Maha Kumbh Mela 2025 : सध्या प्रयागराज महा कुंभाचं आयोजन करण्यात आले आहे . याला पूर्ण महा कुंभमेळा 2025 असं म्हटलं जात आहे. आयोजित होणारा हा महा कुंभ मेळा (Maha Kumbh Mela 2025) एक ऐतिहासिक आणि दुर्मिळ घटना आहे, कारण हा कुंभ मेळा 144 वर्षांनी साजरा होतो. यंदा महा कुंभ 144 वर्षांनी पुन्हा आयोजित होत आहे, जो 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे. या भव्य मेळ्यात देशभरातून लाखो भाविक सहभागी होतात, त्यामुळे त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष विमा योजना सुरू करण्यात आली आहे.

महा कुंभ मेळा सुरक्षा योजना
प्रयागराज मध्ये होणाऱ्या महा कुंभमेळ्यात (Maha Kumbh Mela 2025) देशभरातून जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी महा कुंभमेळा सुरक्षा विमा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा फायदा ₹ 59 मध्ये मिळवता येणार आहे . देशभरातून लाखो भाविक महा कुंभमेळ्याच्या काळात प्रवास करताना आरोग्यविषयक तातडीचे इलाज, अपघात, आणि इतर आपत्कालीन परिस्थितींसाठी हा विमा उपयोगी पडू शकतो.
हे वाचा : ई-पीक पाहणी करायची राहून गेली असेल तर; शेतकऱ्यांसाठी अजून एक संधी.
Maha Kumbh Mela 2025 दोन्ही प्रकारचे इन्शुरन्स
फोनपेनं दोन प्रकारचा इन्शुरन्स कव्हर सादर केला आहे .
- एक म्हणजे रेल्वे आणि बसने प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी इन्शुरन्स कव्हर सादर केला आहे . जे भाविक रेल्वे किंवा बसणे प्रवास करणार आहे त्यांच्यासाठी फक्त 59 रुपयात खरेदी करता येणार आहे .
- दुसरा म्हणजे विमानानं प्रवास करणाऱ्यांसाठी.प्रयागराजला जे भाविक देशांतर्गत विमानाने प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी हा विमा 99 रुपयात खरेदी करता येणार आहे .
Maha Kumbh Mela 2025 विमा योजनेत उपलब्ध कव्हरेज
या विमा योजनेमध्ये विविध प्रकारचे कव्हरेज मिळवता येईल, जसे की:
- रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च
- वैयक्तिक अपघात कव्हर
- डॉक्टरांचा सल्ला
- चेक-इन बॅगेज गमावल्याची भरपाई
- कनेक्टिंग फ्लाइट्स चुकणं
- ट्रिप रद्द होणं याचा समावेश असेल
Maha Kumbh Mela 2025 वयोमर्यादा
महा कुंभमेळा सुरक्षा विमा (Maha Kumbh Mela 2025) योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 वर्ष ते 70 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी खरेदी केला जाऊ शकतो. ज्या भाविकांना या विमा योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी प्रवासाच्या तारखेपूर्वी विमा खरेदी करणे आवश्यक आहे ,आणि प्रवासादरम्यान व प्रयागराजहून परतताना तुम्हाला विमा संरक्षण मिळेल.
कसा खरेदी करता येईल ?
जर तुम्हाला हा विमा खरेदी करायचा असेल तर तुम्हाला प्रवासाला जाण्या अगोदर विमा विकत घ्यावा लागेल लक्षात असू द्या हा विमा एकदा विकत घेतल्यानंतर तो रद्द करता येत नाही . हा विमा खरेदी करायचा असेल तर तुम्हाला फोनपे ॲप वर सहजपणे विमा खरेदी करू शकतात हा विमा खरेदी 25 फेब्रुवारी 2025 पर्यंतच केली जाऊ शकते.जर तुम्हाला विम्या विषयी अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही फोनपेच्या ॲप वर जाऊन माहिती घेऊ शकतात .
अशा प्रकारे, महा कुंभ मेळ्याच्या भाविकांसाठी हा विमा सुरक्षा कवचासारखा ठरू शकतो, आणि त्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक मदत मिळवता येईल.Maha Kumbh Mela 2025