Maharashtra havaman andaz: राज्यात पडणार अवकाळी पाऊस… या जिल्ह्यांना येलो अलर्ट…

Maharashtra havaman andaz महाराष्ट्र राज्यामध्ये 31 मार्च पासून अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या पुणे विभागाने 29 मार्च 2025 रोजी दिला होता. मागील अनेक दिवसापासून राज्यामध्ये उष्णतेची अति तीव्र लाट निर्माण झाली होती. राज्यातील तापमानाचा अंदाज 38 ते 40°c पर्यंत पोहोचला होता. यातच आता हवामान विभागाने दिल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra havaman andaz

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मार्च 2025 पासून राज्यात अवकाळी पाऊस धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली. हा पाऊस राज्यात पश्चिमी चक्रवाढळाच्या प्रभावामुळे निर्माण होणार असून त्याचा प्रभाव देशातील छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यावर मोठ्या प्रमाणावर दिसून येणार आहे. याबरोबरच अंदमान समुद्र आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात चक्रकार वाऱ्याची परिस्थिती अशीच कायम राहिल्याने महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसाची आणखी शक्यता वाढणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

राज्यातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट Maharashtra havaman andaz

31 मार्च पासून महाराष्ट्र राज्य मध्ये अवकाळी पावसाची सुरुवात होणार आहे. 31 मार्च रोजी राज्यातील पालघर ठाणे धुळे नाशिक नंदुरबार सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच राज्यातील इतर भागामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

तापमानात देखिल मोठी वाढ

राज्यातील तापमान देखील उच्च स्तरावर पोहोचले आहे. मागील दोन दिवसांमध्ये विदर्भात तापमान 40°c च्या पुढे गेलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर मध्ये 41.9 अंश सेल्सिअस वर्धा जिल्ह्यात 41.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील तापमान सरासरीपेक्षा अधिक झाल्याचे पाहायला मिळाले.

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता आहे. शेतीमधील फळबाग, रब्बी हंगामातील पिके, शेतीत साठवलेला शेतमाल याचे अवकाळी पावसामुळे नुकसान पुण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहून आपल्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन

Maharashtra havaman andaz राज्यात होणाऱ्या अचानक अवकाळी पावसामुळे राज्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी असा सल्ला देखील हवामान खात्याने दिला आहे. हवामानातील होणारे बदल यावर नागरिकांनी सुरक्षितेची खबरदारी घ्यावी. राष्ट्रीय हवामान विभागाने दिलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन करावे. आपल्या पिकाचे कसे संरक्षण करण्यासाठी देखील खबरदारी घ्यावी. असा सल्ला भारतीय हवामान खात्याने imd राज्यातील नागरिकांना दिला आहे.

Leave a comment