojana

ऊस तोडणी यंत्र अनुदान

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार

गाळ अनुदान योजनेला गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या नावाने देखील संबोधले जाते. राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धरण आणि जलसाठे आहेत आणि वर्षानुवर्ष या धरणामध्ये  साचत असलेल्या गाळामुळे धरणाच्या साठवन क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणावरघट होत आहे.

या धरणांमध्ये साटलेला गाळ उपसा करून जर शेतामध्ये टाकल्यास धरणाची साठवण क्षमता पूर्ववत होईल. आणि हा गाळ शेतामध्ये टाकल्यास जमीन सुपीक होऊन कृषी उत्पादन वाढण्यास मदत होईल. या सर्वच विचार शासनाने केला आणि गाळ अनुदान योजना राबवण्यात आली  .

चला तर आपण आज या लेखांमध्ये योजनेसाठी कोण पात्रता असणार आहे, विशिष्ट काय आहे, मूल्यमापन, अनुदान मर्यादा आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

गाळ अनुदान योजना वैशिष्ट्ये

  •  या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना धरणातील गाळ यांच्या शेतामध्ये टाकण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे.

अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर

  •  प्रत्येक धरणाच्या किंवा जलसाठ्याच्या साईटची काम करण्यापूर्वीची व काम केल्यानंतर चे फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवणे.
  •  शेतकरी व त्यांच्यामार्फत वाहून नेलेल्या गाळाची माहिती ठेवणे.
  •  उत्खनन यंत्रसामग्रीच्या तासाची संख्या नोंदणी याची माहिती
  •  एकूण काढलेल्या गाळाचे प्रमाण नोंद करून ठेवणे.
  •  दैनंदिन डाटा एन्ट्री व M.B रेकॉर्डिंग ची तपासणी करणे.

मूल्यमापन

  •  गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्यात आल्यानंतर एक ते दोन पावसाळी  गेल्यानंतर धरणाच्या जलसाठ्यात घोषित करायच्या उत्पन्नामध्ये झालेली वाढ तसेच उत्पन्न आणि निवडणूका झालेली वाढ याची स्वतंत्र मूल्यमापन करण्यात येणार आहे.
  •  याच्यासाठी प्रकल्प खर्चाच्या एक टक्के पर्यंत खर्च करण्यात येईल .600 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या व दहा वर्षापेक्षा जुन्या असलेल्या जलसाठ्यांना प्रधान्य देण्यात येईल.

निवड प्रक्रिया आणि लाभार्थ्याची यादी तयार करणे

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

गाळ घेऊन गेलेले शेतकरी, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी 1 ते 3 हेक्टर पर्यंत क्षेत्र मर्यादा असलेले शेतकरी अशा सर्व शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येईल. या यादीमध्ये विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी सुद्धा अनुदानास पात्र राहतील. जास्त जमीन असलेल्या शेतकरी या अनुदानास पात्र राहणार नाहीत.

अनुदानाची मर्यादा

शेतामध्ये पसरविण्यात आलेल्या गाळाच्या 35.75 घनमीटर प्रमाणे एकरी 15000 रुपये मर्यादित म्हणजेच एकरामध्ये 400 घनमीटर गडाच्या मर्यादित अनुदान देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त अनुदान मर्यादा अडीच एकर पर्यंत लागू आहे म्हणजे 37 हजार पाचशे रुपये इतकाच अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे . ही योजना विधवा अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा लागू असेल.

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

गाळ अनुदान योजना अर्ज करण्याची पद्धत

ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती. समितीने दिलेल्या अहवालातील तलावातील गाळ उपसा करून शेतात टाकण्यासाठी चार वर्षांमध्ये ही योजना टप्याटप्याने राबविणे अपेक्षित होते.

आता पुन्हा ही योजना सुरू होत असल्याने तलावातील गाळ काढण्याने पाणीसाठा तर वाढणार आहेच. परंतु शेतकरी बांधवांना  त्यांच्या खडकाळ जमिनीसाठी गाळ देखील उपलब्ध होणार आहे.

या योजने संदर्भातील शासन निर्णय पाहण्यासाठी गाळ अनुदान योजना येथे क्लिक करा.

हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment