Maharashtra weather update गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे. तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले असून अनेक ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली आहे. धुळ्यात तर शुक्रवारी तापमान ६ अंशांपर्यंत खाली आले होते.
Maharashtra weather update हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये थंडी कमी होऊन तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे..
- कोकण आणि मराठवाडा: हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
- उत्तर महाराष्ट्र: ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
- विदर्भ: पुढील पाच दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता.
ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस
Maharashtra weather update नैऋत्य बंगालच्या उपसागरात आणि राजस्थान परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या वाऱ्यांचा परिणाम राज्याच्या हवामानावर होण्याची शक्यता असून, अकोला, मुंबई, रत्नागिरी, बीड, सिंधुदुर्ग वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहील.
हे वाचा: नवीन virous बद्दल माहिती आणि बचावाचे उपाय.
थंडी कमी होण्याची शक्यता
पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्यामुळे किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळेराज्यातील थंडीचा जोर थोडासा कमी झालेला पाहायला मिळेल.
सावधगिरीचे उपाय:
- थंडीचा कडाका असल्याने थंडीत उबदार कपड्यांचा वापर करा.
- अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत.
- ढगाळ वातावरणामुळे तापमान बदलांचा अंदाज ठेवावा आणि आरोग्याची काळजी घ्यावी.
राज्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार सतर्क राहणे गरजेचे आहे. उष्णता आणि थंडीतील बदलांमुळे आरोग्याच्या तक्रारी टाळण्यासाठी योग्य ती काळजी नागरिकांनी घेणे आवश्यक असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.