E- Peek Pahani: ई-पीक पाहणी करायची राहून गेली असेल तर; शेतकऱ्यांसाठी अजून एक संधी.

E- Peek Pahani : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी ही एक महत्वाची सुविधा ठरली आहे. यामुळे, शेतकऱ्यांना त्यांचे पीक डिजिटल पद्धतीने नोंदवता येते, आणि यामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यात मदत होते. 15 डिसेंबर पासून सुरू झालेली शेतकऱ्यांच्या स्तरावरील ई-पीक पाहणी बुधवारी (15 जानेवारी 2025) पूर्ण झाली असून, आता शेतकऱ्यांनाही त्यांची पिकांची नोंदणी करत असताना काही चूक झालेली असताना ती चूक दुरुस्ती करण्यासाठी काही दिवसांची मुदत मिळाली आहे .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
E- Peek Pahani

E- Peek Pahani नोंदणीची स्थिती

शेतकऱ्यांच्या स्तरावर पिकांची नोंदणी 15 जानेवारी रोजी संपलेली असून आतापर्यंत 32 लाख 28 हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक पाहणी पूर्ण करण्यात आलेली आहे . राज्यामध्ये 2 कोटी 9 लाख 48 हजार 735 हेक्टर इतके क्षेत्र आहे त्यापैकी 30 लाख 43 हजार 366 हेक्‍टरवरील लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यात आलेली आहे . तसेच कायम पड असलेले 81 हजार 634 हेक्टर क्षेत्र तर चालू पडलेले 1 लाख 3 हजार 31 हेक्टर क्षेत्र ही यात नोंदविण्यात आले आहे . त्यानुसार ई – पीक पाहणी नोंदणी पूर्ण झालेले क्षेत्र एकूण 32 लाख 28 हजार 32 हेक्टर एवढी झाली आहे. एकूण लागवडीच्या तुलनेत या नोंदणीचे प्रमाण 15.41% आहे.

हे वाचा : हिवाळी अधिवेशनात 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर: सरकारच्या महत्त्वाच्या योजना,निधी आणि तरतूट .

E- Peek Pahani आगामी कार्यवाही आणि मदत

राज्यातील रब्बी हंगामातील ई – पीक पाहण्याची नोंद 15 जानेवारी रोजी संपलेली असून आता सहाय्यकाच्या स्तरावरील पाहणी 16 जानेवारीपासून शंभर टक्के पीक पाहणीसाठी आता 28 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे . ई – पीक पाहणी करताना झालेली चूक दुरुस्ती करण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे त्या मुदतीच्या आत पिक पाहणीत चुकलेल्या नोंदणीची दुरुस्ती यासाठी शेतकऱ्यांनी २८ फेब्रुवारी पर्यंत चुकीची नोंदणी दुरुस्त केली तरी ती मान्य केली जाईल.

यंदा सरकारने शंभर टक्के पीक पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी मिळणाऱ्या योजनांचे लाभ अधिकृत पद्धतीने मिळू शकतील. सहाय्यक आणि शेतकऱ्यांसाठी सरकारने डिजिटल क्रॉप सर्व्हे या ऍप्लिकेशनची सुविधा उपलब्ध केली आहे.

E- Peek Pahani नोंदणीसाठी आवाहन

शेतकऱ्यांच्या स्तरावरील पीक पाहणी झाल्यानंतर आता सहाय्यक हे राहिलेल्या क्षेत्राची पिक पाहणी करणारा आहेत. यासाठी पुढील 45 दिवस ही नोंदणी होणार आहे, जर एखाद्या शेतकऱ्याने पिकाची नोंदणी केलेली नसेल, तर त्याला सहाय्यकांमार्फत नोंदणी करण्याची सूचना केली जात आहे. ही सूचना ई – पिक पाहणी प्रकल्पाच्या संचालक सरिता नरके यांनी केली आहे. या नोंदणीमुळे शेतकऱ्यांचे पिकासंबंधीचे मुद्दे निश्चितपणे सक्षम पद्धतीने हाताळता येणार आहेत, आणि त्यांचे इतर प्रशासनिक कार्य पूर्ण होऊ शकतील.

निष्कर्ष

ई-पीक पाहणी (E- Peek Pahani) ही शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी पद्धत आहे. सरकारच्या या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी अधिक सोयीस्कर, त्वरित आणि त्रुटिरहित केली जाऊ शकते. शेतकऱ्यांनी या सुविधेचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आणि त्यांच्या पिकांची नोंदणी वेळेवर पूर्ण केली पाहिजे.

1 thought on “E- Peek Pahani: ई-पीक पाहणी करायची राहून गेली असेल तर; शेतकऱ्यांसाठी अजून एक संधी.”

Leave a comment