Manikrao kokate ; कृषी मंत्र्यांचे विधान ; महसूल मंत्र्यांनी मागितली माफी..!!

Manikrao kokate राज्यात मागील बऱ्याच दिवसापासून शेतकरी कर्जमाफी हा विषय चांगला चर्चेत आहे. सरकारने सत्ता स्थापन होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाचा सरकारला आता पूर्ण विसर पडला आहे. कारण याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन वेळा वक्तव्य करत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं किंवा देणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यातच आता आणखी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील शेतकरी कर्जमाफी बद्दल वादग्रस्त विधान केला आहे. या वादग्रस्त विधान बबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्या वतीने माफी मागितली आहे.

Manikrao kokate

माणिकराव कोकाटे काय म्हणाले? Manikrao kokate

शुक्रवार दिनांक चार एप्रिल 2025 रोजी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडे होत असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. राज्याचे कृषिमंत्री नाशिक मध्ये शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथल शेतकऱ्यांसोबत साधलेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्याने अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला. शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही असा प्रश्न विचारण्यात आला?

शेतकऱ्यांनी विचारायला या प्रश्नावर उत्तर देताना कृषिमंत्री म्हणाले; कर्ज घ्यायचं पाच दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची तोपर्यंत कर्ज भरायचंच नाही. कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचा तुम्ही काय करता? मिळालेला पैशातून शेतीमध्ये एक रुपया तरी गुंतवणूक करता का? शेतकरी पिक विमा अनुदानाची मागणी करतात मग शेतकरी या पैशातून साखरपुडे ,लग्न करतात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कृषीमंत्र्याच्या या वादग्रस्त विधानाला विरोधकाकडून मोठ्या प्रमाणावर घेरले जात आहे. यावरच बोलताना महसूल मंत्री यांनी स्वतः माफी मागितली आहे.

काय म्हणाले महसूल मंत्री

अवकाळी पावसामुळे राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई नक्कीच दिली जाईल. नुकसान भरपाई देण्याची जबाबदार देखील राज्य शासनाचीच आहे. राज्यातील कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे काय बोलले हे मला माहित नाही; मात्र सरकार या नात्याने मी शेतकऱ्यांची माफी मागतो. राज्यातील फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अशी माहिती देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

राज्यातील अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या सर्वच शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर केली जाईल. नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये अशा सूचना देखील आम्ही अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. राज्यातील नुकसानग्रस्त भागात नुकसानीचे सर्वक्षण सुरू आहे. राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी सरकार घेत आहे. नुकसान झालेले शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसान भरपाई वाटप केली जाईल.

कृषि मंत्र्यांचे स्पष्टीकरण

कृषिमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स वर पोस्ट केला आहे. यावर स्पष्टीकरण देताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, तेथील उपस्थित शेतकऱ्यांमध्ये माझे अगदी जवळचे मित्र होते. त्या शेतकऱ्यांची मी नेहमीच थट्टा मस्करी ने बोलतो. माझ्या बोलण्यातून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी सर्व शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. राज्यातील शेतकऱ्यांवर कधीही कर्जाची वेळच येऊ नये, शेतकरी समृद्ध आणि आर्थिक समृद्ध झाला पाहिजे यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. ज्या गोष्टी दाखवायच्या नाहीत त्याच गोष्टी जाणीवपूर्वक दाखवल्या जातात. माझ्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील त्या सर्व शेतकऱ्यांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.

Leave a comment