mahila swayam siddhi yojana : महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना

mahila swayam siddhi yojana महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना

आज आपण महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना याविषयी माहिती पाहणार आहोत राज्य सरकार हे नेहमीच महिलांसाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणत असते. तसंच आज एका योजनेची माहिती पाहणार आहोत ती योजना पण  महिलांसाठीच आहे ज्यामध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून 5 ते 10 लाखापर्यंत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
(mahila swayam siddhi yojana)

     या योजनेअंतर्गत  बचत गटातील इतर मागास वर्गातील सुशिक्षित, बेरोजगार, होतकरू महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार 5 ते 10 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

     महाराष्ट्र राज्यामध्ये अशा बऱ्याचशा महिला आहेत की त्या सुशिक्षित तसेच हुशार आहेत व स्वतःचा एखादा उद्योग सुरू करण्यासाठी खूप उत्सुक आहेत परंतु त्या महिलांच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे या महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी पैसे नसतात त्या कारणामुळे या महिला उद्योग सुरू करू शकत नाही . तसेच त्यांना उत्पन्नाचे काही साधन नसल्यामुळे त्या कुटुंबाला  कोणतीच बँक  व वित्तीय संस्था कर्ज देत नाही. अशा कारणामुळे इच्छुक असणाऱ्या महिला  स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. या सर्व गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने राज्यातील इतर मागास प्रवर्गातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हाव्यात  आणि त्या महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने महिला स्वयंसिद्धी योजना महाराष्ट्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्या महिलांना स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे त्यांना या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

योजनेचे नाव

 महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना (mahila swayam siddhi yojana
)

लाभ

5 लाख ते 10 लाखाचे आर्थिक साहाय्य

लाभार्थी

बचत गटातील महिला

 उद्देश

इच्छुक असणाऱ्या महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत करणे

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाइन/ऑफलाइन

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना उद्दिष्ट

  •  या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील महिलांना स्वयं रोजगार उपलब्ध होऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  •  महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे
  •  या योजनेअंतर्गत महिलांना रोजगार निर्माण करणे
  •  या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे
  •  महिलांना आता स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी कोणाकडून पैसे घेण्याचे गरज पडणार नाही किंवा कोणावर अवलंबून राहण्याची  आवश्यकता बसू नये 
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगारी कमी करणे

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना वैशिष्ट्ये

  •  या योजनेच्या माध्यमातून महिला आता स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःचे जीवनमान सुधारेल.
  •  सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र (CMRC )च्या साह्याने राबविण्यात आली आहे.
  •  या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम  महिलांच्या बँक खात्यात DBT च्या  सहाय्याने जमा करण्यात येईल.
  •  या योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून महिलांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

(mahila swayam siddhi yojana)

महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा लाभार्थी

  •  या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना लाभ दिला जाईल. अशा महिलांना दिला जाईल ज्या महिला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत अशांना देण्यात येईल.
  •  महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना पात्रता फक्त बचत गटातील महिला असतील.

(mahila swayam siddhi yojana) योजना फायदे

  •  महिला स्वयं सिद्धी  व्याज परतावा योजने अंतर्गतयोजना बचत गटातील महिला मागासवर्गीय , बेरोजगार, सुशिक्षित महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते.
  • राज्यातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणाकडून पैसे घेण्याची गरज पडणार नाही. कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता पडणार नाही.
  •  महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजने अंतर्गत बेरोजगारी कमी होईल व रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होईल.
  •  या योजनेमुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहू शकते.
  •  महिलांना हे कर्ज या योजनेअंतर्गत शून्य टक्के व्याज दराने दिले जाईल.
  •  महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेअंतर्गत महिलांना 5 ते 10 लाखापर्यंत  बिनव्याजी कर्ज दिले जाते.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अटी व शर्ती

(mahila swayam siddhi yojana)

  •  या योजनेचा लाभ बचत गटातील इतर मागास वर्गातील महिलांनाच दिला जाईल.
  •  या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांना दिला जाईल.
  •  या योजनेचा लाभ महाराष्ट्र बाहेरील महिलांना दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाचे वय 18 वर्षाची 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  •  या योजनेअंतर्गत अर्जदार महिला बँक/ वित्त संस्थेचा थकबाकीदार असता कामा नये..
  •   या योजनेचा लाभ  एकाच कुटुंबातील एका महिलांनाच घेता येईल.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना आवश्यक कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  •  रेशन कार्ड
  •  मोबाईल नंबर
  •  ई -मेल आयडी
  •  पासपोर्ट  आकाराचे फोटो
  •   जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्याची माहिती
  •  स्वयं- घोषणापत्र
  •  इतर मागास प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र
  •  जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  •  रहिवाशी प्रमाणपत्र
  •  बचत गटाचे बँक पासबुक (झेरॉक्स)
  •  बचत गटातील महिला  सदस्यांचे CMRC कडून प्रमाणित कौटुंबिक उत्पन्नाबाबतीचे प्रमाणपत्र.

(mahila swayam siddhi yojana) अर्ज पद्धत

  •  या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलाला आपल्या जिल्हा कार्यालयात महिला आर्थिक विकास महामंडळात जावे लागेल.
  •  कार्यालयात गेल्यानंतर महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून योग्य ती कागदपत्रे जोडावी. आणि त्यानंतर तो अर्ज जमा करावा लागेल.
  •  अशाप्रकारे तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकतात.

(mahila swayam siddhi yojana) महत्त्वाच्या सूचना

  •  या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दिली जाणारी लाभाची रक्कम महिला बचत गटाच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  •  लाभार्थी महिलेला कर्जाच्या रकमेवर  आकारण्यात येणाऱ्या व्याजाची रक्कम ओबीसी महामंडळामार्फत अदा करण्यात येईल. त्यामुळे महिलांना या योजनेअंतर्गत शून्य व्याजदराने कर्ज उपलब्ध होईल.

mahila swayam siddhi yojana विचारले जाणारे प्रश्न

  1. (mahila swayam siddhi yojana) व्याज परतावा योजनेअंतर्गत किती कर्ज दिला जातो?
  •  महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजनेअंतर्गत महिलांना पाच 5 ते 10 लाख रुपये कर्ज दिले जाते.
  1. महिला स्वयंसिद्धी या योजनेचा फायदा काय?
  •  महिला स्वयंसिद्धी योजनेअंतर्गत व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जाते.
  1. महिला स्वयसिद्धी व्याज परताव योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
  •  महिला स्वयंसिद्धी योजनेचे लाभार्थी राज्यातील महिला अशा महिला ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे त्या महिला या योजनेसाठी लाभार्थी असतील.
  •  तसेच या योजनेसाठी लाभार्थी फक्त बचत गटातील महिला असतील.
  1. महिला स्वयं सिद्धी व्याज परताव योजनेचे उद्देश काय आहे ?
  •  या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील महिलांना स्वयं रोजगार उपलब्ध होऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.(mahila swayam siddhi yojana)
  •  तसेच या योजनेअंतर्गत महिलांना रोजगार निर्मिती करणे बेरोजगारी कमी करणे आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनवणे असे या योजनेचे उद्देश आहेत

1 thought on “mahila swayam siddhi yojana : महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना”

Leave a comment