ajit pawar farmer loan महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या आश्वासने सर्वच पक्षाच्या वतीने देण्यात आली होती. त्यातच महायुतीने देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याची माहिती जाहीरनाम्यात दिली होती.
ajit pawar farmer loan मागील काही काळापासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिति डगमगली आहे. यावरच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. राज्यातील शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकत गेला आहे. यावरच सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा लागली होती. निवडणुकीपूर्वी कर्जमाफी होईल अशी अपेक्षा असताना देखील शेतकऱ्यांना त्यांच्या नशिबी निराशाच आली.
निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजप सोबतच सतेमद्धे असलेल्या राष्ट्रवादी (AP) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या सर्वच पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबतची, तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करता बाबतची विविध घोषणा करण्यात आल्या होत्या. वचननाम्यामध्ये दिलेल्या कर्जमाफीची घोषणा कधी करणार किंवा राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार? याबाबत राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका कार्यक्रमांत कार्यकर्त्याने प्रश्न विचारला असता त्यांच्याकडून काय माहिती देण्यात आली याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कर्ज माफी बद्दल अजित पवार काय म्हणाले
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना कर्जमाफी बद्दल कार्यकर्त्याकडून विचारणा केली असता; त्यांनी कर्जमाफी बद्दल मी कधीच कोणत्याच भाषणात बोललो नसल्याची माहिती दिली. त्यासोबतच त्यांनी अंथरूण पाहून पाय पसरावे अशी देखील सूचना केली. याचा अर्थ असा की राज्याची अर्थव्यवस्था सध्या व्यवस्थित नाही त्यामुळे मी असा कोणताही शब्द दिला नाही या प्रकारची माहिती अर्थमंत्र्यांनी दिले आहे.
हसन मुश्रीफ काय म्हणाले
ajit pawar farmer loan याच दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी देखील शेतकरी कर्जमाफी बद्दल वक्तव्य केले त्यांनी देखील शेतकरी कर्जमाफी आम्ही करणार आहोत. अन्नपूर्णं योजना सुरू ठेवणार आहोत. मुलींना मोफत शिक्षण सुरू ठेवण्यात येणार आहे. महिलांना 50 टक्के सवलतीत प्रवास सर्व सुरू राहणार आहे. लाडका भाऊ योजना सुरू ठेवण्यात येणार आहे. परंतु सध्या राज्याची अर्थव्यवस्था डगमगलेली आहे ती सुरळीत झाल्यानंतर पुढच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी नक्कीच देऊ.कर्ज माफी पुढील पाच वर्षात करायची आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
ajit pawar farmer loan शेतकरी कर्ज माफी कधी
अर्थमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. कारण शेतकऱ्यांमध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी आशा होती. परंतु अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी कर्ज माफी बद्दल आपले मत स्पष्ट केल्यामुळे; आता राज्यातील शेतकऱ्यांना सध्या तरी कर्जमाफी मिळणे शक्य नसल्याबाबतची माहिती उघड झाली आहे.
ajit pawar farmer loan अर्थव्यवस्था सुधारण्यास किती काळ लागेल व शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळेल याची चिंता आता शेतकऱ्यांना होत आहे. लवकरच अर्थव्यवस्था सुरळीत होऊन राज्यातील कर्जाच्या ओझ्या खाली गेलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आधार मिळवा. कर्ज माफी मिळून त्यांच्या जगण्यामध्ये थोड्या प्रमाणात का होईना सुरळीत पणा आणण्याचा राज्य शासनाने प्रयत्न करावा अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.
1 thought on “ajit pawar farmer loan अजित पवारांना कर्ज माफी चा विसर. त्या एका वक्तव्यामुळे शेतकरी चितेत.”